Posts

Showing posts from February, 2023

शिव भक्ती आणि शिवशक्ती

Image
                                                            कारुण्यसिंधू भव दु:खहारी                                                                                 तुजविण शंभू मज कोण तारी...                      शिवरात्री आणि शिवजयंती लागोपाठ येऊन गेली.   बहुधा आधी शिवजयंती आणि मग शिवरात्री असे ब-याचवेळा होते.   यावेळी नेमके उलटे झाले, यानिमित्त दोघांची थोडी तुलना करणे काहीसे सोपे झाले. खरे तर तुलना होणे कठीण आहे   पण एक छोटासा प्रयत्न! शिवाचे अस्तित्व जीवाशी निगडीत असतेच. जन्मल्यापासून मरेपर्यंत जीवा-शिवाच...

संत-महिमा वर्णावा किती?

Image
                             !! सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा,                             उपेक्षू नको गुणवंता, अनंता, रघुनायका मागणे हेची आता !!                                                   !! जय जय रघुवीर समर्था!!                 या निरुपणाशिवाय (बहुधा आरती झाल्यावर) कोणतीही प्रार्थना पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही. त्याचे रचियता कोण हेही आपल्याला काही वेळा माहित नसते तरी आपण हे परंपरागत म्हणत असतो. लहानपणी आई द...

राजदूत (Ambassador)

Image
           राजदूत/राजनैतिक अधिकारी किंवा राजशिष्टाचार अधिकारी असे म्हणता येईल. लहानपणी माझी इतर अनेक इच्छांप्रमाणे राजदूत बनण्याची ( सी.ए., वकील बनायचे होते) हीही एक इच्छा होती ती राहून गेली. नंतर कळले की, त्याला लागणारे शिक्षण,पात्रता आणि स्वभाव गुण माझ्या अंगी नसल्यामूळे कदाचीत देश एका चांगल्या राजदूताला मुकला असावा. “ Better luck in next birth!” असो. होते ते ब-या साठीच म्हणायचे. तसेही शासनाचे/शासनातर्फे मीही एक प्रकारे लेखापरीक्षणच करते आणि कर-आकारणीबाबतची “राजदूत” आहेच की!  (दुधाची तहान ताकावर भागवून घ्यायची).           पुराणात/महाभारतातली असफल“कृष्णशिष्टाई” प्रसिद्धच आहे. सफल झाली असती तर युद्ध झालेच नसते.   रामायणातील हनुमानाने देखील रावणाकडे सीतेच्या सोडूवणूकीसाठी “राजदुताचे” काम जोखीम घेऊनच पार पाडले. ती सफल झाली असती तर रामानेही रावणाशी युद्ध केलेच नसते. शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा बोलणी करणारे वकीलच यशाचा पाया रचत होते. ( अफजलखान वध असू दे नाहितर आग्र्याहून सुटका असू दे.) मुसद्देगिरी, वक्तृत्व, दुरदृष्टी आणि ...

प्रेम - एक चारोळी

Image
                फेसबुक वर नुकतीच एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. “प्रेम”   या विषयावर चारोळी लिहीणे. मला तर अशक्यच वाटले तरी 15-20 स्पर्धकांनी   भाग घेतला होता. बघून त्यांचे कौतूक आणि आश्चर्य वाटले.   अजून निकाल लागायचा आहे पण मी आधीच सगळ्यांना मनातल्या मनात सलाम करुन टाकला.   विषय तसा नाजुक, गुंतागुंतीचा, प्रगल्भ आणि विस्तृत असल्यामुळे मला तरी कठीणच वाटला.              “अनारकली” मधले गाणे नेहमी यासंदर्भात आठवते   “ये जिंदगी ऊसिकी है,...प्यारही में खो गया..” अप्रतिम रचना, आवाज आणि सादरीकरण. चित्रपटातून वेगवेगळ्या दृष्टिकोनातून हाच विषय नेहमी चघळला जातो. वेगवेगळ्या वाटा, अडचणी, खाचखळगे यातुन आपले प्रेमवीर जिंकून प्रेम सिद्ध करतात. कधी यशस्वी तर कधी अयशस्वी होतात. मोहब्बत, प्यार, इश्क, प्रित आणि अभिलाषा अशा अनेक अर्थानी सर्वश्रूत असलेल्या प्रेमाची व्याख्या कोणी अडीच अक्षरात करते तर कोणी चारोळीत करते. नि:स्वार्थी, मुके आणि अव्यक्त प्रेमाची अनुभूती जोपर्यंत आपण घे...