Posts

Showing posts from August, 2024

आधुनिक युगातला मातृभक्त पुंडलीक

Image
                                 If you take care of your parents,                   Your children will be take care of their parents.                                   - Dr. Vithal Indira Venakatesh Kamath.         नुकतेच विट्ठल कामथ लिखित “ यश, अपयश आणि मी “ हे पुस्तक वाचनात आले. याधी मी त्यांचे “ इडली, ऑर्किड व मी “ हे वाचले होते. खरेच या माणसाचे किती आणि कसे कौतुक करावे तेच कळत नाही. होटल व्यावसायिक,पर्यावरणप्रेमी आणि प्रेरणादायी व्यक्तीमत्वाबरोबरच “ मातृ-पितृभक्त ” विट्ठल अशी नवीन ओळख आणि “ असाध्य ते साध्य ” पर्यंतचा त्यांच्या जिद्दीला सलाम करावासा व...

धर्म, राजकारण आणि उद्योग/क्रिकेट

Image
             नुकतेच चेतन भगत लिखित “ Three mistakes in my life ” हे अनुवादित पुस्तक वाचण्यांत आले.  गत आयुष्यांत केलेल्या चुकांबद्दल एवढी प्रांजळ कबूली क्वचितच कोणी देत असेल. तरुण पिढीला आकर्षित करुन आणि वाचकाला खिळवून ठेवणारी तसेच सध्याच्या वास्तवावर प्रत्यक्षपणे भाष्य करणारी एक परखड कादंबरी असेच वर्णन या पुस्तकाचे करावे लागेल. म्हणूनच यासंदर्भात मलाही लिहावेसे वाटले क्रिकेट वगळून!                     वरील तिन्ही विषयांवर लिहावे तेवढे थोडेच आहे.  हे विषय सामाजिक माध्यमांवर तर वारंवार चघळता येऊ शकेल इतपत त्याची जाण प्रत्येकाला असते. त्यावरुन जनमतही आजमावता येते. अप्रत्यक्षपणे मतपरिवर्तन, अवलंबून राहणे किंवा त्याच्यावर किती अवलंबून राहायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. धर्म, राजकारण आणि उद्योग/क्रिकेट पैकी धर्म, राजकारण आणि क्रिकेट हे विषय भारतीय मनात सर्वत्र व्यापून राहिलेले म्हटले तर जिव्हाळ्याचे आणि म्हटले तर दंगलीचेही कारण ठरणारे. या तिन्ही विषयात ...