Posts

Showing posts from August, 2025

शिवकालीन रणरागिणी

Image
               रणरागिणी म्हणजे रणागंणात लढणारी शुर स्त्री,जी पराक्रम गाजवणारी,धाडसी आणि शुर असते. केवळ युद्धातच नव्हे तर समाजातील अं:धकार दुर करणे, गरजुंना मदत करणे, एखाद्या मोठ्या ध्येयासाठी समर्पितपणे कार्य करणार-या लढाई व धामधामूकीच्या कालावधीत खंबीरपणे वेळप्रसंगी स्वकिय आणि परकिय यांच्या समवेत विविध डावपेच लढवत, सहका-यांना आपलेसे करून उत्तेजन देऊन राज्यकारभार करणा-या स्त्रिलासुद्धा “रणरागिणी”असे म्हणतात. हा शब्द शिवाजी महाराजांच्या शौर्याचे वर्णन करतांना वापरला तर त्याकाळात जिजाबाई भोसले यांचा उल्लेख करणे अपरिहार्य ठरते. “शुन्यातुन विश्व निर्माण करणे”ही म्हण कदाचित त्यांचावरुनच तयार झाली असावी. त्यानंतरच्या काळात येसुबाई, ताराबाई, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी यासुद्धा रणरागिणीच  ठरल्या आहेत. शिवकालिन“रण-रागिणी”हा विषय खरेच विचार करण्यासारखा आहे. जेव्हा जेव्हा संकटे येतात तेव्हा स्त्रीयांची उपजत लढाऊ वृत्ती दिसुन येते.         ...

ॲट@ गुलझार-ए-गझल

Image
           नु कतीच गुलझार साहेबांची 90 वर्षे पुर्ण झाल्यानिमित्त   त्यांच्या अनेक कलाकृतींचा बोलबाला/आढावा घेतला गेला. एका कवीचे एवढे रसिक, चाहते आणि समीक्षकांनी केलेले कौतुक बघुन खुप छान वाटले. माझेही आवडते शायर, गीतकार,दिग्दर्षक आणि निर्माते असे हे व्यक्तिमत्व एकदम साधे आणि बहुआयाम  असुन अगदी तरुण पिढिचेही ते आदर्ष आहेत. माझ्या आधीच्या पिढिचे असुनही त्यांनी सगळ्यांनाच त्यांच्या गझल गाण्यांनी,चित्रपटांनी आणि उमदे व्यक्तिमत्वामुळे प्रसिद्ध झाले.         मराठीत गझल म्हणजे एक प्रकारे भावगीतच म्हणावयास हवे. आपल्याकडे सुरेश भट, भाऊसाहेब पाटणकर,भीमराव पांचाळे आणि आताचे गुरु ठाकुर यांची या क्षेत्रातली कामगिरी उल्लेखनीय आहे. उर्दुतली कविता/शायरी म्हणुन आपण जरी ओळखत असलो तरी मुळ उगमस्थान पर्शियन लोकांची ही कला असे म्हणावे लागेल. प्रेम,जीवनावरची आसक्ती आणि अध्यात्म असा मुळ गाभा असलेली ही कविता/नग्म/शेरो-शायरित कधी मैफिलीत दाद मिळवुन जाते तर कधी वास्तवाची जाणीव करुन देते. कमी शब्दांत कुप काही मतिथार्त सांगुन कविला व्यक्त...

अर्थशास्त्र आणि अध्यात्म

Image
                  माझा आवडता विषय अर्थशास्त्र,शिक्षण,नोकरीही त्यातच असल्यामुळे जास्तच आवडायला लागला. दैंनंदिन   आयुष्यातही   हा महत्वाचा घटक आहे हे आपल्या लक्षातच येत नाही. काही जणांना किती “कंटाळवाणा”विषय आहे असे वाटु शकेल. समृद्ध आणि सुखी आयुष्य जीवन जगण्यासाठी ह्याचा अभ्यास सगळयांनाच थोडा आवश्यक आहे असे मला वाटते. अर्थशास्त्र म्हणजे काय रे भाऊ? असे विचारले तर साधे उत्तर असे सांगता येईल. “पैशाबाबत आणि इतर आनुषंगिक बाबींची सांगड घालणे.”  एखाद्या देशाची, कुटूंबाची किंवा अगदी व्यक्तीचासुद्धा दर्जा यावरुन ठरविला जातो.               वाणिज्य शाखेत,एम.बी.ए. करताना अगदी विज्ञानातसुद्धा याचा अभ्यास केला जातो. ज्यात साधने आणि त्याचा जास्तीत जास्त वापर,बॅंका,विमा,पैसा आणि इतर अनुषंगिक व्यवसायांचाही अंतर्भाव असतो. व्यापार,उद्योग,व्यवसाय,धंदा आणि नोकरीतसुद्धा याचा अभ्यास करावा लागतो. प्राधान्य आणि संधीचा सुयोग्य वापर साधुन सामाजिक समतोल साधणे हा एक मुख्य हेतु आहे. सेवा,उत्पादना...

आनंदाचे झाड

                “ आनंदाचे झाड” ही कल्पनाच किती छान आहे ना! कोणतेही झाड आपल्याला आनंदच देत असते. नि:स्वार्थ जगणे हे माणसाने झाडाकडुनच शिकावे. माझ्या आयुष्यात तशी आनंद देणारी अनेक झाडे येऊन गेली. सगळ्यांचा उल्लेख करणे शक्य नाही मात्र या माणसांमुळेच माझे जगणे समृद्ध झाले हे नक्किच आणि त्यासाठी परमेश्वराची कृपाच आहे असे म्हणावे लागेल. त्यातल्या त्यात जवळचा उल्लेख करावयाचा झाल्यास आमच्याच घरातले काका,काकु आणि आता भाऊ-वहिनी यांचा करावा लागेल. काका-काकुंचा सहवास तसा 19 आणि 23 वर्षेच लाभला पण भाऊ आणि वहिनींचा गेली 50-55 वर्षे लाभत आहे.                 एक डॉक्टर आणि एक भाऊ म्हणुन अत्यंत शांत स्वभाव, मनमिळावु तसेच त्याच्या वागण्यातुन आदरयुक्त मोठेपणा जाणवतो. मुख्य म्हणजे त्यांनी खेड्यात प्रॅक्टिस करण्याचा वडिलांचा वारसा सार्थपणे पुढच्या पिढीलाही सोपवला हे जास्त कौतुकास्पद वाटते. त्याला साथ देणारी वहिनीही तशीच शिस्तीची आणि मनमिळावु आहे आणि दोघांनीही गेली 40 वर्षे रुग्णसेवेला सतत वाहुन घेतलेल...

एक होते झाड

Image
                  नुकतेच“ मारुती चितमपल्ली”अरण्यऋषी यांचे निधन झाले,ऐकुन वाईट वाटले. अशा असमान्य व्यक्तींचे निधन मनाला चटका लावुन जाते. जसा “एक होता कार्वर” तसेच एक होते “चितमपल्ली” असे आता म्हणावे लागेल. त्यांचा अभ्यास,निरिक्षणशक्ती आणि जंगलावरील प्रेमाबद्दल एक आम्हाला धडा होता त्यावरुन त्यांची ओळख झाली. नंतर जेव्हा जेव्हा आमचा जंगलात फिरण्याचा योग आला तेव्हा तेव्हा हा अभ्यास किती महत्वाचा आणि मनोरंजक, उत्कंठावर्धक आहे याची जाणीव आहे. तसे बघायला गेले तर “निसर्गाच्या प्रेमात”न पाडणारा माणुस विरळाच म्हणावा लागेल.               “अरण्यऋषी” हा किताब मिळण्याएवढे त्यांचे उत्तुंग व्यक्तीमत्व एकदा त्यांची मुलाखत ऐकली तेव्हा दिसले. वनाधिकारी म्हणुन नोकरी पत्करल्यानंतर श्री.चितमपल्ली सरांनी आयुष्याची 73 वर्षे एवढा काळ घालविला. जंगल, प्राणीजीवन पक्षीजीवन,मत्स्य जीवनावर आधारित कोष तयार करणे हे सोपे काम नाही. पुढिल पिढिला त्याचा उपयोग व्हावा, त्यात भर घालावी, केवढी ही तळमळ आणि ओढ! बारकावे रेखाट...