Posts

Showing posts from July, 2023

अमेरिकन वारी-भाग-3.

Image
             मागील भागात लिहिल्याप्रमाणे नेवार्क, कॅलीफोर्निया, अमेरिका (पश्चिम) येथून  अचानक धाकट्या लेकीकडे नॉर्थ कॅरोलिना, अमेरिका (पुर्वेला) जाण्याचा योग दोघींनी मिळून जुळवून आणला. धाकटी लेक आम्हाला नेण्यासाठीच मुद्दाम नेवार्क, कॅलीफोर्निया, अमेरिका (पश्चिम) येथे आली होती.  दि. 4 जुलैला, रात्री सॅन फ्रेन्सिस्को विमानतळावर नॉर्थ कॅरोलीना येथे जाण्यासाठी तिच्यासह विमानात बसलो आणि 6 तासाच्या विमान प्रवासानंतर 5 जुलैला सकाळी तिच्या घरी ( नॉर्थ कॅरोलिना ) येथे पोहोचलो. विमान नेमके 2 तास उशीरा पोहोचले त्यामुळे छोट्या मूलीला त्या दिवशी सुट्टी घ्यावी लागली. तिच्या मैत्रिणीने आम्ही येणार म्हणून पोहे, चहा, चिकन व चपाती (दुपारी जेवण्यासाठी) अगोदरच बनवून तयार ठेवले होते. घरी  सकाळी 9-00 वाजताच ताजेतवाने होऊन आम्ही त्याचा समाचार घेतला. घर भाड्याचे असुनही ( 4 जणात विभागून) मोठे व छान होते, आजुबाजूचा परिसरही मस्त होता. वातावरण थोडे ढगाळ होते तरी हवा ताजी व आल्हाददायक होती. थोड्यावेळ गप्पा मारुन आम्ही झोपून गेलो दोघेही. मुलग...

अमेरिकनवारी भाग-2

             पहिल्या भागात मुलीकडील पहिल्या अमेरिकेच्या वारीच्या भेटीची सुखद तोंडओळख, संस्कृती, कभटकंतीचा पहिल्या टप्प्याचा आढावा घेतला.त्यामध्ये मुलीचे कॉलेज आणि 17 माईल्सचा ऊल्लेख करायचा राहुन गेला होता. “ San Jose State University ” चा  कॉलेज परीसर हा आपल्या कडील कॉलेजच्या 20 पटींनी मोठे आणि तिथल्या विविध सोयीसुविधा उदा. ग्रंथालय(2 बिल्डींग), व्यायामशाळा, पोहण्याचा तलाव, प्रयोगशाळा, संशोधनासाठी असणारा वाव, सुंदर परिसर, सुरक्षा  बघून मन खरेच भरुन आले. अशा कॉलेज परिसरात मुलांना शिक्षणाची संधी मिळाली हे पाहून मनाला संतोष झाला. आपणही पुन्हा एकदा लहान होऊन शिकूया का असे मनात आले. दुसरा म्हणजे 17 माईल्सचा समुद्र-किना-यांची दिलेली धावती भेट या समुद्र किना-यावर 17 विविध नितांत सुंदर ठिकाणे असून तेथे पॅसिफीक महासागराचे, चौपाटीचे, विविध समुद्र जिवाचे अवलोकन करु शकतात. वारीच्या या दुस-या टप्प्यांत सुखद आश्चर्याचे धक्के आणि लेक “ टोहो ” येथील नैसर्गिक चमत्काराची धावती भेट घडवून आणणार आहे. अमेरिकेत आल्यापासून सारखे वाटत होते की आपण सगळे इकडे मजा करत ...