Posts

Showing posts from September, 2026

3. पितामह/आचार्य भिष्म

Image
            कुरु कुळाचे संरक्षण ही भिष्माची प्राथमिक जबाबदारी होती तर वीरता,उदात्तता आणि कर्तव्य निष्ठा याचा त्रिवेणीसंगम होता. परशुरामाचा शिष्य म्हणवुन घेण्यात त्यांना विशेष धन्यता वाटत असे. अनेक आव्हाने पेलुनही ते स्थितप्रज्ञाचे आयुष्य जगले. कुळाचा –हास हौऊ नये म्हणुन त्यांनी अनेक प्रयत्न केले. दुष्टता आणि विकृतीपुढे त्यांनाही हात टेकावे लागले. स्वत:चे मरण स्वत:च ओढुन घेणारे( स्त्रिसमोर हत्यार चालवणार नाही) असे एकमेवाद्वितीय योद्धा ठरले. शंतनु आणि गंगापुत्र असलेला हा महान धनुर्धर(देववृत) पुढे 10 दिवस सलग धर्मयुध्दात पराक्रम दाखवत होता. सर्व कुरुवंशियांना वडिलधारा असणारी ही व्यक्ती मात्र नंतर वयाने लहान असलेल्या कृष्णाचा शिष्य झाले. कुशल सल्लागार असलेले भिष्म तपश्चर्या आणि धार्मिकतेचे मुर्तीमंत आविष्कार होते.          महाभारतात भिष्मांचे   एक विशेष महत्व आहे ते भिष्म प्रतिज्ञेसाठी. आजन्म ब्रम्हचारी आणि गादीवरचा हक्क सोडुन राहण्यामुळे. हे झाले नसते तर कदाचित महाभारत घडले नसते असे काहिजणाचे मत आहे. किंबहुना असेह...

2. सत्यवती

Image
         व्यासांची माता व कौरव-पांडवांची पणजी म्हणजे सत्यवती. व्यासाची आई म्हणुन नक्किच स्पृहणीय ठरते तर घराण्याला “वारस” हवा म्हणुन व्यासाला नियोग पद्धतीने ( जे आज सरोगसी किंवा टेस्ट-ट्युब बेबी तंत्रज्ञान मानतात) किती प्रगत कि (संकुचित?) विचाराची दिसुन येते. तसेच भिष्माच्या (सावत्र गंगापुत्र )सद्गुणांची पारख करुन सत्यवतीने त्याला राज्यकारभार सोपविला. एकुण 4 पिढ्या पाहिलेली ही स्त्री अनेक भावनीक, मानसिक, सामाजिक स्थित्यंतरातुन जात असतांना किती होरपळली गेली असेल याची आपण आत्तासुद्धा कल्पना करू शकणार नाही. शंतनुबरोबरचा विवाह एक आपमतलबी संकुचीत करारातुन झाल्यामुळे कुठेतरी  अपराधी भावना सतावत असावी. तसेच भिष्माचा त्याग लक्षात घेऊन भावी सुनांना भिष्माला आणायला पाठवते.      सत्यवती एका   राजाची मुलगी असुनही तिचा संभाळ एका कोळयाने केला होता. कुमारी असताना पराशर मुनीच्या मोहाला बळी पडल्यानंतर तिला “व्यास” हा मुलगा झाला. नंतर तिचे लग्न शंतनु राजाशी झाले. सत्यवतीने गरिबीपासुन राजवैभवापर्यंत सर्व अनुभव घेतले. तिने सर्व संकटे समर्थपणे झेलली....

1.महर्षी व्यास

Image
                   “ते लोक होते वेगळे-घाईत जे गेले पुढे, मी मात्र थांबुन पाहतो-                            मागे किती जण राहिले?”-इती सुरेश भट             माझ्या सर्व गुरुंना वंदन करुन मी हे महाभारतातील व्यक्तीरेखा   (शिवधनुष्य)  लिहिण्याचा प्रयत्न सुरु करत आहे.   महाभारताचे कर्ते आणि धर्ते,जगातील सर्वोत्तम कलाकृती लिहायला गणपतीला भाग पाडणारे, कुरु वंशाचे गुरु आणि महाकाव्य आणि इतिहासाचे दिग्दर्शक,लेखक आणि काही प्रमाणात साक्षीदारसुद्धा. गुरुंचे गुरु म्हणुन महर्षी,आद्य गुरु,योगायोगाने आज शिक्षकदिना निमीत्त त्यांच्याबद्दल लिहिण्याचा समसमा योग जुळुन आला. याआधीही मि माझ्या एक लेखात “-हदयस्थ गुरु” असा उल्लेख आलेला आहे. महाभारतातल्या अनेक व्यक्तीरेखेंपैकी पहिली आणि महत्वाची आदर्ष व्यक्ती म्हणुन “महर्षी व्यास” यांचे नांव घ्यावे लागेल. अठरा पुराणे आणि ब्रम्हसुत...