तिसरी अमेरिकन वारि-पर्व-2-(11-3-25 ते 10-4-25)
धाकट्या लेकिने (भाड्याची गाडी घेऊन) फ्लोरिडा आणि मोठ्या लेकिने ऑस्टीन्मध्ये स्वत: गाडी चालवुन सगळीकडे फिरविले. त्यांची गाडीची स्पीड आणि गाणी लावणे, गप्पा मारणे, जोक्स सांगणे, मध्येच मला एखादी माहीती सांगणे चालुच असायचे. या प्रवासात अनेक नवीन गाणी (मराठी/हिंदी) ऐकायला मिळाली. त्यांची गाण्याची निवड चांगली आहे असे दिसुन आले. हो, धाकटिने गिटार घेऊन माझी वादन-परंपरा/आवड चालू ठेवलेली बघुन बरे वाटले.( वाजविण्यासाठी वेळ कधी काढणार माहित नाही.)टेक्सासला मराठी माणुस शोधुनही सापडणार नाही. तिच्या राहणयाच्या संकुलात आणि कंपनीतसुद्धा कोणीच नाहीत म्हणे. घरासमोरच पोहण्याचा तलाव असल्यामुळे सगळे मुले-मुली, सहकुटुंब, सह-परिवार ऊन पडले की त्याचा आस्वाद घ्यायला बहुधा सुट्टी असली कि यायचे पण एकही त्यात भारतीय दिसला नाही. इथे फार कमी आणि ठराविक भागातच उत्तर-भारतीय आणि दक्षिण-भारतीय राहतात असे कळले. जास्त मेक्सिकन, अमेरिकन आणि आफ्रिकन लोक आहेत. खरे पाहता मेक्सिको पुर्वी अमेरिकेतच होते,कालांतराने वेगळे झाले. त्यांचा ठसा, इमारतींवर, खाण्या-पिण्यावर आण...