Posts

Showing posts from October, 2023

घी देखा लेकिन बडगा नही देखा

Image
                   पेपरमध्ये किंवा आपल्या अवती-भोवती अनेकवेळा दिवाळखोर किंवा कर्ज-बाजारी (insolvent) हे शब्द आपण ब-याचवेळा ऐकतो किंवा आपल्या कानावर पडतात. आपण त्यात कधी खोलात जाऊन विचार करीत नाही. एकतर आपले स्वत:चेच एवढे व्याप असतात. दुसरे म्हणजे आपल्याला काय करायचे? मला त्रास होत नाही ना! मग जाऊ दे हा त्रयस्थ दृष्टिकोण.   सन 1995 नंतरची प्रकरणे आठवा.   हर्षद मेहता, क-हाड बॅंक घोटाळा किंवा शेरेकर प्रकरण असु दे. ज्यांना याची झळ लागली असेल त्यांना नक्कीच आठवत असेल.                दिवाळी जवळ आली म्हणून हा विषय घेतला की काय असा विचार तुमच्या डोक्यात येऊ शकतो, थोड्या प्रमाणात खरेही आहे. पुर्वी एक म्हण होती, “ ऋण काढून सण साजरा करु नये ” असे मोठी मंडळी वारंवार सांगायची सुद्धा! आमच्या आधीची पिढी कर्ज घेण्याच्या विरुद्ध असायची. आंथरूण पाहून पाय पसरणे. कर्ज घ्यायला वेळ लागत नाही, नंतर फेडायला मात्र आयुष्य, पैसा आणि वेळ महत्वाचा निघून जातो. मुलीचे लग्न, घर/जमीन घेण...

रॅगिंग एक दहशत

Image
                  कॉलेज जीवनाशी संबंधित असलेला “ रॅगिंग ” हा विषय अनेकवेळा इतरत्रही जेव्हा कानावर पडतो तेव्हा वाईट वाटते. काही वाईट घटनांनी रॅगिंग बदनाम होऊन त्याच्या प्रतिबंधासाठी कायदा करणे शासनाला भाग पडले. रॅगिंग दखलपात्र गुन्हा होऊन पोलिसांनासुद्धा हस्तक्षेप करावा लागतो. आता रॅगिंगची आठवण होण्याचे कारण म्हणजे नुकतीच अनुजा बर्वे लिखीत “ पिठले-एक रॅगिंग ” नावाची कथा वाचनात आली त्यामूळे नकळत मन काही वर्षे मागे गेले. आमच्यावेळी जरी कॉलेज जीवनात याचा अनुभव घेतला नव्हता किंवा माझ्या मुलींनाही आलेले नाहीत. मधुन मधुन काही घटना अजुनही घडतात तेव्हा ही एक वृत्ती असून तिचा अनुभव घरातही अनेकवेळा अनेकजण घेत असतात, विशेषत:  मुला-मुलींना याचा जास्त अनुभव येत असावा. उच्च-शिक्षणात हे अनुभव जास्त येतात तेव्हा काळजी वाटायला लागते.                    कॉलेजमधील पहिले काही महिने, म्हातारपण, भोळेपणा, नवीन लग्न झालेली नवरी, नवशिका उमेदवार, गरीब वृत्तीचा नौकर/नोकराणी, एकूणच सहनशील व्यक्तीला...

पर्यावरण आणि आपण

Image
             “ पर्यावरण ” म्हणजे रे काय भाऊ?  असे प्रश्न विचारणारेही काहीजण नक्कीच असतील. पृथ्वी,- आप, तेज, वायु आणि जल याने बनलेले असते ते पर्यावरण. ज्या निसर्गतत्वाने माणूस घडविला जातो तेच हे “ पर्यावरण ” होय. तरीही आपण विकासाच्या नावावर स्वार्थासाठी पर्यावरण हे विसरतो ह्याला काय म्हणावे? निसर्गचक्र सुरळीत चालू ठेवण्यासाठी माणुस आणि इतर सजिव हा अत्यंत महत्वाचा दुवा आहे. माणुस हा सर्वात बुद्धिमान आणि मन असलेला प्राणी समजतात पण आज तो आपल्याच जन्मदात्यावर उलटतोय असे म्हणावे लागेल. हजारो वर्षाची निसर्गाने केलेली संचित संपत्ती जसे की पाणी वेगवेगळी साधने लावून काही काळात विचार न करता बेदरकारपणे संपवतो. एकतर स्वत:पुरतेच बघणे पुढच्या पिढीचा विचार न करणे हे पुढील पिढ्यांसाठी मोठे दुर्दैव होणार असे आता खेदाने म्हणावेसे वाटतेय. अधिकाअधिकच्या मागे लागुन आपण “ मिडास ” राजासारखे तर होणार नाहीत ना ही भिती दिवसेंदिवस भेडसावित आहे सगळ्यांनाच.           साधी गोष्ट गावी विहीर बांधावी की नाही? हा प्रश्न मध्ये उद्भवला होता. आमचा याला वि...

गिरनार, दोन ज्योतीर्लिंगे आणि द्वारका-धामाची भेट (आध्यत्मिक वारी)

Image
               जुलैमध्ये अमेरीकनवारी संपली आणि आता लगेच 30  सप्टेंबर , 2023 ते 6 आक्टोंबर, 2023 या कालावधीत 6 दिवसांच्या सोमनाथ, गिरनार आणि द्वारका आध्यात्मिकवारीचा योग आला. याआधीची आध्यात्मिकवारी माझी लग्नाआधी 1988 मध्ये  वयाच्या 22व्या वर्षी केली होती. तेव्हा वाराणसी, हरिद्वार, ऋषीकेश, अलाहाबाद, मसुरी आणि डेहराडुन अशी होती, त्याची आठवण झाली. मध्ये बराच काळ गेला यात्रेचा योग आला नव्हता, यावेळी मात्र जायचेच असे ठरविले होते. माझ्या मैत्रिणिची मैत्रिण सौ. वृशाली प्रदिप तारे, यात्रा प्रमूख आणि श्री. समीर मुतालिक व श्री. प्रशांत कर्णिक यांच्या संयुक्त विद्यमाने “ कृपासिंधु परिवार, कळवा ” तर्फे सोमनाथ, गिरनार आणि द्वारका अशी “ त्रिस्थळी यात्रा ” आयोजीत  केलेली होती. यात्रेत सहभागी 25 जण होते ज्यात, 3 डॉक्टर, शिक्षक, सेवानिवृत्त कर्मचारी/अधिकारी, खाजगी व सरकारी नोकरदार तसेच 4 ज्येष्ठ नागरिक, एक तरुणी आणि बाकी सर्व मध्यमवयीन पुरुष-महिला होत्या (वय वर्षे 25 ते 75 ). आम्ही सर्वांनी या यात्रेचा सुखद अनुभव घेतला, तो तुम्ह...