Posts

Showing posts from November, 2025

अलविदा- जट,यमला,पगला दिवाना

Image
             चित्रपटात ब-याच वेळा पंजाबी मुलगा/मुलगी किंवा वातावरण,सरसों का साग,गाजर का हलवा, आई/सासु बनवुन देणारी किंवा एखादा पुत्तर/पुत्री म्हणुन विनोदी पात्र आपण बघतो. मुळ पंजाबी असलेले एखादेच धर्मेंद्रपाजी असतात. 1960 च्या दशकातला ते आतापर्यंत जवळ जवळ 66-65 वर्षे चित्रपटात अनेकांगी अभिनय निभावणारे धर्मेंद्र ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार होते. साधारण माझे वडिल शोभतिल अशा वयाच्या धर्मेंद्रना मी फार कमी चित्रपटात बघितले पण एक मात्र कोणीतरी म्हटलेले आठवते,”हिंदित जर कोणी जेम्स बॉंड काढला असता तर त्यांना धर्मेंद्रशिवाय पर्याय नसता. साधारण दारासिंगाच्या पठडीतलाच पण प्रेमळ,सदाबहार आणि कुटुंबवत्सल असा हा अभिनेता कायम तंदुरुस्त असायचे याचे राज त्यांनी त्यांच्या मुलाखतीत “लहानपणी केलेल्या कष्टाचे महत्व”आणि“गावच्या मातीची ओढ” हे प्रामाणिकपणे उत्तर दिले होते. “हि-मॅन,”मदनाचा पुतळा किंवा शरिरसौष्ठवाच्या बाबतीत कोणी हात नाही धरु शकणार असा हा ज्येष्ठ कलाकार, तरुणांबरोबर त्यांचे उत्तम जमायचे, सहकलाकारां-बरोबरही संबंध जिव्हाळ्यांचे होते.     ...

गुंगी गुडिया ते पोलादी महिला- (माननीय माजी व महिला पंतप्रधान-श्रीमती इंदिरा गांधी)

Image
             नुकतीच मान. श्रीमती इंदिरा गांधीची 108 वी जयंती साजरी करण्यांत आली. गेल्या 50 वर्षांपुर्वीचा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. वय वर्षे-8-9, साल-1972-73 असावे,रस्त्यावर आईच्या कडेवर उभी राहुन जीपमधुन येणा-या एका राजकिय झंझावाताचे प्रथम दर्षन कायम अंतरंगात कोरले गेले होते. घरात होणा-या चर्चांवरुन एवढेच कळत होते कि कोणतरी अतीमहत्वाची व्यक्ती आपल्याला आज दिसणार आहे. उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली होती. त्या “आल्या,पाहिल्या आणि मने जिंकली”अशी अवस्था सगळ्यांचीच झाली होती. भाषण काय होते पेक्षा त्यांचे बोलणे ऐकत राहवे अशी त्यांच्या आवाजात जा दू  वाटे. त्यानंतर मोठेपणी त्यांचे अनेक निर्णय त्यावर होणारी उलटसुलट चर्चा एवढे काही कळत नव्हते पण त्याचा संदर्भ बघितला तर आणि आताची कॉग्रेस पक्षाची अवस्था बघितली तर आता “इंदिराबाई” हव्या होत्या असे वाटते. नंतर थोडिफार परदेशी असुनही सासुची जागा/वारसा चालविण्याचा प्रयत्न सुनबाईंनी( सोनीया गांधी)केला, राजीव गांधीनी केला. निदान नात( प्रियांका) तरी त्यांची जागा भरुन काढेल अशी अपेक्षा होती पण निराशाच पदरी आली. ...

महिला गडदर्शन-भाग-2 ( 8-11-25 ते 14-11-2025) (दक्षिण दिग्विजय-2025-ते मंतरलेले 7 दिवस)

Image
        पहिल्या भागात आपण पुणे येथिल 2 किल्ले सिंहगड आणि पुरंदरगडाबाबतची 2 दिवस सहलीचा वृतांत बघितला होता. आता या भागात आपण दुस-या राज्यात तामिळनाडु येथिल 3 किल्ले,मंदिरे आणि इतर प्रेक्षणीय स्थळांच्या भेटिचा तपशील पाहणार आहोत. हे गडदर्शन आमचे कार्यालयातील शिवजयंती उत्सव समितीमार्फत दरवर्षी आयोजित केले जाते. महिलांचा विशेष प्रतिसाद या सहलीला मिळतो, यावेळि तर 137 महिला आणि 4 पुरुष ( टुर चालक- बकेट लिस्ट यांची)सोबत होते. माझा पहिलाच ( दिर्घ प्रवास) अनुभव असल्यामुळे जराशी भिती,उत्सुकता,गड दर्शन आणि सांघिक प्रवासाचा अनुभव/कौतुक बघायचे होते.चला तर मग माझ्याबरोबर प्रवासाला.           दि.811-25 रोजी 12.45 वाजता चेन्नई एक्सप्रेसने छ.शि.ट.हुन सर्व महिला,पुरुष सगळ्यांच्या ( इतर समितीचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या शुभेच्छासह) प्रवासाला सुरुवात झाली. काहिजण ब-याच दिवसांनी/वर्षांनी भेटल्यामुळे तो आनंद मनभर पसरलेला दिसुन आला. सगळे काही स्थिरस्तावर झाल्यावर दुपारचे जेवण आपणच/स्वत: आणायचे असल्यामुळे एकेका वेगवेगळ्या पदार्था...

जागते रहो ( जागे व्हा)

Image
             राजकपुरचा “ जागते रहो” सिनेमा एकेकाळी खुप गाजला होता असे म्हणतात.  पुर्वी वाचमन देखिल रात्री एक चक्कर टाकताना “ जागते रहो” असे म्हणत फे-या मारायचा. काळाच्या पुढे लक्ष असणारे काहीजण आधीच काही भाकिते करित असतात. सर्व सामान्य माणसे मात्र या फंदात पडत नाहित कारण रोज जगायचे कसे? हा मोठा प्रश्न त्यांना सतावित असतो. स्वातंत्र्यानंतर आपण भलेही गरिबी हटाओ” अशा घोषणा केल्या पण प्रत्यक्षात तसे काही घडु नये असेच प्रयत्न केले जातात. हा एक म्हणु शकतो आपण गरिबीची “व्याख्या”बदललिय काही ठिकाणी एवढे मात्र नक्की. जसे कि, झोपडपट्टीत राहतो तो गरिब असे पुर्वी समजले जायचे. आता अशी परिस्थिती आहे कि, सगळ्या सुविधा फुकट पुरविल्यामुळे सगळे कमावणारे मात्र एक पैसाहि “कर न भरणारे,”सगळ्या सोयीसुविधा उपभोगणारे पण त्याचा खर्च मात्र कोणतरी दुस-याच्याच खिशातुन होणारे तो “श्रीमंत”अशी नवीन व्याख्या करावी लागेल.फुकटची सवय आधी लावायची मग ती पुर्ण करण्यासाठी सरकारी तिजोरी खाली करायची.              जो मध्यमवर्ग सगळ्या ...

हम कामयाब होंगे एक दिन….

Image
                      शा ळेत असतांना हे गाणे बहुधा म्हटले जायचे तेव्हा एवढे कळत नव्हते पण प्रत्यक्ष जीवनात आता कधी तो “दिन” यायचा याची वाट बघत बघत जायची वेळ येते पण तो दिन काही उगवत नाही. असे ब-याच जणांच्या बाबतीत होते त्यामुळे समस्या उद्भवतात. कधी पारंपारीक,सामाजिक,आर्थिक,राजकिय तर कधी वैयक्तिक स्वरुपाच्या समस्यांमुळे माणसे नेहमी काळजीत/ प्रयत्नात तर कधी निराशेत जातात. या एका आशेवर जगणारी काही माणसे शेवटी प्रयत्न करुन थकतात तेव्हा एकतर प्रयत्न करणेच सोडुन देतात तर काहीजण वहिवाट सोडुन दुस-या अंगाने प्रयत्न करुन यशस्वी होतात तेव्हा खरेच त्यांचे कौतुक वाटते. संस्कार, शिक्षक,पालक व परिस्थीतीमुळे माणुस घडत असतो तर शिक्षण, व्यवहार, तारतम्यामुळे व्यक्ती प्रगल्भ होत जाते.             कार्यालयीन काम,वैयक्तिक वा खाजगी काम असो आपण अनेक निर्णय घेत असतो.  अंमलबजावणी करतो पण हवे तसे परिणाम मात्र होत नाहित तेव्हाही कधी अपयशी/हतबल वाटायला लागते. निष्कर्ष किंवा फळे मिळतील याची अपेक्षा असते...