विनोदवीरांचा सहभाग
विनोद हा खरे तर जीवनाचा अविभाज्य घटक आहे. वातावरण खेळीमेळीचे करण्यासाठी किंवा काहीजणांना उपजतच खुसखुशीत बोलण्याची सवय असते. पार्टी,मित्र-मंडळीत विनोद सांगण्यासाठी विशेष आग्रह केला जातो. हल्लीचा स्टॅंड-अप कॉमेडी हा त्यातलाच एक प्रकार. चित्रपट,नाटक दुरदर्शन किंवा पुर्वीचे आकाशवाणीवर सुद्धा विनोदी मालिका “संसार-टेकाडे भावोजी” किंवा मध्यंतरी “चला हवा येऊ द्या,हास्यजत्रा,हिंदीतले आधे-अधुरे,नुक्कड हे सगळे कार्यक्रम किंवा सई परांजपेचे सिनेमे,बासु चटर्जींचे हलकेफुलके असे असायचे. मनोरंजनाबरोबरच काहीतरी संदेश देणेसुद्धा ह्या निमित्त्याने करता येते. साहित्यात तर विनोदी साहित्य,कविता आणि साहित्यिक हे खुप प्रसिद्ध होतात. साहित्यिकांची नावे खुप आहेत तेवढीच कलाकार मंडळीसुद्धा आहेत. नुकतेच असरानी आणि सतीश शहा यांचे निधन झाले त्यानिमित्त हा लेखन प्रपंच. नुकत्याच एका कॉन्फ्ररन्समध्ये “शोले” मधिल जेलरचा असरानी यानी केलेला प्रसंग़ाला पहिला क्रमांक मिळाला. शोलेच्या यशात हा प्रसंग, सुरमाभुपाळी( जगदीप) तर धर्मेंद...