Posts

Showing posts from June, 2024

बकेट लिस्ट ( सुप्त इच्छा) ची पुर्तता

Image
                      हजारो ख्वाईषे लेकर जी रहे थे हम !                      एक भी पुरी नही हुई, युही निकल पडे हम !!                असे कुणी लिहिले आठवत नाही पण काही लोकांच्या बाबतीतले वास्तव आहे.   हा शेर प्रत्येकाच्या आयुष्याची कहाणी  सांगून  जातो तसेच विचार करायलाही भाग पाडतो. जीवन संपते पण आपल्या आशा-आकांक्षांचा अंत होईलच असे नाही.   लहानपणीच्या गोष्टीतल्या आजीसारखी कमी-अधिक परिस्थिती आपल्या सर्वांचीच असते. गोष्टीतल्या आजीला वेळोवेळी न्यायला “ यम ” (मृत्यू) येत असतो पण प्रत्येक-वेळी काही ना काही कारण सांगून यमराजाला आजी परतावून लावीत असते. शेवटी एक दिवस कंटाळून आजीला “ यम ” घेऊनच जातो. त्यावेळी प्रश्न पडायचा “ खरेच असे होते का? ” किंवा असा   चॉईस असतो का मरणाला? आता त्याचा संदर्भ आठवतो आणि हसायला येते. खरे तर “ जीवनेच्छा ” ( जीवन...