Posts

Showing posts from July, 2025

सुरक्षा कवच

Image
                “जिंदगी साथ भी..जिंदगी के बाद भी.”हम है हमेशा! अशा  अनेक जाहिराती बघुनच तुम्ही मोठे झाले असाल ना? एकेकाळी जीवनविम्याला पर्याय नव्हता. मराठी अभिनेत्री या जाहिरातीत असल्यामुळे जास्त जवळीकीची वाटायची. आता अनेक कंपन्या स्पर्धेत उतरल्या आहेत. वेगवेगळ्या योजना येत असतात. तुलनात्मक फायदे/तोटे लक्षात घेऊन प्रत्येकाने “जीवनवीमा” घ्यावा असे माझे प्रामाणिक मत आहे. असे कळते कि,एकुण लोकसंखेच्या फक्त 10%लोकच वीमाधारक आहेत. म्हणजेच अजुनही म्हणावी तेवढी जागरुकता दिसुन येत नाही. तसेही कंपन्या आपापल्या कर्मचारी/अधिका-यांची विमा काढतच असते. नोकरी सोडल्यानंतर कधी ही रक्कम मिळते तर बहुधा मिळत नाही. अपघात कर्तव्य बजावत असताना झाल्यासच काही ठिकाणी लगेच मिळतो. त्यासाठी सरकारने विमाधारकांना प्राधान्य तत्वावर उपचार मिळावेत यासाठी दवाखानेपण निर्माण करुन कंपन्यांना तसे आदेश दिलेले आहेत.            श्री मंत माणसांपासुन गरिबांपर्यंत पोहोचण्यासाठी हप्ता आणि आयुष्य यांचे मुल्यांकन करुन त्याप्रमाणे आपले आयु...

मी कोरडी/स्थितप्रज्ञ आहे का?

Image
                                                                           “तुमचे स्मितहास्य हा तुमचा लोगो आहे”असे कुठेतरी वाचले होते. अमेरिकेत गेले तेव्हा मला मुली फोटो काढतांना कायम“हस ना ग आई”असे म्हणायचे आणि मला काही खळखळुन हसता यायचे नाही. खरे तर प्रवास   मस्त, हसत खेळत चालु होता. माझे फोटो कधीच चांगले येत नाहित. मला खुष करण्यासाठी म्हणुन वेगवेगळे प्लॅन्स मुली आखत होत्या. मनाला खुप समाधान वाटत होते पण चेह-यावर काही ते दिसत नव्हते. का कुणास ठाऊक! मुलिंना, मला किंवा इतरांनाही कि हि एवढी कोरडी/निरस का असावी? भाव-भावनांचे दर्शनहिच्या चेह-यावर का दिसत नाही? दिलखुलास हसणे,   बोलणे का जमत नसावे? असे प्रश्न कायम मनात असतात. काही व्यक्ती मात्र दिसताक्षणीच प्रेमात पाडणा-या असतात हे कसे काय?                 अशा अनेक व्यक्तींन...

हेल्थ चेक-अप ते वेल्थ चेक-अप महत्वाचे!

Image
               नुकतेच आम्ही दोघेही सेवानिवृत्त झालो त्यामुळे आरोग्य आणि संपत्तीकडे लक्ष द्यावयास हवे असे वाटते. स्वत:बरोबरच इतरांनाही लाभ व्हावा या हेतुने नेहमीच माझे लिखाण असते. या प्रवासात अनेक गोष्टी,सिनेमा,नाटकांतुन आणि समाजमाध्यमांवरसुद्धा हे विषय नेहमीच चघळले जातात. बहुतांश घरात अशी दिसुन येते कि, मुलेमुली एकतर परदेशात असतात. इथे असले तरी एकत्र राहतील असे नाही. त्यामुळे प्रत्येक घरात एक किंवा दोन म्हातारी माणसे आढळतातच. आमच्यानंतर आमच्या संपत्तिचे पुढे काय? हा एक मोठा प्रश्न भेडसावत असतो. त्यात परदेशात राहणारी मुले तर अजिबात इकडच्या संपत्तीत उत्सुक असतात. तुम्ही ठरवा,तुम्हाला काय योग्य वाटते ते असा सावध पवित्रा घेणारेही मुले असतात. अशा वेळी प्रश्न पडतो कि, एवढे सगळे आपण जमा केले ते कोणासाठी? आम्ही असेपर्यंतच त्याचा उपयोग नंतर माहीत नाही काय होणार?               जीवनविम्यासारखे “जिंदगीके साथ भी और जिंदगीके बादभी”असे प्रकार/गुंतवणुकीत खुप कमी असतात. आरोग्य व...

मेंदुचा पासवर्ड ( तिळा तिळा दार उघड)

Image
                 डॉ.श्रीम.श्रुती पेंडसे यांचे वसंत व्याख्यानमालेतील "मेंदुचा पासवर्ड" हा विषय हा  ख रेच विचार प्रवर्तक वाटला म्हणुन तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला त्यासाठीचा हा लेखन प्रपंच.                लहानपणी ऐकलेली "अलिबाबा आणि चाळिस चोर" ची गोष्ट तुम्हाला आठवतच असेल. तसेच काहिसे आपले आपल्या मेंदुबाबत होत असते. गोष्टींमधला अलिबाबा अत्यंत मेहनती, मर्जिनाची साथ आणि कासिमचा वेंधळेपणा हा तेव्हा कळत नव्हता पण आता कळतो. त्या गुहेप्रमाणेच आपला मेंदू, असंख्य नुरोन्स, पेशी, रक्त यांनी बनलेला मेंदु एक "रहस्यमय" गुहाच म्हणावी लागेल. या मेंदुमुळेच माणुस इतर प्राण्यांपेक्षा वेग ळे  ठरतो. मेंदुचे आकलन व स्मरण, निरिक्षण शक्ती, वर्गिकरण आणि निष्कर्ष/अनुमान काढण्याची क्षमता व पुर्ण शरीरावर नियंत्रण ठेवणारा शिस्तीचा "सुरक्षारक्षक"असे वर्णन करावे लागेल. डोक्यावरचे घट्ट आवरण,केस आणि अभेद्य त्वचा एवढे संरक्षण त्याला लाभलेले असते त्यावरुन याची कल्पना आपल्याला येऊ शकते. वयाच्या 35 वर्षांपर...