असाही एक पॉटलक (अंगत-पंगत)
शाळेत असताना एखाद्याने डबा आणला नसेल तर आमच्या बाई सगळ्यांना त्यांच्या डब्यातला एक घास डबा न आणलेल्याला द्यायल्या सांगायच्या. तो प्रत्येकाचा एक एक घास बनून एवढा मोठा होत असे की त्याचे पोट भरुन इतर अनेकांचे पोट आरामात भरत असे. त्या मिश्र खाण्याची मजा यायची. वेगवेगळ्या चवी पदार्थ, प्रकार खावयास मिळायचे तिच गोष्ट बिल्डींग मधला एखादा मुलगा किंवा मुलगी काही कारणाने एकटी रहात असेल तर तिला / त्याला खाऊ देण्यासाठी वेगवेगळे प्रकार सगळ्या घरातून पोहचायचे. या सगळ्यांचे प्रेम बघून ती किंवा तो भारावून जात असे आणि वेगवेगळ्या चवी / पध्दत / प्रकार खाऊन समृध्दपण होत असे. त्याचाच परिणाम म्हणून तो किंवा ती अन्य वेळी इतरांना मदत करायला तत्पर असे.आता असे शक्यतो कोणी करायला जात नाही कारण खाजगीकरण हा मुद्दा अभिप्रेत असतो. पॉटलकचा अर्थ असा दर्शवतो की विशेष तयारी न करता जे शिजवले जाईल ते अन्न परंतू मला वाटते ते असे नाही. यामध्ये प्रत्येकजण आपआपल्या आवडीनुसार सोईनुसार ठरवून एका विश...