जगा आणि जगू द्या त्यांना त्यांच्यासारखे…
जगा आणि जगू द्या त्यांना त्यांच्यासारखे… मध्यंतरी एक लेख वाचनात आला, “ जंगलाला धडकी भरलेली आहे, ” लेखाचा मतितार्थ असा होता की, आता सुट्ट्या पडणार आणि वेड लागल्यासारखी माणसे निसर्गाकडे/जंगलाकडे धावत सुटणार! त्यामूळे जंगलातील रहिवासी, प्राणी, पक्षी, फुले, झाडे यांना त्याचा त्रास होतो. एकतर शांतता भंग पावते तर दुसरीकडे कचरा ,गोंधळ, आवाजामुळे त्यांना त्रास होतो, त्यांच्या नेहमीच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो. जसे माणूस पाहूणा म्हणून कधीतरी गेला तर बरे वाटते. सारखे कोण ना कोण येतच राहिले तर घरातले सगळेचजण वैतागतात तसेच. काही घरात कायम ही सवय असते त्यांना काही फरक पडत नाही म्हणा ! पुर्वी सहसा माणसे कारणाशिवाय “ फिरायला ” म्हणून असे घराबाहेर पडत नसत. प्रवासाची साधनेही नव्हती, पैसाही गाठीशी नव्हता. मला आठवते, वडील रेल्वेत आहेत म्हटले ...