Posts

Showing posts from July, 2024

माझे -हदयस्थ गुरू

Image
                                     “ जे जे आपणांसी ठावे, ते  इतरांसी सांगावे,                                            शहाणे करुन सोडावे सकलजन ”              उपरोक्त उक्तीनुसार जी जी माणसे आपल्या आयुष्यात येतात ती सगळीच एक प्रकारे आपल्याला काही चांगले-वाईट शिकवून जातात त्यामूळे ती गुरुस्थानी असतात, मग ती ग्रंथ असो, गुगल असो किंवा निसर्ग असो. आषाढ महिन्यातल्या पौर्णिमेला “ गुरुपोर्णिमा “ साजरी केली जाते ती गुरुप्रती असलेल्या कृतज्ञतेच्या भावना व्यक्त करण्यासाठीच होय.                    आपले ऋषीमुनी,संत-परंपरा किंवा अगदी गणपती, सरस्वती यांना आद्यपुजेचा मान दिला जातो ते या दृ...

मुलीकडचे माहेरपण आणि प्रेमळ सासुरवास

Image
            शिर्षक वाचून तुम्हाला प्रश्न पडला असेल दोन्ही एकत्र कसे? हो, मी याचा अनुभव सन 2021 पासुन घेत आहे. एकदा भारतात आणि 2 वेळा अमेरिकेत. मुद्दामच लिहायला घेतला हा विषय कारण बरेचजण हे मान्य करणार नाहीत पण मुलींचा सुद्धा सासुरवास असतो बरे! माझी छोटी मुलगी जेव्हा पहिल्यांदा 2020 मध्ये सिल्वासा ( गुजरात सीमा) येथे गेली तेव्हा करोनामुळे अक्षरश: 2 वर्षे घरीच होतो.त्यानंतरही कुठे जाण्याचे धैर्य होतच नव्हते तरी हट्टाने तिने आम्हाला डिसेंबर-21 मध्ये तिकडे बोलावून (तिकीट आणि हॉटेल बुकींगसह ) घेऊनच गेली.  4 दिवसच मोठ्या हॉटेलमध्ये मुक्काम आणि सोबतीला गाडी व ती स्वत: हजर राहत होती. खरे तर नवीन शहरात आल्यामुळे आम्ही व तीही तेवढी परीचीत नव्हती पण तिच्या आग्रहापुढे मान झुकवावी लागली. आम्हालाही उत्सुकता होतीच कारण वापी (गुजरात) एवढे लांब नाही तरी याआधी कधी जाणे झाले नव्हते. थोडेफार गोव्यासारखेच वाटले. तसाही पोर्तुगीजांचा प्रभाव दिसत होताच. ग्रीन शहर म्हणुन ( प्रदुषण विरहित ) जाहीर केल्यामुळे जास्त आवडले हे ठिकाण. हवापण छान आणि लेकीचे सगळे आयोजन, बाग, समुद्रकिनार...