मनी नाही भाव आणि “वडा”(देवा) मला पाव
“मनी नाही भाव आणि वडा मला पाव” असा संत गाडगे महाराजांचा अभंग आपल्या अंधविश्वासावर मार्मीक टिका करतो. असेही आपण ब-याच गोष्टींचे अंधानुकरण करत असतो त्यातली ही एक “वट पोर्णिमा” ज्यामूळे मूळ उद्देश बाजूला राहून नुसता दिखावा ठरतो. हल्ली सामाजिक माध्यमे तर यासाठी एक चावडी ठरली आहे. वेगवेगळे मिम्स, फोटो, रांगोळी, जिंगल्स, चॅट्स असे सगळे जण आपआपले हात धूवून घेतात. त्यात हा विषय जिव्हाळ्याचा समजून पुरूष सुध्दा हिरहिरीने भाग घेतात याचे नवल वाटते. खरं तर वटपुजा करावी किंवा करु नये, केली तर कशी करावी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. केली तर अगदी साग्रसंगीत नाहीतर उगीच सात जन्म कशाला अडकवा असे म्हणून सोईस्कर रित्या दुर्लक्ष करणारे आहेत. पुरूषही तेवढीच आपली सुटका झाली म्हणून खूष असतात. मी आणि माझ्या आधीच्या पिढीने सर्व काही मनापासून आता पर्यंत केले. वातावरणही तसे पोषक होते. वडाची फांदी आणून पुजा करणे हा प्रकार पटत नाही. काही जण फोटोची पुजा कर...