Posts

Showing posts from September, 2022

सोयरे-सहचर

Image
        26 ऑगस्ट, 2022 रोजी  पोळा साजरा करण्यांत आला त्यानिमित्ताने वर्षभर राबणा—या  बैलांना एक दिवस आराम मिळून मालकाच्या हातचे चांगले पुरणपोळीचे जेवण मिळाले असेल. माझ्या नात्यातील मुलगी पहिल्यांदा ज्या कंपनीत नोकरीला लागली ती कंपनी केवळ प्राण्यांसाठी बनविलेल्या वस्तुंची निर्यात करीत असे. ऐकून आणि पाहून आश्चर्यच वाटले. (गादी, गालिचा, तक्क्या, टेकुन बसायला उशी, झोपायला फरचे पांघरुण असे वेगवेगळे महागडे प्रकार) प्राण्यांचा पोशाख तर बनवितातच. प्राण्यांच्या वाढदिवस स्पर्धा, फॅशन शो करण्यासाठी लागणा-या वस्तू पाहून आश्चर्य वाटले. प्राण्यांच्या  बाल-लीला, मनुष्य-प्रेम, कार्टून यांची वेगवेगळे व्हिडिओज बघायला मजा वाटते.            आपली संस्कृतीच एवढी महान आहे की, पशु-पक्षी हे आपले सोयरे-सहचर समजूनच एकत्र गुण्या-गोविंदाने नांदत होते. अजूनही गांवा-गांवात गाय, बैल, कुत्रा-मांजर, पोपट-कोंबड्या असे प्राणी पाळले जातात.  शहरात जागा लहान असुनसुद्धा कुत्रा, मांजर, पोपट-मैंना, लव-बर्डस, कासव,  ससे असे वेगवेगळे सहचर राहतात. त्यांची ए...

अमुचा राम-राम घ्यावा..

Image
              नुकताच गणपती विसर्जनाचा सोहळा पार पडला. त्यानिमित्त स्वत: गणपतीची मुलाखात घेतली तर त्याचे काय म्हणणे असेल? याचा घेतलेला एक आढावा.              श्री गणपतीचे धुमधडाक्यात झालेले पुनरागमन आणि विसर्जन दोन्ही एकाच डोळयात आसू आणि हसू याचे समिश्र मिश्रण आहे. आराध्य देवतेचा मान, बुद्धीची देवता म्हणून मिळालेली अगदी परदेशात देखील मला आवर्जुन सोबत नेणारे भक्तांची ओढ बघून खुप आनंद होतो. त्यानिमित्ताने होणारी एकमेकांकडे जाणे-येणे, भेदभाव विसरुन एकत्र येणे, कला-गुणांची होणारी ऊधळण आणि उत्साहाने सर्व काही भक्ती-भावाने साजरे करणे हे मला खूप आवडते. दरवर्षी “पुन्हा लवकर या” ची विनवणी करुन बोलवत असता म्हणून मला यावे लागते. कधी याचाही अतिरेक होऊ नये म्हणून   मला तुम्हा सर्वांना एक विनंती आहे.                 सणाच्या नावाने वारेमाप खरेदी, उत्साह आणि गोड पदार्थांची रेलचेल असते. पुर्वी भरपुर कष्टाची सवय असलेला माणूस आज आळशी बनत चालला आहे.   सारखे तेलकट, ...

संसाराची ऐशीतैशी...

Image
               फेसबुक वर जेव्हा उन्नती गाडगीळांच्या कथा/लेख वाचते तेव्हा मला नेहमी प्रश्न पडतो की एवढे सगळे मॅडमना चांगलेच/सकारात्मक कसे सुचते? त्यांना कधीच नैराश्य किंवा वेदना झाल्या नसतील का? दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सकारात्मक ऊर्जा त्यांना कदाचीत हे सर्व करायला भाग पाडत असतील. “चांगले पेरा, चांगलेच ऊगवेल” अशी धारणा असणारे आपण काही वेळा “असे कसे झाले” यावर विचार करायला भाग पाडतात. खालील अनेक प्रसंग तुम्हालाही असेच सुचवतील असे वाटते.            प्रसंग-1:- जगाच्या दृष्टीने सुखी चोकोनी कुटंब, दोन सुंदर मुली, सासुरवास नाही. आई सावळी, नोकरीवाली असूनही त्यांना घरी आल्यावर आईचे हातचे गरम गरम कधीच खायला मिळाले नाही. आवडत नाही म्हणून कधीच आईने “excuse”   दिला नाही असे म्हणतात. मग काय या मुली हवापाणी खाऊन मोठया झाल्या का?            प्रसंग-2:- माहेरची श्रीमंत त्यामुळे नोकरी आवडत नाही, कामाचीपण आवड नाही.    मुले मोठी झाल्यावर त्यांना वेगवेगळे प्रकार खावेसे वाटायचे. मग ती त्यांना पैसे...