Posts

Showing posts from July, 2021

वनसंवर्धन -एक काळाची गरज

          नुकताच ॲमेझॉन टिव्हीवर “शेरनी” चित्रपट पाहिला.   वन अधिकारी (विद्या बालन), वाघीण, स्थानिक राजकारण, शिकारी यांच्यातला संघर्ष मांडला आहे. त्यात शेवटी वाघीणीचा बळी जातो.   समाधान एवढेच की तिचे दोन बछडे वाचतात.   जेव्हा जेव्हा आम्ही पर्यटनाला जातो तेव्हा जंगल हा एक अनिवार्य बघण्याचा कार्यक्रम ठरलेला असतो. त्यामूळे आतापर्यंत बरीच जंगले बघून झाली.   पिलभित टायगर रिझर्व, ताडोबा चंद्रपूर, बांधवगड नॅशनल पार्क (मध्यप्रदेश), कुंभलगड वाईल्ड लाईफ (उदयपूर, राजस्थान) असे बाहेरचे आणि मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क, राणीबाग, नित्याचे. पुर्वीचे वैभव आता दिसून येत नाही पण अजूनही मुंबई हिरवी दिसते ती यामूळेच.            आपण विकासाच्या नावाखाली अनेक झाडे तोडली. डोंगर फोडले, नद्या वळविल्या, त्यांच्यावर धरण बांधले, समूद्रावर सेतू बांधले म्हणजेच कोठेतरी निसर्गावर आपला ठसा उमटवायचा प्रयत्न करतो. खरेच शक्य आहे का ते? निसर्गापेक्षा आपण बलवान होऊ शकतो का? साधे झाडाचे उदाहरण घ्या. एक झाड लावले तर त्याच्यापासून ऑक्...

माणूस घडविणारा शिल्पकार

              “तु आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार” इति वामराव पै. हे जरी खरे असले तरी गुण, अवगूण ओळखणारा, मार्गदर्शक, हितचिंतक, प्रसंगी सवाई शिष्य तयार करणारा गुरू कायम वंदनीय असतो.    शैक्षणिक, आध्यात्मिक, तांत्रिक आणि आपआपल्या क्षेत्रातले तज्ञ गुरू लाभणे हे भाग्याचे लक्षण असते. परदेशात शिक्षक जास्त आदरणीय असतो मात्र आपल्याकडे शिक्षकच जास्त भरडला जातो. ज्या शिक्षकांच्या हातात मुलांचे भविष्य अवलंबून असते त्यांच्याकडे होणारे दुर्लक्ष आणि त्यामूळे होणारे दुहेरी नुकसान हे कुणी लक्षात घेत नाही.   परिणामी देशाची शैक्षणिक प्रगती खुंटते.           आमच्या घराण्यात आधीच्या पिढीत माझी आई वयाच्या 17 व्या वर्षी शिक्षिका झाली होती. (90 वर्षापुर्वी) लग्नानंतर नौकरी सोडली तरी आम्हा मुलांचे गणित व मराठी शिकवणे तिच्यात हातात होते. नंतर मामा व्हिजेटिआय (VJTI) या नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक होते.   मावशी गावात मुख्याध्यापिका म्हणून प्रसिध्द   होती. आमच्या पिढीत एक बहीण मुख्याध्यापिका आणि भावाने तर सेव...

उपवास- शरीराची एक टाळेबंदी

             “उपवास आणि दुप्पट खास” हे समीकरण ठरलेले आहे. मग प्रश्न पडतो, उपवास नक्की कशाला करतो? खरे तर! कोणतेही मशीन परिणामकारकरित्या चालविण्यासाठी, दिर्घकाळ टिकण्यासाठी त्याची व्यवस्थित काळजी घेणे अपेक्षित असते. आपण मात्र शरीररुपी यंत्र फुकट मिळाल्यामूळे कोणतीही देखभाल न करता कसाही त्याचा दुरुपयोग जास्त करत असतो.          उपवासाचे महत्व,योगात,अध्यात्मात आणि आता विज्ञानसुध्दा मान्य करीत आहे. आपण शरीराला अन्न खाण्यापासून आराम देतच नाही. पशू-पक्षी सुध्दा एकदा खाणे संपल्यावर पुन्हा अन्नाकडे ढूंकूनही बघत नाही.   माणूसच अपवाद असावा जरूरी पेक्षा जास्त खाणारा,त्याचा हिशोब मात्र शरीर ठेवीत असते. कालांतराने त्याची फळे भोगावी लागतात. नौकरीवाल्या बायका वेळ नाही म्हणून बाहेरचे, दुस-यांनी बनविलेले आणि खाण्यास तयार (Ready to Eat) असे जेवणात आडमार्ग (Shortcut) स्विकारतात पण दिर्घकाळात हे मारक ठरतात.           माझे वडील आणि सासरे हे मोजकेच आणि वेळच्यावेळी जेवायचे. कधी सणासुदीला शाकाहारी किंवा ...

पालकत्व- एक न संपणारा प्रवास

पालकत्व ही पिढ्यानपीढ्या अखंड चालणारी एक पध्दत आहे. पालकत्व म्हणजे सांभाळणे आणि सांभाळून घेणे. मग ती जन्म दिलेली मुलांबाबत असू दे, दत्तक मुले असू दे. एकेरी पालक,मोठी बहीण किंवा मोठा भाऊ असू दे. पुर्वीच्या काळी राजे आपल्या प्रजेबाबत, आताच्या लोकशाहीमध्ये जनतेचे पालकत्व (नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान)स्विकारणारे , सामाजिक संस्थांचे विश्वस्त असे सर्वजण एकप्रकारे पालकत्वाची भूमिका साकारत असतात. जशी स्त्रीला मातृत्वाची ओढ असते तसाच पुरूषसुध्दा पितृत्वासाठी आसुसलेला असतो. निसर्गचक्र चालू रहाण्यासाठी पालकत्व ही एक आवश्यक प्रक्रिया आहे. काही जणांना ती सहजगत्या प्राप्त होते तर काही जणांना बराच प्रयत्न करावा लागतो. नुसते जन्म देणे म्हणजे पालकत्व नव्हे. पालनपोषण,संरक्षण, संस्कार, शिक्षण, प्रगती एवढी माफक अपेक्षा नंतर त्यांची नौकरी, घर, लग्न, सुना,जावई,नातवंडे अशी वाढत असतात. कधी परिस्थितीनुसार, काही अडचणींमूळे हे सर्व कमी जास्त प्रमाणात पालक देतच असतात. परिस्थितीवर मात करूनसुध्द्दा आपल्या पाल्यासाठी काहीही करणारे पालक असतात. शिक्षक-रुपी, कधी शेजारी-पा...

भातुकलीचा खेळ

                     भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी ... हे गाणे मंगेश पाडगांवकर, अरूण दाते आणि यशवंत देव या त्रिकूटांची एक अजरामर कलाकृती म्हणता येईल.   या गाण्यात संसार स्वप्नभंगाचे संयमित उदात्तीकरण केलेले आहे. आता मात्र जे काही आसपास चालले आहे त्या संदर्भात या गाण्याची आठवण झाली.   याआधी “मिरांडा सध्या काय करते?” हा लेख लिहीला होता. ते परदेशातले, त्यांची संस्कृती, स्वातंत्र्याच्या कल्पना, समाजाचा दृष्टीकोन आणि बरेच काही आपल्या देशापेक्षा वेगळी आहे.   त्यामूळे त्यांची आणि आपली तुलना होऊ शकत नाही पण तेच लोण आपल्याकडेही पसरत आहे याची भीती वाटते.            बॉलीवूडमधील कलाकरांचे घटस्फोट, लग्न, लिव इन रिलेशनशीप, त्यांची मुले अशा अनेक प्रकरणांचा चावून चोथा झालेल्या गोष्टी असतात.   याचा समाजमनावर वाईट परिणाम होतो हे कोण लक्षात घेतो?    समाजाने, सामाजिक माध्यमे, वर्तमानपत्रे, मासिके यांनी अशा प्रकरणांना अवाजवी महत्व देण्यात येऊ नये. कसे असते ना? “म...

कृत्रिम बुध्दीमत्ता (Artificial Intellingence)

Image
             “कृत्रिम बुध्दीमत्ता” म्हणजे काय रे भाऊ? एवढे दिवस आपला असा समज होता की, बुध्दीमत्ता ही दैवी देणगी आहे. ती सगळ्याना कमी अधिक प्रमाणात असते. याच बुध्दीमत्तेमूळे माणूस चंद्रावर पोहचला. कृत्रिम उपग्रह प्लुटोच्या पुढे गेली. जगाच्या उत्पत्तीचे रहस्य उलगडण्याचे प्रयत्न चालू आहेत. वेगवेगळे क्रांतीकारी शोध, रोगांवर नियंत्रण आणि सुखसोयी यांच्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मग कृत्रिम बुध्दीमत्ता हे काय प्रकरण आहे?       कॉलेजमध्ये असताना सांख्यिकी शास्त्र (Statstical Science) हा एक विषय होता. ज्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील आकडेवारी आणि नित्कर्ष यांची सांगड कशी घालायची हे शिकवले जायचे. तेव्हा हे सगळे प्रत्यक्ष संपर्क, सर्वेक्षण, माहिती जमा करणे, विश्लेषण आणि अनुमान हे वैयक्तिकरीत्या केले जात होते. नंतर उपग्रह, रोबोट, वेगवेगळ्या संस्था, फेसबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड, टेलिफोन किंवा मोबाईल कंपन्या यांची मदत घेऊन माहिती व तंत्रज्ञान या गोंडस नावाखाली केले जायचे. तुम्ही म्हणाल यात चुक काय? एखादा माहितीचा स्त्रोत मिळाल्यावर त...

अंधारबनाची पावसाळी भटकंती

Image
               पावसाळा आला की दरवर्षी आमच्याकडे मी सोडून सगळ्यांना पावसाळी भटकंतीचे (Treaking) वेध लागतात. असेच एकदा जुलै 2017 मध्ये नेटवर बघून पिंपरी, पुणे येथील एका संस्थेमार्फत “अंधारबन भटकंती”ठरली.  आम्ही दोघे, आमच्या 2 मुली आणि भावाची 2 मुले असे एकूण कुटूंबातील 6 जण जायचे ठरले. त्याआधी कर्नाळा, पेठ, माथेरान, महाबळेश्वर पावसात झालेले होते.  त्यामूळे पावसाचे विशेष असे वाटत नव्हते. जाताना पाऊस नव्हता त्यामूळे दादरहून रात्री 12 वाजता एकूण 15-16 जण एका मीनी बसमधून निघालो. रात्री 2 वाजता एके ठिकाणी घरगूती जागेत थांबून थोडीशी विश्रांती घेतली.  स्त्रिया, मुले व पुरुष सगळे एकत्र असे 2 खोल्यांत झोपलो. जेमतेम 2-3 तास झोप लागली आणि सकाळी 7 वाजता न्याहरी करून ताजेतवाने होऊन चालायला सुरूवात केली. गट नायकाने सांगितल्यानुसार रेनकोट, टोपी, सुके खाणे आणि बिस्कीटे सोबत घेतली होती. चालणे उत्साहात सूरू झाले. मला चालायचा थोडा कंटाळा परंतू निसर्ग आणि सोबत मुले आणि मूली यांच्या हसत खिदळण्यामूळे चालणे मजेशीर होत होते.  कॉलेजची मूले-मूली होती. निसर...

खलील जिब्रान आणि आपण

               ब-याच वर्षांनी “वाचन समाधी” का काय ती काल लागली.   निमित्त होते “खलील जिब्रानचे उत्कृष्ट कथा” हे पुस्तक.   खलील जिब्रानच्या काही उत्कृष्ट लेखांचे स्मिता लिमये यांनी मराठीत अनुवादीत केलेले “खलील जिब्रानचे उत्कृष्ट कथा” हे पुस्तक.   ब-याच वर्षानी हे पुस्तक वेगळ्या स्वरूपात वाचायला मिळाले.   कॉलेजमध्ये असताना कधीतरी हा लेखक वाचनात आला होता.          “खलील जिब्रानचे उत्कृष्ट कथा” या पुस्तकातील संदेशयुक्त विचार वाचनीय आणि लक्षपुर्वक अंमलात आणल्यास आयुष्यात येणा-या ब-याच शंकाचे निरसन होईल.   यासाठी खाली काही विचार देत आहे. 1) तुमची सर्वात सुंदर वस्त्रे   कुणा दुस-याच व्यक्तींनी विणलेली आहेत.   तुमच्यासाठी स्वादिष्ट भोजन जे दुस-यांच्या स्वयंपाकघरात खाल्ले जाते. 2)   तुमचे सुखदायक अंथरूण ज्यावर तुम्ही दुस-या कोणाच्या घरात झोपलेले आहात. तर मग तुम्हीच सांगा तुम्ही स्वत:ला त्या दुस-या माणसापासून कसे काय अलग करू शकता? 3)   तुम्ही आपल्या भुकेपेक्षा जास्त...

ओम धन्वतराय नम:!

              नुकताच जागतिक “डॉक्टर दिन” होऊन गेला. त्यानिमीत्त वेगवेगळे संदेश,घटना,कथा आणि संदेश समाजमाध्यमातून वाचायला मिळाले. सहसा डॉक्टरांबद्दल चांगले लिहीले जात नाही म्हणून हा लेखन प्रपंच.              लहानपणांपासून माझा डॉक्टरकाकांशी जवळून संबध आल्यामूळे त्यांचे रुग्णांसमवेतचे वागणे, बोलणे, औषध तयार करणे,तपासणे इत्यादी मी कुतूहलाने बघत असे. केवळ नाडी परिक्षा आणि डोळे तपासून औषध कसे काय देऊ शकतात याचे मला प्रचंड आश्चर्य वाटायचे.   सगळी औषधे, गोळ्या कसे लक्षात ठेवत असतील? आता तर वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या स्पर्धक बाजारात असतात मग हे त्याच्यातून कसे निवड करत असतील? त्यांची कायम शिस्त, लगबग, स्वच्छता आणि रुग्णांचा जीव वाचविण्याची धडपड आपल्याला नतमस्तक व्हायला लावते. डॉक्टरी शिकून तयार झाल्यावर त्यांना एक प्रतिज्ञा घ्यावी लागते. त्यात सगळे नियम, परिस्थिती,वागणूक आणि समाजकार्य यांचा समावेश करण्यात आलेला आहे. नुसती प्रतिज्ञा वाचली तरी मन भरून येते.         ...