Posts

Showing posts from December, 2024

वाह, ताज- उस्ताद टाटा ते मनमोहन-- बाय बाय

Image
अ)   उस्ताद झाकीर हुसेन              लहानपणी चहाच्या जाहिरातीतील उस्ताद झाकीर हुसेन जेव्हा प्रत्यक्ष मैफलित भेटू लागले तेव्हा जास्तच आवडू लागले होते. वडीलांमुळे नकळत्या वयातसुद्धा अनेक सांगितिक मैफिली मला पाहायला/ ऐकायला मिळाल्या. त्यातल्या गाण्यांपेक्षा वादनावर माझा जास्त भर होता. अशा अनेक मैफिलीतून उस्तादांची ओळख तबल्यामुळे होत गेली. त्यांचे चेह-यावरचे भाव, बोटांचे नर्तन बघायचे की कानाने त्यांचे, तबल्याचे बोल ऐकायचे अशा संभ्रमात मी पडायचे. विशेष करुन उतार-चढाव-जुगलबंदी - (सतार, सरोद आणि संतूर बरोबरची ) मनसोक्त मनोसक्त भिजायला व्हायचे. मृदुंग, घटम आणि पाश्चिमात्य वाद्यांबरोबर ते जास्त खुलून जात. त्यांचे मृदु बोलणे, साधी राहणी आणि आकर्षक व्यक्तिमत्व खुपच आवडायचे.          त्यांनी केलेले अनेक सांगितिक प्रयोग, फयुजन आणि वेगवेगळे बंदिशीला गेटवे ओफ इंडियानेसुद्धा दाद दिली असेल. ते वादन वातावरण अगदी भारुन टाकायचे. असा हा कलाकार   कलेशी एकदम प्रामाणिक आणि सच्चा होता. त्यांचे अनेक...

माझी/आमची आध्यात्मिक वारी-भाग-2

               मागच्या वर्षी भाग-1 मध्ये गिरनार, द्वारका आणि सोमनाथ अशी त्रिस्थळी यात्रेचे वर्णन आपण सगळ्यांनी वाचले असेलच. आता यावेळि आमची अचानकच 3 वेळा 3 ठिकाणे अध्यात्मिक यात्रेची झाली. पहिले ठिकाण ओक्टोबर-मध्ये गोवा-म्हार्दोळ,कुलदेवतेला मूलिसकट झाली. यांचा 60 वर्ष पुर्ण आणि मुलिचे लग्नानिमित्त अशी 3 दिवस ही यात्रा नेहमीच माहेरपणासारखी वाटते. राहणे,खाणे, फिरणे आणि येऊन झोपणे एवढेच काम. उरलेल्या वेळात देवीचा उत्सव, आरती आणि भजन वगैरे असतेच. एकुणच वातावरण आल्हाददायक आणि भक्तीमय असल्यामुळे खुप छान वाटते. त्यात लेकिने साडी,मी नववारी आणि यानी पितांबर नेसले होते,तिही हौस पुर्ण झाली. आधी ठरवुन गेल्यामुळे व्यवस्थित राहणे आणि दर्शन व पालखी बघावयास मिळाली.              दुसरे पाहुण्यांमुळे शिर्डिला जाण्याचा योग अचानकच आला. 2 दिवसात शिर्डी, शनी शिंगणापुर व परत असे धावता दौरा करावा लागला. 20-22 वर्षांनी गेल्यामुळे सगळे एकदम   वेगळेच वाटत होते. बहुमजली धर्मशाळा आणि मोठा मं...