Posts

Showing posts from October, 2021

आयत्या बिळावर नागोबा.

Image
                   माझ्या मैत्रीणीचा नवरा कायम   मैत्रीणीला बसून खाते म्हणून चिडवत असतो तरी बरे बायको नौकरी करणारी आहे. इतर गृहीणीबद्दल काय बोलला असता?   बसून खाणे म्हणजे काय हे मला कळले नाही. माझ्या मते काहीही काम न करता “आयत्या बीळावर नागोबा” या अर्थाने असावे पण आपल्या सारख्या मध्यम वर्गात असे बसून खायला कोणालाच मिळत नाही. काहीना काही तरी काम करावेच लागते अपवाद फक्त लहान मूले, दिव्यांग आणि म्हाता-या माणसांचा असावा.   पिढीजात श्रीमंत असणारेसुध्दा दुस-यांना असे कधी म्हणत नसतील.                असा हा विचार करायला लावणारा वाक्प्रचार मनाला कधी कधी खुप त्रास देतो. जसे की, शिपाई लोकांना त्यांच्या वरच्या लोकांबद्दल असाच गृह असतो की हे मस्त “खुर्चीत फॅनखाली” बसतात आणि आदेश सोडतात. सर्वसाधारणपणे सरकारी खात्यात माणूस हलला नाही तरी चालेल पण नस्ती (File) हल्ली पाहिजे त्याशिवाय कामे पुढे सरकत नाहीत. दहा लोकांच्या हाताखालून गेल्यावर त्या फाईलवर काहीतरी निर्णय घेतला...

माझे अलिबाग पर्यटन

Image
               दोन वर्ष घरात ( नाईलाजाने ) राहून अगदी कंटाळा आला होता. आता कुठे कोविड बंधने शिथील होतात बघून आम्ही अलिबागला जायचे ठरविले. माझी, पती आणि मुलीची सुट्टी, गर्दी, रहाण्याची व्यवस्था, सरकारी बंधने इत्यादी अडथळे पार करून एकदाचे दस-याच्या दिवशी अलिबागला कॅटरमन बोटीने आम्ही सीमोल्लंघन केले.   बरेच दिवस समूद्र पाहिला नव्हता, अनायासे सगळे जुळून आले.             समुद्राच्या समोर सरकारी विश्रामगृह “तुषार” असल्यामूळे 3 दिवसात आरामात खाणे, पिणे, फिरणे आणि थकून भागून झोपणे इत्यादी मजा चालू होती. त्यात किल्ले कुलाबा, जंजीरा नुकतेच खुले झाले असल्यामूळे माफक गर्दीत छानपैकी बघून झाले. अलिबाग, किहीम, काशीद, मांडवा, नागाव, मुरुड, रेवस, वरसोली, आवास चौपाट्या यथेच्छ फिरून झाले,   काढले.   बिर्ला मंदीर, अलिबागमधील बालाजी आणि विठ्ठल ररुमाईचे मंदीर बघितले. सोबतीला शाकाहारी-मासांहारी जेवण होतेच.   समूद्र समोर असल्याने सकाळ, संध्याकाळ,   रात्री फिरायला मजा येत होती.   एकूण प...

चेहरे की मुखवटे?

Image
       “ चेहरा क्या देखते हो. दिल मे उतरके देखो ना” ...आशाताई आणि कुमार सानु यांनी गायलेले हे गाणे किती अर्थपूर्ण आणि सत्य परिस्थिती उलगडून दाखविणारे आहे. असे ही चेह-यांवर मुखवटे घालूनच आपण वावरत असतो.  कोणत्याही गुप्तहेर मालिकेत ही वाक्ये ठरलेली असतात. चेहरा कधी फसवणूक करेल ते सांगता येत नाही. हस-या चेह-याची माणसे सगळ्यांना आवडतात पण त्या हसण्यामागे किती दु:ख आणि न्युन लपलेली असतात ते त्या परमेश्वराला ठाऊक!  दिव्यांग मूले सुंदर, प्रेमळ व लाघवी असतात मग त्यांना असे का बनवतो? हा प्रश्न मला नेहमी पडतो. वैभवाच्या किंवा समृध्दीच्या आणि आनंदाच्या अत्युच्य शिखरावर असतानासुध्दा काही चेहरे कायम दुर्मूखलेले असतात हे ही एक कोडेच आहे.        माणूस मोठा होत जातो तसा तो अनेक मुखवटे घालायलासुरू करतो. कधी परिस्थितीमूळे तर कधी काळाची गरज तर कधी अपरिहार्यतानुसार या बेगडी दुनियेत स्वत:चा खरा चेहरा हरवतो हे त्यालासुध्दा कळत नाही. नुकताच अमिताभ बच्चनचा “चेहरे” हा चित्तपट बघण्यात आला. त्याचा नित्कर्ष एवढाच होता, “प्रत्येक चेह-यामागे एक गुन्हेगार दडलेला असत...

पाळणाघराची गरज

Image
            50 वर्षापुर्वींपासून स्त्रिया नौकरी करायला लागल्या तेव्हा एकत्र कुटूंब पध्दतीमूळे मुलांची गैरसोय होत नसे. जेव्हा विभक्त कुटूंबपध्दतीचे स्तोम बळावल्यावर किंवा कधी नाईलाजाने (कुणीच उपलब्ध नसल्यामूळे) पाळणाघराची गरज निर्माण होत गेली. अनेक गोंडस नावे देण्यात आली, “बेबी केअर”, “नर्सरी” आणि “डे-केअर” अशा नावाने हा एक चांगला घरगूती व्यवसाय ब-याच जणांना सोईचासुध्दा झाला. दोघांची गरज आणि मदत अशी “एकमेकां सहाय्य करू “अशी ही व्यवस्था चांगलीच होती व आहे.              मला स्वत:ला मात्र ही समस्या खूप जाणवली कारण तेव्हा लालबागला कुणीही तयार नव्हते. ब-याच प्रयत्नांती शेजार-या इमारतीमधली बाई तयार झाल्यामूळे मुलींची सोय झाली. सुदैवाने दोघींनाही चांगली पाळणाघरे मिळालयामूळे शाळेत जाईपर्यंतचा प्रश्न तरी सुटला. शाळा सुरू झाल्यावर मात्र दुहेरी कसरत सुरू झाली कारण शाळा एकीकडे आणि ऑफीस दुसरीकडे. तरी नव-याने ही जबाबदारी लीलया पार पाडली.   आता त्याचे फार आश्चर्य वाटते पण त्यातही एक आनंद असायचा.          ...

विषमाकडून समसंख्येकडे

                    नुकतीच वयाची 55 वर्ष पुर्ण केली. पुर्णांकाकडे प्रवास सुरू असल्याचा द्योतक म्हणजे हे वाढदिवस असतात. 1 ऑक्टोबर-2020 ला मी “मराठी संवर्धन मंडळावर” पहिला लेख “स्थानिक प्रेक्षणिय स्थळे” हा लेख लिहीला होता त्याला एक वर्ष पूर्ण होणार. मध्यंतरी माझ्या मैत्रिणीनी एक लेख लिहीला होता. माणसाला पुर्णांकांचे काय एवढे आकर्षण असते? मला वाटते जगण्यासाठी प्रत्येक जण एक निमित्त शोधत असतो मग ते घर घेणे, नौकरी लागणे, धंदा सुरू करणे अशी विविध स्वप्ने तो बघत असतो. ती पुर्ण झाली की मग पुन्हा ( आयुष्याचे सार्थक असे वाटून) पुढील वाटचाल सुरू ठेवणे हेच प्रत्येकजण इमाने-इतबारे करीत असतो.                  या उलट 55 संपली, थोडी उरली, आता काय करायचे? (जिथे उद्याची शाश्वती नाही तिथे काही जणांना 100 गाठायची भारी हौस असते) असा विचार करणारे असतात.   काही जण भरपूर आयुष्य मिळाले,   उरलेले आयुष्य समाजासाठी, स्वत:साठी सुखाने जगूया, असा विचार करणारे असतात. या दरम्यान ...