Posts

Showing posts from December, 2022

सेवापूर्त्तीचा आनंद

Image
         नुकताच एका शासकीय अधिका-याचा सेवानिवृर्त्तीचा समारंभ साजरा करण्यात आला. सेवानिवृत्तीपेक्षा “सेवापुर्त्ती” हा शब्द मला जास्त योग्य वाटतो.   शासनसेवा ही एक (सशुल्क )सेवा आणि जनसेवा,कल्याणकारी हेतूने सर्वसमावेशक विकास साधावा अशा हेतूने आयोजित केलेली सेवा असते. चकमकाट/झगमगाट किंवा पगाराचे आमीष नसले तरी निवृत्तीवेतन आणि नौकरीत स्थेर्य या हेतूने काही जण सरकारी नौकरी स्विकारणारेही असतात.   अगदी डॉक्टर्स, इंजिनियर्स यांनासुद्धा सरकारी नौकरी आकर्षित करत असते. वास्तविक 4 दशकापुर्वी केवळ 10वी व आता कोणताही पदवीधर परिक्षा देऊन ही शासकीय सेवेस पात्र ठरु शकतो. शासकीय नौकरी करण्यासाठी लागणारा संयम, थोडक्यात समाधान मानण्याची वृत्ती आणि सेवाभावी स्वभाव असणे आवश्यक असते. अशा या जेव्हा 38-40 वर्षे सेवेला पुर्ण होतात तेव्हा निवृत्ती कशी? सेवापुर्ती हवी ना!              सोहळा म्हटले की, मिरवणारे,   कौतुक करणारे, जुन्या ग़ोष्टींची जाणीव ठेवून आठवणीने भेटणारे असे सगळेच येत होते. त्यात “सत्कारमुर्ती”सुद्धा साजीशीच होती,त्य...

न पाठविलेले पत्र

Image
            “न पाठविलेले पत्र” हे नुकतेच वाचनात आलेले पुस्तक (“Unposted Letter” writtenby Mahantrai Ra) त्याचा मराठी अनुवाद हेमलता अंतरकर यांनी केलेला असून अतिशय आशयपुर्ण व सकारात्मक ऊर्जा देणारे असे वाटते. प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्या आयुष्यात “ परिवर्तन” आणण्याचा प्रयत्न कमी-अधिक प्रमाणात करीत असतोच. कधी यशस्वी   होतो तर कधी अयशस्वी. अशा वेळी त्याला कोणी तरी स्फुर्ती देणारे, कौतूक करणारे,   मार्गदर्शन करणे किंवा धीर देणारे, कारणमिमांसा करणारे हवे असते. माणसे तर दुर्मिळ होत चालली आहेत अशा वेळी   अशा पुस्तकांचा मोठा मानसिक आधार वाटतो मनाला.              उत्क्रांतीमध्ये  आपल्या पुर्वजांनी अनेक भुमिका पार पाडलेल्या आहेत. आज आपण त्याचीच फळे चाखत आहोत, आपण पुढच्या पिढीसाठी काय करणार आहोत? या एका प्रश्नाने आपला आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो, परिवर्तन घडवून आणू शकतो. कालच्यापेक्षा आज व आजच्यापेक्षा   उद्या नक्कीच कमी-अधिक प्रगती करीत असतो. काहीजण स्वत:पुरते   करु शकतात...

सबसे बडा रूपया

Image
              नकळत्या वयात “ सबसे बडा रुपया” हा सिनेमा बधितला होता, कळले काहीच नाही, फक्त     मेहमुदची कॉमेडी आणि हे टायटल सॉग.   रुपयाची किंमत हळूहळू कळत गेली. शिक्षणही त्यासबंधीच आणि पर्यायाने त्याच क्षेत्रातील मिळाल्याने जास्तच महत्व जाणवू   लागले. तसेही प्रत्येकाचे आयुष्य कमी अधिक प्रमाणात पैशाभोवतीच फिरत असतेच. आमच्या आधीच्या पिढीकडे जास्त पैसा हाताशी नव्हता.   हे भाग्य आमच्या पिढीला थोडेफार मिळाले, हातात पैसा खेळू लागला. निदान पोटाला चिमटा काढावा लागला नाही, मात्र लहानपणीचे काटकसरीचे धडे लक्षात असल्यामुळे पैसे खर्च करतांना “खरंच आवश्यक आहे का?” हा प्रश्न कायम मनात निर्माण होत असतो. कर्ज, आशा-आकांक्षा, गुंतवणूक वगैरे शब्दांचा जन्म आमच्या काळातच झाला, पर्यायाने त्यासाठी धावणेही आले.                 पैसा चालतो, बोलतो आणि वागायलापण भाग पाडतो असे आपण ऐकतो, तसा अनुभवही कधी कधी मिळतो. गरिबी, अज्ञान आणि आरोग्य सांभाळण्यासाठी पैसाच धावून येतो. पैशाने सर्व काही विकत घ...