Posts

Showing posts from May, 2024

जल पर्यटन-एक साहस व कुतूहल

Image
           धाकट्या मुलीचे अमेरीकेत नॉर्थ केरॉलिना येथे  ” पदवीदान समारंभ ” झाल्यावर “ साजरा करणे ”  मंगता है ना! आधीच मोठ्या मुलीने त्याची व्यवस्था करुन ठेवली होती. अमेरीकेत फ्लोरिडाला 5 दिवस क्रुझचे बुकींग.  6 मेला नॉर्थ केरॉलिनातून  फ्लोरिडाला विमानाने निघालो. तेथून ओर्लांडो विमानतळावरून 1 तासाच्या प्रवास करून  क्रूझसाठी रवाना झालो. जेव्हा मुलीने हे सांगितले तेव्हा “ मी कशी येणार, मला पाण्यापासून भीती आहे ना ” ( पायाळू असल्यामुळे), असे म्हटल्यावर तिचे उत्तर ऐकून हसावे की रडावे तेच कळेना! भारतात तुला धोका असेल, परदेशात नसावा, बघुया काय होते ते! एकीकडे भीती तर दुसरीकडे कुतुहल असे माझी दुविधा मन:स्थिती  होऊन मी जरा तणावातच होते. देवाचे नाव घेऊन  “ Allure of Sea ” या 17 मजली बोटीत चढले, बघू पुढचे पुढे म्हणून!        6 मे. 2024 रोजी तारखेला दुपारी 2.00 वाजता “ Allure of Sea ” या बोटीत प्रवासाचे सर्व सोपस्कार करुन आम्ही सर्वजण     7 व्या मजल्यावरील आरक्षित केलेल्या खोली क्रमांक ...

परदेशी शैक्षणिक महोत्सव-2024

Image
           छोट्या मुलीच्या नॉर्थ कॅरोलीना विद्यापीठातील पदवीदान समारंभासाठी अमेरिकेत येण्याचे प्रयोजन होते. त्यासाठी मोठ्या मुलीच्या सॅन फ्रेंन्सिको येथील घरी आलो. तेथे मुली कडील प्रेमळ पाहुणचार 20 दिवस घेतल्यानंतर नियोजन केल्यानुसार विमानाचे धाकट्या मुलीच्या “ पदवीदान ” समारंभासाठी मोठ्या मुलीसोबत नॉर्थ कॅरोलिना येथे आलो. त्याप्रमाणे आम्ही 2 मे, 2024 तारखेला निघून  4 तासाच्या प्रवासानंतर 3 मे, 2024 रोजी उत्तर कॅरोलिना, रॅली येथे सकाळी 8.00 वाजता घरी पोहोचलो.  मोठ्या मुलीने कॅरोलीना मधील वास्तव्यासाठी एक गाडी 3 दिवसासाठी भाड्याने घेतली होती. अमेरीकेत ओला / उबेरपेक्षा गाडी भाड्याने घेणे त्यामानाने स्वस्त पडते. अमेरिकेत गाडी भाड्याने घेतात आणि स्वत: चालवतात.  छोट्या मुलगी साबुदाणा खिचडी आणि चहा तयार ठेऊन वाटच पहात होती. खाऊन झाल्यावर आंघोळ आणि छान साडी व मुली ड्रेस घालून तयार झाल्या. नॉर्थ कॅरोलीना विद्यापीठातील दुपारी 1.00 वाजताचा पदवीदान कार्यक्रम बघण्यासाठी घरून 12.30 ला निघालो. तिथे गेल्यावर ( कॉलेजचा) एका सभागृहात मोजक्याच विद्यार्थ्यांसो...

जीभेवरील शब्द

Image
            नुकतीच एक गोष्ट वाचनात आली, ” जीभेवरील शब्द ”  कथेचा सारांश असा होता की, कथेचा नायक एक “ बांगडी विक्रेता ” असतो आणि बांगड्याचे ओझे एका गाढवीवर लादून गावोगावी फिरत असतो.  रस्त्यातून चालतांना तो आपल्या गाढवीबरोबर बोलताना कायम “ राणी-बेटी ” म्हणुन संवाद साधत असतो. सगळ्यांना आश्चर्य वाटत असते की, हा काय असा बोलतो आणि का बोलतो? न राहवून एकजण त्याला धीर करून एक दिवस  विचारतो की गाढवीस “ राणी-बेटी ” अशी का हाक मारतो.  तर त्याचे  बांगडी विक्रेत्याचे उत्तर विचार करण्यासारखे आहे. माझ्या धंद्याशी संबंध नेहमी बायका/मुलींशी येतो, चुकून जरी माझ्या तोंडून अपशब्द आल्यास माझा धंदा बुडू शकतो शिवाय माझ्या जीभेला तशी चांगली सवय लागणे महत्वाचे जेणेकरुन कधीही माझ्याकडून कोणाचाही अपमान होऊ नये एवढीच माफक अपेक्षा. खरेच किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे.           काहीजणांच्या तोंडात कायम शिव्याच असतात किंवा तर काहीजण कायम अरे-तुरेच्या भाषेतच बोलतात. जरा काही मनाविरुद्ध झाल्यास अगदी स्वत:चे शिक्षण, वय, दर्जा विसरुन ...

रामराज्य, गणराज्य की स्वराज्य?

Image
              दि.  23-1-24 रोजी   “ न भुतो ना भविष्यती ” असा धार्मिक सोहळा अयोध्या येथे पार पडला. सगळा भारत हा सोहळयानिमित्त भक्तीमय झाला होता. नविन वर्षातली रामनवमीसुद्धा जोरात साजरी झाली. गुढी-पाडव्या पासून सुरु होणारे हिंदु नववर्ष ख-या अर्थाने साजरे केले जात होते. अशा वेळीही काहीजण बोटे मोडीत होती तर काहीजण राजकीय रंग देऊ पाहात होते. त्यानिमित्त एक सिध्द  झाले की, सर्वसामान्य लोकांना काय पाहिजे? कोणताही धर्म देशापेक्षा मोठा नसतो. लोकांना एकत्र आणणे जसे आता कठीण आहे. तसेच तेव्हाही (प्राचीन काळी) होते. त्यातून मार्ग काढण्यासाठीच हे उत्सव, सण आणि निसर्गाची सांगड घालुन साजरे करणे हे मानवापुढे एक आव्हान ठेवण्यांत आले होते. त्यातुनच मग आदर्श  कसा असावा यासाठीचे ग्रंथ निर्माण झाले रामायण आणि महाभारत. रामायण तर घडण्याआधीच लिहिण्यात आले होते असे सांगितले जाते. म्हणजे बघा,  किती दुरदृष्टी त्यावेळच्या ऋषिमुनींमध्ये होती.             रामाप्रमाणेच “ आदर्श ” असे रामराज्याचा उल्लेख केला जातो. जिथे एका धोब्...