Posts

Showing posts from June, 2026

आमची बिनपावसाळी माथेरान सहल

Image
              अमेरिकेहुन आल्यानंतर लगेच विहिणबाईंचा फोन आला होता “आमच्याकडे पुण्याला विश्रांतीसाठी या” म्हणुन. आश्वासन दिल्यानुसार दोघांच्याही सोयीनुसार मध्यवर्ती ठिकाण ठरले “माथेरान.”दि. 19.6. ते 21.6.26 असे दिवस आम्ही दोघी विहिणबाई आणि व्याहीभाऊ निसर्गाच्या सान्निध्यात माहेरपण उपभोगत होतो.(पुरुषांना माहेरपण हवे असते.)          पावसामुळे टॉय ट्रेन ( नेरळ-माथेरान) बंद होती,खरे तर यावर्षी पाऊस उशीरा होता तर निदान 25-30 जुनपर्यंत चालु ठेवायला हरकत नव्हती. आम्ही दोघे लोकलने नेरळला 11.00 वाजता आणि  ते दोघे पुण्याहून तेव्हाच पोहोचले. तिथुन वर माथेरानला जाईपर्यंत 12.00 वाजले. गाडी पार्कींगला लाऊन आम्ही इ-रिक्शाच्या रांगेत उभा राहिलो तोपर्यंत दोघेजण चालत-चालत होटेलच्या दिशेने  पोहोचलेदेखील. नंतर एकत्र 1.00 वाजता हॉटेलवर जाऊन फ्रेश हौऊन 1.30 वाजता जेवायला डायनिंग हॉलवर पोहोचलो. गुजराती थाळी बघुनच पोट भरुन गेले. फास्ट-फुडची सुरुवात मला वाटते गुजरातमध्येच झाली असेल. ढोकला, जिलेबी -फाफडा,पाणी-पुरी, भेलपुरी, शेव-...

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

Image
            याआधीच्या  तिन्ही वारिचे वर्णन तुम्ही वाचले असेलच,पुन्हा वाचायला आवडत असेल तर माझ्या ब्लोग्वर जाऊन वाचता येईल.अधिक मासाची माहीती आणि महत्व याआधीच्या लेखात दिलेलेच आहे. मी अमेरिकेत असतानाच या “कृपासिंधू” परिवारातर्फे ्जाहिरात आली होती. मी तिकडे असल्यामुळे आल्यावर” बघु जागा असेल तर नक्की सांगेन”असे आश्वासन आणि माझ्या न बघितलेल्या” नातवाचे” कौतुक करुन झाले. हो नाही म्हणता एकदाचा 9 जुनला “नंदिग्राम” एक्सप्रेसने आम्ही 10 जण माहुरसाठी /ट्रेनने निघालो.( 8 बायका व 2 पुरुष).          माहूरगडला मी नांदेडला शाळेत असताना सकाळी जाऊन संध्याकाळी यायची ट्रिप दरवर्षी निघायची पण मी कधीच गेले नव्हते. तिस-या शेगांव वारित धावती भेट देऊन झाली होती म्हणुन मुद्दाम यावेळी “सावकाश जाऊ”असा मी विचार केला. माझ्या बालपणाचा काळ नांदेड येथे गेलेला असल्यामुळे त्या जागेचे मला आठवण नेहमी येत असते,नांदेड सोडुनही 40 वर्षे झाली तरी. दुसरे,लेकिचे  माहेरपण करुन आल्यामुळे जरा दमल्यासारखे झाले होते. आता थोडे देवदर्शन करु म्हणुन मीपण उत्स...

चौथी अमेरिकन वारी- मुलिचे/सुनेचे बाळंतपण (16-1-2026 ते 24-5-2026-130 दिवस)

                   या आधीचे तिन्ही अमेरिकन वारिचे लेख तुम्ही वाचले असतीलच . 2025 मध्ये लेकिने आनंदाची बातमी देऊन माझी/आमची पदोन्नती झाली”आजी होण्याची.”आता “आईची-आई”अशी दुहेरी भुमिका साकारायची होती. बातमी कळल्यापासुन आनंद, काळजी, चिंता, जबाबदारी, सुख अशा संमिश्र भावना मनात होत्या. तरी ऑक्टोबर-पासुन सासुबाई तिकडे आधीच गेल्यामुळे थोडी चिंता कमी झाली होती. त्यांनी मला दिलासा दिला,”काही काळजी करु नका होईल सगळे व्यवस्थित,आपण आहोत ना!”मला तेवढेच समाधान वाटले.              2018 ला जेव्हा लेक अमेरिकेला गेली तेव्हाच एकप्रकारे ती तिथली {अमेरिकन} सुन झालेली होती,खरी सुन 2024 मध्ये झाली. आता “सारख्या सुचना”(सासु)आणि“सुचना नको” {सुन } अशा अर्थाने हे मी शिर्षक दिलेले आहे.   याशिवाय सासुबाईंनीच ख-र्या अर्थाने तिचे बाळंतपण केले असे म्हणता येईल कारण तोच काळ महत्वाचा होता. लेक,जावई,लेकिचे सासु-सासरे,माझा नवरा,नातेवाईक यांना डिसेंबर-26 पासुन “बातमीचे” वेध लागलेले होतेच. 3 जानेवारी (इकडे),तिकडे ...

माझे अमेरिकेत पहिले अभिवाचन

                    या वर्षीच्या अमेरिकन वारित एक मोठी आणि धाडसी पाऊल नकळत उचलले याचे मा्‍झेच मला नंतर आश्चर्य वाटले. फेब्रुवरी-मार्च महिन्यातली गोष्ट,मी  दुस-या मुलिकडे  असताना मोठ्या मुलीने हे एक आवाहन माझ्यासमोर ठेवले. शिवाजी महाराजांची “स्वराज्य संकल्पना” हा विषय आणि पुस्तकांची यादी पाठवलेली होती. आवडीचे “दैवत”मग काय दररोज रात्री पुस्तकाचे वाचन आणि नंतर नोटस काढणे. वेळ मिळेल तसे वाचन मुलीने करुन घेतले एवढी स्वत: बाळंतीण असुनसुद्धा. एकदा तर मला “जमणार नाही” म्हणुन बोलले त्यासाठी रागवुनसुद्धा घेतले. पुस्तक होते“मंत्रयुद्ध”प्रकाश यादवाडकर लिखित,खरेच अगदी 3 स्तरावर वाचण्यासारखे आहे.           शिवाजी महाराजांची “धुरंदर”ही प्रतिमा तयार होतीच पण त्यांचे अवतीभोवतीचे,निसर्गाचे अवलोकन,गुप्तहेरांची समयसुचकता, प्रसंगी विरोधकाच्या वकिलाला कान-उघाडणी करुन त्याचे इमान जागे करणे (स्वत: वेशांतर करुन),मोहिम अयशस्वी झाल्यास पुढिल कार्यवाही अशा अनेक गोष्टींमुळे मन अगदी अभिमानाने भरुन येते. दुसरी बाजु स...