Posts

Showing posts from March, 2023

रांगोळी- एक कला

Image
              “रंगोली” हा एक हिंदी चित्रपट गाण्यावर आधारीत कार्यक्रम रविवारी सकाळी 8.00 वाजता दुरदर्शनवर असतो. सन 1985 पासून जेव्हा टि.व्ही. आमच्या घरी आला तेव्हा किती कौतुक होते प्रत्येक कार्यक्रमाचे!  छायागीत, रामायण, महाभारत, हमलोग,  फुल खिले है गुलशन गुलशन, गजरा, प्रतिमा आणि प्रतिभा, नाटक, चित्रपट ( मराठी, हिंदी, बहुभाषिक, पारितोषिक विजेते ) असे अनेक कार्यक्रम वेळात वेळ काढून घरातले सगळेचजण बघायचे. त्यात विशेषत: “रंगोली” खूप आवडायचा.  हा कार्यक्रम मुंबई दुरदर्शनतर्फे दिल्ली दुरदर्शनवरुन राष्ट्रीय पातळीवर सर्वत्र प्रसारीत होतो. हेमामालीनीपासून ते आताच्या ऋषिता भटपर्यंतच्या सर्व अभिनेत्रींनी  रंगोलीत निवेदन करीत असतात. रंगोली कार्यक्रम हा चित्रपट विश्वातील माहीती, जुनी गाणी, मनोरंजन, अनेक किस्से, घडामोडी, प्रासंगीक, विशेष म्हणजे  श्रोत्यांचे पत्रवाचन, प्रश्नावली व श्रोत्यांची हिंदी चित्रपट गाण्याची आवड पुरी करणे अशा अनेक विवीधतेने समृद्ध असा हा कार्यक्रम आहे. आता ती मजा थोडी कमी वाटते एवढेच. (वयपरत्वे असावा). य...

वेळेची चोरी (Time Theft)

Image
                     “प्रत्यक्ष” वृत्तपत्रामधील एक बातमी लक्षवेधी होती. “करोनाकाळात कार्यालयीन वेळेची चोरी केल्याबद्दल एका महिलेविरुद्ध दंडात्मक कार्यवाही” अर्थात परदेशातील बातमी होती. संगणकीय नोंदीनुसार आणि कामाच्या निपटा-यावरुन सदर महिलेला दोषी ठरविण्यात आले होते. घरुन काम करीत असताना “वेळेची चोरी” (वैयक्तिक/घरगुती काम करण्यासाठी वापरल्यामुळे) / वेळेचा अपव्यय या सदरात “गुन्हा घडला” असा निष्कर्ष काढण्यात आला. भारतात हा नियम लावल्यास किती सापडतील याची गणना न केलेलीच बरी! काही दिवसांनी हे आपल्याकडेही होईल, तेव्हा वेळीच सावध झालेले बरे!   काहीजण काम टाळण्यासाठी वेळ घालवीत असतात मग ते काम दुस-याला मिळाल्यावर वाईट वाटते म्हणूनच वेळेची गरज ओळखणे महत्वाचे!   वेळेवर उपचार घेणे / सल्ला घेणे हेही आवश्यकच असते. वेळ पाळणे, वेळेवर खाणे-पिणे, झोपणे आणि माघार घेणे हे गुण काळाच्या पुढे जाण्यास उपयोगी ठरतात.            यातील गंभीर भाग सोडला तरी आपण महिला अशी “वेळ चोरण्यात” माही...

स्त्री म्हणजे...

Image
            Woman म्हणजे Wonderful wife, Outstanding friend, Marvelous daughter, Adorable sister & Nurturing mother होय. निसर्गाला पडलेलया एका सुंदर स्वप्नाची प्रतीपुर्ती आहे. विधात्याने सृष्टीचक्र पुढे चालू ठेवण्यासाठी, जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी स्त्रीची निर्मीती केली.  "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः" जेथे स्त्रीची पुजा होते, तेथे देवतांचा निवास असतो. एक स्त्री कुटूंबाच्या जबाबदारीचे भान असलेली आणि तेवढीच कुटूंबासाठी कोणत्याही प्रसंगाला सामोरी जाणारी बघितली की  सृष्टीच्या निर्मात्याला नक्कीच कौतूक वाटत असावे. त्यासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टाचेही चीज करावयास हवे. भावना, प्रेम, माया, कर्तव्य, वात्सल्य, शृंगार आणि सौंदर्य याचे अनोखे मिश्रण असलेली स्त्री म्हणजे एक कोडेच आहे. नाजूक पण प्रसंगी कणखर, प्रेमळ पण करारी, कर्तव्य-कठोर, सडेतोड, भावनाप्रधान, धाडसी तर प्रसंगी स्वत: कमीपणा घेऊन सर्वांना पुढे   घेऊन जाणारी अशी तिची प्रतिमा. आता तर स्वत:ला “सुपरवुमन” समजून सगळ्या आघाड्या यशस्वीपणे सांभाळणारी ही स्त्री सृष्टीचा एक अवि...

जात्यावरची ओवी -एक अनुभव

Image
             27 फेब्रुवारीला  “मराठी भाषा दिन” साजरा करण्यात आला. अनेक कविता,  विनोद, साहित्य, लेख,  पुनर्जिवित झाले. “शब्द एक अर्थ अनेक”, “ळ” व “ज्ञ” असलेली एकमेव भाषा म्हणून, अलंकार, उपमा, उत्प्रेक्षा, सुभाषिते यांनी नटलेली, (एखादी घरंदाज स्त्री जेव्हा नटून थटून येते तेव्हा जसे तिच्याकडे आदरयुक्त अभिमानाने आपण बघतच राहतो) तसे बघत/ ऐकत/ वाचतच राहावे असे वाटणारी ही माझी मराठी भाषा मला खूप जवळची वाटते ती याच कारणांमुळे!                  मराठी साहित्य आणि प्रकार हा एक प्रबंधाचा विषय होऊ शकतो एवढा हा विषय विस्तृत आहे. त्यातीलच   “जात्यावरच्या ओव्या”   हा एक पद्द प्रकार.   नुकताच   24 फेब्रुवारीला एन.सी.पी.ए., नरीमन पॉंइंट येथे “ओवी अनुभवतांना”   हा धनश्री लेले, व्याख्याती, विदुषीनिर्मित आणि महाराष्ट्र शासन आयोजित एका सुंदर कार्यक्रमाला ब-याच दिवसांनी जाण्याचा योग आला. ओवीची अनुभूती, प्रत्यक्ष समालोचन आणि भावार्थ समजावून सांगण्याचा ताईंचा प्रयत्न.   मग ...