Posts

Showing posts from August, 2023

तरलाने ( दलाल) स्वयंपाकाला तारले ( 3 जून,1936 ते 6 नोव्हेंबर, 2013)

Image
             16-18 तास विमान प्रवासात/ वारीत वेळ जाण्यासाठी एक उल्लेखनीय बाब अशी म्हणावी लागेल म्हणजे जागे समोरील छोट्या टिव्हीवर   “एका ठिकाणी बसून सलग सिनेमे बघणे”. एरवी घरात असतांना हे शक्य होत नाही कारण काहीतरी कामे आणि एकाच ठिकाणी बसणे. त्यातलाच एक सिनेमा   “तरला” हा होता. अभिनेत्री हुमा कुरेशीचा अभिनय आणि विषय माझा आवडीचा “स्वयंपाक” दुसरे अनेक पर्यायही उपलब्ध होते पण विषय आगळा वेगळा त्यामुळे बघावासा वाटला. एकुणच “तरला दलाल” ही एक व्यक्ती व तिचे संपूर्ण वलयांकीत आयुष्य बघायला मिळाले. एक चांगला चित्रपट बघण्याचे समाधानही मिळाले. काहीतरी वेगळे करायचे या ध्येयापाई   सौ. तरला दलालचा “संघर्ष आणि त्याला मिळणारी पतीची साथ” असा एकूण चित्रपटाचा विषय आहे. काही प्रसंग भावनात्मकदृष्ट्या आणि मानसिकता दर्शविणारी वाटतात.   त्या मुलींना “स्वयंपाक” शिकविण्याचे (फुकट) वर्ग घेतल्यामुळे गर्दी होते म्हणून वाचॅमन गेट लावून घेतो (मुली येत नाहीत). दुसरा प्रसंग पुस्तके न विकल्यामूळे रद्दीत द्यावी लागतात. हॉटेलवाले त्या रद्दीतून पुस्तके उचलून हॉटेलमध्ये ...

लोकमान्य (सन 1856 ते 1920)

Image
              सध्याची झी टिव्हीवरील माझी सगळ्यात आवडती आणि लोकप्रिय अशी मालिका म्हणजे “लोकमान्य” म्हणता येईल. चांगले काम, कलाकार आणि आपला इतिहासातील “एक बाणेदार व्यक्तिमत्व आणि तेवढ्याच खंबीरपणे साथ देणारी लोकमान्यांची पत्नी” असे एकूण वर्णन मालिकेचे करता येईल.  या मालिकेत ( शिवजयंती, गणेशोत्सव सुरु केले, गीतारहस्य लिहीले ...) असे आणखीन बरेच मुद्दे स्पर्ष करायचे राहून गेले असे वाटते. अर्थात त्यांच्या कार्याचा सगळा आढावा ठरावीक एपिसोड मध्ये घेणे शक्य नसले तरी हे आवश्यक होते असे माझे मत आहे.               शाळेत असतांना हमखास लोकमान्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाषण, वकृत्व, वेशभूषा स्पर्धा भरविल्या जात असत. तेवढीच त्यांची आठवण जागवली जायची. टिळक गणित व खगोलशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. ते एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि बहि:ष्कार या चतु:सुत्रीची देणगी दिली हे सगळे विसरतात.   टिळकांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने...

अधिक मास आणि आपण

Image
              सध्या (अधिक) श्रावण मास चालू आहे, त्याच्या कथा, वृत, जावयाचा मान-पान आणि लेकीचे कौतूक असा एकूण माहोल आहे.   हिन्दू कैलेंडरनुसार   प्रत्येक तीन वर्षानंतर कालगणनेनुसार   एक अधिक महिना येतो. अधिक महिन्याची जन्मकथा असेही सांगते की, दर महिन्याला सुर्य हा एकेका राशीतून संक्रमण करतो. या महिन्यात हे संक्रमण होत नाही म्हणूनच याला “मलमास” “पुरुषोत्तम मास” किंवा “धोंड्याचा महिना” असेही म्हणत असावेत. हिन्दू संस्कृतीमध्ये अधिक महिन्यात   स्त्रिया   व्रत, दान, पूजा पाठ करतात. अधिक मासात भगवान विष्णुची की पूजा केल्यास शुभ फल-प्राप्ती होते असे म्हणतात. देवांचे पुजन करुन सर्वांनी भक्तीभावाने वागावे व श्रद्धापुर्वक जीवन निदान एक महिना तरी जगावे असे आपल्या पुर्वजांना वाटत असावे. अधिक मास महिन्यात पितरांच्या नावाने दान पुण्य कर्म केले जाते. अधिक मासातील अमावस्यामध्ये वस्त्र, अन्न, चप्पल, काळे तिळाचे आणि दिप-दान केले जाते.             या महिन्यात दानधर्म, उपवास, पोथीवाचन, संयम आणि एकूणच शरीराचे व मना...

अमेरीकन वारीचे फलीत

Image
                 अमेरीकेची सर्वकष 51 दिवसांची वारी संपली, आता पुढे काय? आम्हा शासकीय कर्मचा-यांना सवय असते. प्रत्येक आठवड्याचा, महिन्याचा आणि वर्षाचा लेखाजोखा ( ABSTRACT) मांडायचा! सवयीनुसार आपण या वारीत काय काय अनुभवले, पाहिले आणि न बघताही काय अनुभवले त्यातून काय नित्कर्ष काय काढले ते आता पाहूया.                वारी चालत केली जाते आम्ही विमानाने/बोटीने/गाडीने केली. वारी सर्व माया-पाश सोडून परमेश्वर डोळ्यासमोर करून कष्ट करून करावयाची असते. या उलट आमची वारी दिर्घ काळ लांब ठेवलेले माया पाश जोडण्यासाठी मुलींना भेटाण्यासाठी   गेलो होतो.   प्रवास विमानाचा असला तरी प्रवासाची पुर्व तयारी आणि दिर्घ प्रवास कष्टप्रद होता पण जाणवला नाही. मुलगी अमेरिकेत गेल्यावर 4.5 वर्षांनी   जाण्याचा योग आला नव्हता पण अचानक ह्या वर्षी अचानक आला. परदेशातील दिर्घ प्रवासाबाबतची धास्ती आणि खाणे-पिणे, हवा याच्याशी जुळूवून घेणे याचा अंदाज घ्यायचा होता. शिवाय नंतरचे कोणी बघितले, आता मुली बोलावतात तेव्ह...

अमेरिकेन वारी भाग-4

Image
        छोट्या लेकीचा निरोप घेऊन नॉर्थ कॅरोलिना विमानतळावर पोहोचलो. सकाळी 7.00 चे विमान होते   9.00 वाजता युरोप,नेवार्क विमानतळावर पोहोचलो. मुलींनी 6 दिवसाची “Classic East Coast Tour from New York with Ariport Transfer, Boston Drop off”ची सहल आयोजित केलेली होती.     यात “New York”,   Washington DC, Philadelphia, Niagara Falls, Manhatten city, Corning (Corning Museum of Glass), Harshey Chocolate World), Boston (Harvard University) चा समावेश होता. विमानतळावरून TOUR OPEPRATOR ची गाडी न्यायला येणार होती पण उशीरा येऊन 12.00 वाजता   होटेलला पोहोचलो. न्युयॉर्कमध्ये सहप्रवासी वेळेत न आल्यामुळे त्या दिवशी आरामच केला. तसेही आम्हाला खूप फिरणे झाल्यामुळे आराम आवश्यकच होता. हॉटेलमधील रुममध्ये   मॅगी आणि नंतर खिचडी तयार करुन खाल्ली. हो, सांगायचे राहिले, मला बाहेरचे खाणे जास्त चालत नसल्यामुळे मुलीने मुद्दाम राईस कुकर सोबत दिलेला होता त्याचा वापर नंतर बर्फाचे तुकडे वितळण्यासाठी चहा, कॉफी आणि पिण्याचे पाणी भरुन घेण्यासाठी   झाला, किती दुरदृष्टी बघा....