Posts

Showing posts from March, 2024

पावलोपावली आढळणारे/ पावणारे देव/ देवळे? / प्रार्थनास्थळे

Image
               रस्त्यावरून चालताना पावलोपावली आपल्याला अनेक शेंदुर फासलेले दगड आणि अवती भोवती/झाडामागे/ खाली (विशेषत: पिंपळ, उंबर किंवा वड) येथे मुर्त्या / फोटो / प्रार्थनास्थळे आढळतील. कोण हे सगळे करते आणि का हा मला कायम पडणारा प्रश्न! त्यातच एक बातमी वाचनात आली. केरळ हायकोर्टाने एका निर्णयात “ देवळे म्हणजे सार्वजनिक जागेचा अपव्यय होय” असा निर्णय दिल्यामुळे हा विषय लिहावासा वाटला.               कित्येकदा मनपा / शासन आणि स्थानिक रहिवासीसुद्धा काही करू शकत नाही. धार्मिक भावना आड येतात ना! अहो, प्रत्यक्ष देवाला जरी विचारले तर तोही म्हणेल, अरे, मला असे नको रे उन्हा-तान्हात उभे नको करुस! “देव नाही देव्हा-यात...ऩको शोधु काशी-विश्वेश्वर… अशा अनेक गाण्यातुन हेच सांगण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो. ऐकेल तर तो मानव कसला? यामागे बरेच हात गुंतलेले असतात असेही माझ्या कानावर आले. एक म्हणजे काळा पैसा कसा संपवायचा याचे उत्तर. दुसरे म्हणजे मिळणारा मोठेपणा आणि तिसरा होणारा आर्थिक लाभ आणि   या...

जय हो विज्ञान !

Image
              नुकताच “ 28 फेब्रुवारी ” नेहमीप्रमाणे रोजी “ विज्ञान दिन ” साजरा झाला. आम्ही दोघेही वाणिज्य शाखेचे विद्यार्थी त्यामुळे विज्ञानाचे कायम कुतूहल आणि निर्माण होणारी जिज्ञासा शांत बसू देत नाही. मुलींनी अभियांत्रीकीला प्रवेश घेतल्यामुळे तर विज्ञानाची जिज्ञासा जास्तच वाढत गेली. विज्ञानाच्या अनेक शाखा आहेत,- त्यातल्या सगळ्याच शाखा समजून घेणे कठिण आहे परंतु दैंनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नेहमीच आपला संबंध विज्ञानाशी येतोच फक्त आपण लक्षपुर्वक त्याचा विचार करता येत नाही एवढेच. विज्ञान आणि तंत्रज्ञान हातात हात घालून चालत असल्यामूळे सर्वसामान्य जनतेला त्याच्याबद्दल उत्सुकता असते आणि त्याचा वापर जिवनात होतो..             असंख्य प्रयत्न, प्रचंड मेहनत, शोध, निरिक्षण आणि निष्कर्ष याबाबत कुणालाही सोयरसुतक नसते. जेव्हा त्याचे फळ दृष्टीस पडते तेव्हा खरे तर तो त्यांना चमत्कार वाटतो. उदा, द्यायचे तर आताचे मोबाइल, नळाला पाणी येणे, गरम होणे, वाशिंग मशिन किंवा अगदी टयुब्लाइटचे देखील देता येईल.    ...

सोनेरी आवाज हरवला….. आणि मन उदास झाले….

Image
               नकळत्या वयात रेडिओ आणि रेडिओ सिलोनचा जो संबंध सुरु झाला तो केवळ श्री. अमिन सयानी यांच्या आवाजामुळेच. एखाद्या आवाजाचे वेड लागणे म्हणजे काय ते या आवाजाने शिकवले. लहानपणीचे “ स्टाईल आयकोन ” असे म्हटले तरी हरकत नाही. त्यांचे उर्दुमिश्रीत हिंदी आणि मिष्कील बोलणे कधी एकदा ऐकतो असे व्हायचे. त्यामध्ये घरातले सर्व आबालवृध्द्द सहभागी असत. आई-वडिल, भाऊ आणि मी उर्दू भाषेची माझी आवड त्यांच्या बोलण्यातूनच निर्माण झाली असावी असे वाटते. एवढी की एकाने एकदा तसे बोलूनही दाखवले, “ मॅडम आपके उर्दू उच्चारण इतना सहज कैसा है? ” लहान वयात बोलण्याने/ऐकण्याने एवढा प्रभाव पडू शकतो हे त्यादिवशी मला कळले. तेव्हा माझी हिंदी बंबैय्या नव्हती त्यामुळे असेल, फार जुनी गोष्ट आहे ही ! ( साधारण सन 87-88 च्या दरम्यान).1993 च्या नंतर शासकीय कार्यालयात लागल्यामुळे हळुहळू शुद्ध हिंदी बोलणे कमी झाले.                 एखादा बुधवार “ बिनाका गीतमाला ” नाही मिळाले ऐकायला तर अगदी चुकल्या- चुकल्या सारखे वाटायच...