3. पितामह/आचार्य भिष्म
कुरु कुळाचे संरक्षण ही भिष्माची प्राथमिक जबाबदारी होती तर वीरता,उदात्तता आणि कर्तव्य निष्ठा याचा त्रिवेणीसंगम होता. परशुरामाचा शिष्य म्हणवुन घेण्यात त्यांना विशेष धन्यता वाटत असे. अनेक आव्हाने पेलुनही ते स्थितप्रज्ञाचे आयुष्य जगले. कुळाचा –हास हौऊ नये म्हणुन त्यांनी अनेक प्रयत्न केले. दुष्टता आणि विकृतीपुढे त्यांनाही हात टेकावे लागले. स्वत:चे मरण स्वत:च ओढुन घेणारे( स्त्रिसमोर हत्यार चालवणार नाही) असे एकमेवाद्वितीय योद्धा ठरले. शंतनु आणि गंगापुत्र असलेला हा महान धनुर्धर(देववृत) पुढे 10 दिवस सलग धर्मयुध्दात पराक्रम दाखवत होता. सर्व कुरुवंशियांना वडिलधारा असणारी ही व्यक्ती मात्र नंतर वयाने लहान असलेल्या कृष्णाचा शिष्य झाले. कुशल सल्लागार असलेले भिष्म तपश्चर्या आणि धार्मिकतेचे मुर्तीमंत आविष्कार होते. महाभारतात भिष्मांचे एक विशेष महत्व आहे ते भिष्म प्रतिज्ञेसाठी. आजन्म ब्रम्हचारी आणि गादीवरचा हक्क सोडुन राहण्यामुळे. हे झाले नसते तर कदाचित महाभारत घडले नसते असे काहिजणाचे मत आहे. किंबहुना असेह...