भावतरंगची जन्म कथा
दि. 16 मे, 2021 रोजी “भावतरंग” ई-बुक स्वरुपात प्रसिध्द झाले, त्याची ही मुळ कथा. खरे तर गेले 10-15 वर्ष मी लिहित आहे. मधून मधून वर्तमानपत्रे, मासिके आणि समाजाच्या पुस्तकात मी माझे लेख प्रसिध्द करण्यासाठी पाठवत असे. मात्र एवढे 105 लेखांचे पुस्तक होईल असे वाटले नव्हते. म्हणतात ना “हम लिखते गये और किताब बनती गयी” या धर्तीवर, वाचकांसाठी आज एक कायमस्वरुपी ठेवा उपलब्ध करण्याचा एक प्रयत्न केला याचा मला आनंद होत आहे. पुस्तक छापण्यामागे माझे बहिण-भाऊ, पती आणि इतर सर्वजण माझ्यापेक्षा जास्त उत्सुक होते. खरंतर गेल्या वर्षी प्रकाशकाकडे पुस्तकस्वरुपात छापण्यासाठी लिखितस्वरूपात दिलेले होते. परंतू कोविडजन्य परिस्थितीमूळे छापणे शक्य झाले नाही. अन्यथा मागच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रकाशित झाले असते. पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ यावी लागते, तेच याही बाबतीत खरे झाले. पहिल्यांदा मला वाईट वाटले, काही तरी करावयास गेले आणि अनपेक्षितरीत्या सर्वच काम ठप्प झाले...