आध्यात्मिक वारी - भाग-3
लागोपाठ 3 वर्षे माझी आध्यात्मिक वारी झालेली बघून माझेच मला आश्चर्य वाटले. सन 2023 मध्ये गिरनार, सोमनाथ, द्वारका, 2024 मध्ये शेगांव, माहुर, शिर्डी, शिंगणापुर आणि आता जानेवारी-25 मध्ये अक्कलकोट, गाणगापुर, तुळजापुर आणि पंढरपूर अशी वर्षाच्या सुरवातीलाच झाल्यामूळे खूप छान वाटले. आधीच्या वारीबद्दल त्या त्यावेळी लिहीलेच आहे. त्यामुळे पुन्हा लिहीत नाही. कुर्ला येथील स्वामी समर्थ मठामार्फत 3 दिवसीय ही अध्यात्मिक यात्रा 5 जानेवारीला रात्री बसने सुरु झाली. माझा हा पहिलाच एकटीने आणि बसने प्रवास होता. त्यामुळे थोडी धाकधुक होती. सकाळी अक्कलकोटला पोहोचलो. तिथे भक्त-निवासमध्ये सकाळची सर्व कामे आटपून मठात गेलो. त्यानंतर 10 वाजता गाणगापुरसाठी ट्रॅक्स करुन 12 वाजता पोहोचलो. तिथे रांग खुप मोठी होती,काहीजणांनी पैसे देऊन दर्शन घेणयाचा प्रस्ताव मान्य केला. आम्ही दोघेजण मात्र एवढ्या लांब आलोच आहोत तर रांगेतूनच दर्शन घ्यावे या हेतुने रांगेत उभा राहिलो. तोपर्यंत बाकिचे सगळे जेवायला निघुन गेल...