Posts

Showing posts from November, 2021

“शोधलार नक्की मेळतले! ”

Image
           काल पासून मागेले एक पुस्तक मिळना,   हाव कितले शोधत आसा, तरी मिळना.   केन्ना विसरप उरता. मागेल्या घरात सद्दा हत्ती मेळना कशे?   मागेला घरातलो खुब पसारो   पळोन   हांगेले अशे म्हणणे उरता.   म्हणलार इतलो पसारो पळोन हत्ती आरामात निपोन रावच्याक शकता, अशे माका केन्नाही आयकोच्याक मेळता. एक एकाले मत उरो जाय नी!   तरी बरे राणी बाग लागी असल्यान थंच्यान हत्तीक येवच्याक मागेले घर खुप आवडता अशे दिसता.   गंमतीलो भाग उरो!   खरे म्हणलार हाव इतले टापटीप आणि व्यवस्थित आसा. मागेल्या ऑफिसातले कॅबीन पळोन सगळ्यांक खुब आश्चर्य   दिसता.   मागेल्या मैत्रिणी म्हणतात “तुगेले   कॅबीन इतले सुंदर, आकर्षक मागीर घर कितले संम्मा उरतेले”!    हाव मनात म्हणता असो गैरसमज “तुमगेल्या मनात सदा उरो”. तरी गणपती वेळार गणपती पळोयच्याक केन्ना येतात तांका घर उत्तम पळैच्याक मेळता म्हणन बरे! ना जालार इतर कारणाने अचानक आयलार   मागेल्या घरातलो पसारोच तांका पळोयच्याक   मेळतलो.       ...

सेवा उद्योगाची भरारी

Image
              आपल्या आर्थिक व्यवहारांमध्ये भर घालणारे क्षेत्र म्हणजे उद्योग, तंत्रज्ञान, शेती आणि अनुषंगिक क्षेत्र (बॅंक, विमा, वाणिज्य, आणि दळणवळण) असे आपण समजत होतो. मागील 35 वर्षात “सेवाक्षेत्राची” जास्त मागणी वाढू लागली जी आधी दुर्लक्षित होती.   आता जवळपास 40% वाटा सेवा क्षेत्र उपलब्ध करून देतो. त्या प्रमाणात सोई-सुविधापण दिवसेंदिवस वाढत आहेत.   या क्षेत्राचे महत्व लक्षात घेऊन सन 1994 मध्ये केंद्राचा “सेवा कर” कायदा अस्तित्वात आला. जो आता सन 2017 मध्ये “वस्तू व सेवा कर” कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आला यावरून याची व्याप्ती लक्षात येईल.           सेवा क्षेत्रात प्रचंड मनुष्यबळ,यंत्रसामुग्री लागत असल्यामूळे याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच रहाणार. प्रचंड लोकसंख्येमूळे आपल्या देशात या क्षेत्राला मागणी आणि वाव आहे.   सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक सेवांचा आपण लाभ घेत असतो ते आपल्या लक्षात येत नाही. सेवा घेऊन त्यावर करही लादला जातो आणि त्या प्रमाणात सेवा किंवा सुविधा मिळत नाही हे ही कुणाच्या लक्षात येत ...

कृतज्ञता भेट (Return Gift)

Image
                 “जब तक तुम्हारे पास पैसा है!   दुनिया पुछेग़ी की भाई तु कैसा है?”                                                                                                           “-जिंदगी की सच्चाई”             असा एक फेसबुक वरील संदेश वाचल्यावर मन भूतकाळात गेले.   खरेच पैशाला एवढे महत्व का देतो आपण? हे एक साधन आहे ,साध्य नव्हे!   माणूस, चारित्र्य, इमान, देश कि पैसा? हे...

दिवाळी संपली आता पुढे काय ?

Image
          दिवाळी सण येणार म्हणून पैसा, आनंद आणि खरेदी अगदी उत्साहाने करून झालेली असते. हे दिवाळीचे 4 दिवस अगदी मजेत जातात.   आता करोना आणि इतर कारणामूळे म्हणावा तेवढा उत्साह लोकांमध्ये दिसून येत नाही. उत्पन्न, गरजा आणि पुर्तता यात एवढी व्यस्त असलेली माणसे तात्पुरते अवसान आणतात आणि दिवाळीचे आगमन साजरे करतात पण इतरांचे काय? अशी अनेक माणसे आहेत की ज्यांना हे सर्व शक्य होत नाही. त्यांना सगळे दिवस सारखेच असतात जसे की, अत्यंत महत्वाच्या सेवेत असलेले, दैनंदिन गरजा भागविणारे आणि कर्तव्य म्हणून सेवा बजावणारे अशा माणसांना आणि त्यांच्या घरच्यांनासुध्दा जेव्हा ते घरी येतील तेव्हाच “दिवाळी, दसरा” असे म्हणता येईल.             कार्यालयातसुध्दा वेगवेगळ्या प्रकारे दिवाळी साजरी केली जाते. पॉटलक (Pot Luck) म्हणून प्रत्येकाने एक पदार्थ   करून आणायचा आणि मग तो इतरांनी चाखून त्याच्यावर अभिप्राय द्यायचा,सगळ्यांनी एकत्र फराळ करायचा. दस-यानंतर व दिवाळीच्या आधी मिठाई, कपडे, वस्तू घेऊन अनाथाश्रम, आदिवासी पाडे, वृध्दाश्रम यांना पाठवि...