Posts

Showing posts from July, 2026

ह्दयस्थ गुरु-भाग-2,(गुरुपोर्णिमेच्या निमित्त्याने) :-

       भाग-1 मध्ये आपण गुरुचे महत्व,प्रकार आणि स्वरुप बघितले. आता आपण श्री.दत्तगुरुंचे मंदिर, उगमस्थान आणि भक्तीचे प्रकार पाहुया. प्रत्येकाच्या क्षितीजावर नेहमीच”गुरु” उदयाला येत असतो. वेगवेगळ्या स्वरुपात जन्मापासुन मृत्यूपर्यंत कोणत्या ना कोणत्या गुरुचा आधार/मार्गदर्श्न घेतल्याशिवाय व्यक्तिची प्रगती/उत्क्रांती होणे शक्य नाही अगदी शस्त्र,शास्त्र आणि कलेच्याबाबतीत देखील. त्यासाठी लागणारी श्र्द्धा व भक्ती मात्र प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. पशुंच्याही अंत:करणात अन्नदात्या स्वामींविषयी पराकाष्टेची भक्ती असते. संत,गुरु हे सगळे सर्व सामान्य लोकांच्या मनात भक्ती,  श्रद्धा जागविण्यासाठी सदैव कार्यरत असतात. त्यांच्या मनातली अंधश्रद्धा दुर करुन ख-या प्रेमाची /परमेश्वराची ओळख करुन देणे. त्यांना चांगल्या मार्गावर आणणे,अज्ञान दुर करणे अशा अनेक मार्गाने समाजोन्न्तीसाठी प्रयत्न करणे.भगवान श्री. दत्तात्रेयांची जन्म-कथा सगळ्यांना माहित आहेच. या अवतारात भगवानांची तीन मुखे आहेत जी रज, तम व सत्व गुणांची तर ब्रम्हा,विष्णु व महेशांची शक्ती एकवटलेली दिसुन येईल. महाराष्ट्र, कर्नाटक,...

श्वास भाग-2 ( ब्रम्हविद्या आणि प्रकाशयोग)

पहिल्या भागात आपण श्वासाचे महत्व आणि तो कसा प्रत्येकाला आवश्यक असतो हे बघितले. या भागात आपण तो कसा कमवावा,शुद्ध असावा आणि प्रकाशयोग म्हणजे काय? हे आपण आपले जीवन कसे उजळुन टाकावे याबाबतचा परिचय करुन घेऊया. आपण घरात रोज झाडु मारतो घर स्वच्छ राहण्यासाठी पण दिवाळी किंवा इतर वेळी कसा काना-कोपरा शोधुन शोधुन साफ ठेवतो. तसेच काहीसे श्वासाबाबत आपण करावयास हवे. प्रकाश योगादवारे आपण आपल्यातच असलेली शकती शोधणे.  श्वासाकडे लक्ष देऊन/निरिक्षण करुन त्याप्रमाणे सजगतेने श्वास घेणे, त्याचे प्रकार,अष्टांग मार्ग ,चकरे पृजवलीत करणे, अंमलात आणणे आणि जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक, आध्यात्मिक दृष्टिकोन वाढीस लावणे हे ब्रम्हविद्येचे मुख्य कार्य आहे. प्रकाशयोग हा आपणच आपला उद्धार कसा करुन घेणे हे शिकणे/शिकविणे/समजुन घेणे होय.      10 वर्षांपुर्वी मी हे शिकण्याचा प्रयत्न केला होता,आता पुन्हा एकदा उजळणी करण्यासाठी या वर्गाची सुरुवात केलीय. ब्रम्हविद्या ही एक आध्यात्मिक,शारीरिक,मानसिक प्रगतीसाठी लागणारे एक शास्त्र किंवा तंत्र असे म्हणता येईल. 1200 वर्षांपासुन गुरु-शिष्य परंपरेने हे ज्ञान शिकविले...

तुझसे नाराज नही जिंदगी,हैरान हु…..परेशान हुं!

Image
         “मासुम” चित्रपटातले हे गाणे माझे आवडते तर आहेच पण जीवनातले सत्य उलगडते. अर्ध्यापेक्षा जास्त वय उलटुन गेल्यावर हे असे वाटणे साहजिकच आहे. कधी कधी विचारात पडणारे प्रसंग  आठवले कि, हे गाणे अलगद ओठांवर येते. विशेषत: काही माणसे अशी का वाग़तात याचे न उलगडणारे कोडे वाटते. तुम्हालाही असेच वाटते का? 1) राजकारण,पैसा, सत्त्ता माणसाला बिघडवते पण यापेक्षा परिस्थितीमुळे जास्त माणुस बदलतो असे मला वाटायला लागलेय. 2) एखादा माणुस असा वागणारच नाही असा आपल्याला अगदी आत्मविश्वास वाटत असतो पण ऐनवेळी काहीतरी वेगळेच सत्य समोर येते. 3) तरुणपणात उरी बाळगलेली स्वप्ने यथावकाश काळाच्या ओघात नष्ट होत जातात पण इच्छा-आकांक्षा मात्र संपत नाहीत. 4) काहिजण अती बोलतात त्र काहिजण आवश्यक असेल तेव्हापण बोलत नाहित. 5) ब्लोग्वर, सामाजिक माध्यमावरिल प्रतिसाद बघुन तर हसावे कि रडावे हेच कळत नाही. 6) काहिजण जुने विचार,गैरसमज, तत्वे एवढे उराशी बाळगतात कि, जग कुठे चाल्ले आहे याचे त्यांना भानच नसते. 7) दु:खाचे भांडवल करुन इतर चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष होते आहे हे कळत नाही आणि कुण...

2025-26 चा गोषवारा( जुलै-25 ते जुन-26)

       2026 च्या सुरुवातीलाच अमेरिकेला गेल्यामुळे मागच्या वर्षीचा गोषवारा काढायचा राहुन गेला. देर आये ....यानुसार आता नवीन सहकार पद्धतीने काढु म्हणुन लिहावयास बसले. आता तसे काही आर्थिक फायदे/तोट्याचे गणित मांडायचे नाही तरी पण गेल्या वर्षभरात काय काय झाले याचा एक ओझरता आढावा घेतला की बरे असे वाटते. कार्यालयीन सवयीचा परिणाम एक असाही. तसे तर योगात,आध्यात्म्यात रोज रात्री झोपतांनाच दिवसभराचा आढावा घेण्यास सांगतात पण आपण ऐकतो कुठे! आता निवृत्तीनंतर काहीतरी कारण लिहावयास हवे ना!        गेल्या जुलैपासुन सुरुवात करुया. आजी होणार म्हणुन बातमी कळली तसे आनंद आणि काळजी दोन्ही बरोबरिनेच होते. आता काय  करणार? या मोठ्या प्रश्नाचे उत्तर विमा-उद्योगात सामील व्हायचे ठरविले आणि डोक्याला चालना मिळाली. एक नवीन  आव्हानात्मक क्षेत्राची ओळख आणि भाग होता आले याचा आनंद तर झालाच. त्यानिमीत्त्याने नवीन ओळखी, समस्या,उपाय याचेवर चर्चा,परिसंवाद,ट्रेनिंग घेऊन,व्याख्याने ऐकुन पुन्हा एकदा स्पर्धात्मक (संगणकिय) परिक्षेत चांग़ल्या मार्काने उत्तीर्ण झाल्यामुळे अजुन अभ्यास क...