Posts

Showing posts from May, 2022

आम्र-पुराण

Image
                 लहानपणी कोणते फळ आवडते? विचारले की, हमखास उत्तर ठरलेले असायचे “आंबा” ऊन्हाळा, पन्हे, आंबा बर्फी आणि बरेच काही डोळ्यासमोर येते. आंब्याचे प्रचंड आकर्षण, मग तो कोणताही असो, हापुस, पायरी, लंगडा, तोतापुरी, रायवळ, कारवारचे काळा ईशाड, पा।ढरा इर्शाड किंवा मुसराद! अनेक जाती, अनेक ठिकाणच्या (नांदेड, बेळगांव, कारवार,आणि आता मुंबई) वेगवेगळ्या चवी, चाखून बघितल्या आहेत. तर असे हे आंबा-पुराण लिहावे तेवढे थोडेच. माझी छोटी लेक फेब्रुवारीचा जन्म पण आंब्याची एवढी चाहती. पहिला आंबा बाजारात दिसला की, हिची गडबड सुरु! लहान असतांना गावी गेलो तेव्हा तिचा आंब्यात बसून फोटो काढलेला आहे, त्याची ती दरवर्षी आठवण काढून बसते कारण आता गावी जायला मिळत नाही. आता ते आंब्याचे झाड आता राहीले नाही.            आमच्या गावी आंबा उशीरा येतो त्यामूळे तोपर्यंत इथले आंबे खाऊन होतात. त्याआधी केरीचे पन्हे, लोणचे, मेथांबा, आमटी असे वेगवेगळे प्रकार चाखून झालेले असतात. हळूहळू पातोळी, बर्फी, रोजच जेवणात आंबे कापून खाणे, रायवळ आंबे चोखू...