Posts

Showing posts from June, 2025

स्थलांतरीत जीवन

Image
            दरवर्षी कित्येक मैल प्रवास करुन शिवडी,ठाणे येथे वेगवेगळे पक्षी( फ्लेमींगो,सिगल, माळढोक,..) येतात आणि आपण मुद्दाम त्यांना पाहायला आपण देखील जातो. काय असेल ना त्यांची जिद्द,चिकाटी कि हवामानामुळे नाईलाज म्हणुन येत असावेत. शासनातर्फे,वेगवेगळ्या राज्यांतर्फे,देशातर्फे अशी पक्षी,प्राण्यांची देवाणघेवाणही आपापसांत होत असते. जसे राणीबागेत पेग्विन आले किंवा चित्ते, सिंह यांनाही बाहेरुन आणले जाते. एकतर त्यांची पैदास येथे होऊन इथला निसर्ग समतोल राखला जावा तसेच आपापसातील राजकीय,आंतर-राष्ट्रीय संबंधही प्रस्तावित व्हावेत हाही एक हेतु असतो. नेहरुंनी तसे एक हत्तिचे पिल्लू जपानला भेट दिले होते म्हणे. तर असे हे प्राणी-पक्षी आणि माणुससुद्धा स्थलांतर करीतच असतो. गरिबी हे एक प्रमुख कारण असले तरी आरोग्यसेवा आणि शिक्षण सुविधांचा आणि वाढती लोकसंख्या असे इतर घटक लोकांना स्थलांतर करण्यास प्रवृत्त करतात. नैसर्गिक आपत्ती जसे कि, पुर,चक्रिवादळ,दुष्काळ,भुकंप व अशांतता( दहशतवाद) हेही कधी कधी मानव व   पशु-पक्षी स्थलांतरास भाग पाडतात.       ...

संत ज्ञानेश्वर

Image
                लहानपणी “संत ज्ञानेश्वर” चित्रपटाची आठवण झाली जेव्हा नुकताच“संत ज्ञानेश्वर आणि मुक्ताई”मराठी चित्रपट बघितला. यावर्षी जानेवारित पंढरपुरलाही जाऊन आले तरी अजुन आपण संत ज्ञानेश्वरांबद्दल कसे लिहिले नाही? नुकतीच वारीचीही सुरूवात झाल्यामुळे आता हा लेखनप्रपंच. संत परंपरा ही भारताला/महाराष्ट्राला मिळालेली अनमोल देणगी आहे असे मला वाटते. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे ही आद्य दैवते/“संतांचे गुरू” असेही म्हणता येईल. “गुरु-माऊली” म्हणण्याची प्रथा त्यांच्यामुळेच पडली असावी. संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला “ज्ञानेश्वरी”,“अमृतानुभाव”, पसायदान आणि त्यांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या रचना, तसेच वारीची प्रथा सुरू करुन विट्ठलाची निस्सिम भक्ती,आध्यात्मिक ओढ आणि सर्वसामान्य जनतेला“वाली”मिळवुन दिला. पंढरपुर हे तीर्थक्षेत्र म्हणुन नावाजले गेले अगदी “कानडा विठ्ठलु” कर्नाटकाचा असुनही महाराष्ट्रात रमला. भक्तांनीही त्याला आपला” देव”मानुन सदैव त्याची भक्तीच केली.                 “संन्याशाची पोरे”म्हणुन हिणवले जा...

अभिनव भारत ही एक संकल्पना

Image
                                               जयोस्तूते जयोस्तुते...                                       वंदे त्वामहं यशोयुतां वन्दे!                                  2)   ने मजसी मातृभुमीला... सागरा प्राण तळमळला...               स्वा.वीर सावरकरांनी लिहिलेले, लता मंगेशकर आणि सर्व बन्धु-भगिनीने गायिलेले   ही  स्फुर्तीगी ते  शाळेत असतांना आम्ही गायचो तेव्हा ऊर अभिमानाने भरुन यायचा. आता तर मराठी शाळाच बंद होत आहेत त्यामुळे हे गाणे गात असतील की नाही माहित नाही. शाळेत मुलांना स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पण बोलवत नाहित हे ऐकुन आश्चर्यच वाटते. आम्हाला मात्र हे दोन दिवस अशी गाणी स्वत: म्हणुन दाखवायची एकमेव संधी मिळा...

चित्र पताका-2025

Image
                               मे महिन्यात एक   आंतरराष्ट्रिय मराठी चित्रपट महोत्सव“चित्र पताका-20025” या नावाने बघण्याचा/अनुभवण्याचा योग आला. पुर्वी अशा महोत्सवाचे कार्यालयामार्फत पासेस मिळत असल्यामुळे असे महोत्सव बघणे हा एक सुंदर अनुभव असतो. या महोत्सवात अगदी सलग 64 चित्रपट दाखविण्याचा प्रयत्न केला गेला. नक्किच कौतुकास्पद होते आणि मराठी चित्रपटाचा उद्धार करण्यासाठी उचललेले हे पाऊल सगळ्यांनाच उत्साहवर्धक आणि प्रोत्साहनात्मक ठरो ही आशा. मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे आता तरी लोक मराठीकडे वळावेत. वेगवेगळे विषय, त्याचे नियोजन, प्रसिद्धी, परिसंवाद आणि चर्चासत्रे व सर्व-सामान्य मराठी कलाकाराची होणारी धडपड यासाठी हे सगळेच छान आकर्षक वाटले. नवीन युवक वेगवेगळी जोखीम घेण्यास उत्सुक आहेत हेही येणा-या प्रेक्षकवर्गातुन आणि विद्यार्थ्यांकडे/युवकांकडे बघुन दिसत होते.             पहिला मुकपट आणि मग बोलपट/भारतात आणणारे (परदेशात जाऊन त्याचे प्रसिक्षण घेणारा)चित्रपट बनविणारा एक मराठी म...

शापित पांडव/ कौंतेय/ सूर्यपुत्र?

Image
              अमेरिकेत असताना इकडे निघायच्या अगदी 8दिवस आधी माझ्या हातात“मुत्युंजय”हि कादंबरी आली आणि मला अगदी वाचल्याशिवाय राहवेना. मी शाळेत असल्यापासुन या कादंबरीच्या प्रेमातच आहे. दरवर्षी बेळगावला गेले कि,याचे वाचन हे एक नित्य कर्म असे. तेव्हापासुन अनेकवेळा वाचुनही प्रत्येकवेळी तेवढीच उत्सुकता असायची. मुलीनेपण कॉलेजमध्ये असताना ही कादंबरी वाचली होती. लेकिला खरे तर “छावा”आणायला सांगितले होते,तिला मिळाली नाही,त्याऐवजी तिने ही कादंबरी आणली. मग काय माझे रात्रंदिवस हे वाचन सुरू झाले,जुने दिवस आठवले आणि वाचनात अगदी रमुन गेले.               “कोहम”(मी कोण आहे) या एका प्रश्नाने कायम चिंतेत असलेला आपला हा दुर्दैवी नायक कायम सुर्यपुत्राऐवजी जेव्हा जेव्हा “सुतपुत्र”म्हणुन हिणवला जातो तेव्हा तेव्हा आपल्याला सगळ्यात जास्त वाईट वाटते. जन्मजात मिळालेली कवचकुंडले आणि जन्म-रहस्य अशावेळी कळते तेव्हा कळुनही काही उपयोग होणार नसतो. आपण उच्च कुळातील असुनहि केवळ दुर्दैव/नाईलाज म्हणा किंवा समाजहित लक्षात घेऊन मौन बाळगणारा हा खरा पुत्र शोभत...