Posts

Showing posts from August, 2026

महाभारतातील व्यक्तीरेखेंतुन आपण काय शिकायचे?

Image
           म हाभारत हे एक प्रतिसृष्टी वाटण्याइतपत निर्माण झालेले आहे असे वाटते. कधी कधी हे माणसांचेच जग असुन त्यात माणसांचेच मनोव्यापार दिसतात. यातल्या अनेक व्यक्तिरेखा आजही आपण बघत असतो. मनात पीळ हवा पण अहंकार नको, प्रामाणिकता हवी पण दुष्टता नको हेच या सर्व व्यक्तिरेखा दर्षवितात म्हणुनच त्या आजही वाचाव्याशा वाटतात.त्यावर लिहावेसे वाटते, ऐकावेसे वाटते, पहावेसे वाटतेपुन्हा पुन्हा. माणसांच्या स्वाभाविक वृतींचाच हा एक चित्रपट भासतो. त्यातुनच जगण्याचा,झुंजण्याचा मार्गही दिसतो. अशा अनेक व्यक्ती/प्रसंग व्यावहारिक जगाचा आरसा दाखविणारे तर भावना, कर्तव्य, निष्ठा, दु:ख, सोशिकता असे अनेक गुणही महाभारतात आढळतात.          पुढिल 4 महिन्यांत प्रत्येक आठवड्याला एक असे व्यक्तिमत्व लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. या वर्ष अखेरपर्यंत पुर्ण होईल किंवा नाही ते सांगता येणार नाही पण हा प्रवास असाच पुढे चालु राहील. यामध्ये स्त्री-पुरुष दोघांचाही विचार करण्यांत येणार आहे. यासाठी लागणारे संदर्भग्रंथ:- पंचनायिका आणि शक्ती- वसंत कडेकर आणि डॉ.पोतदार 2...

बोलायला तर हवंच…एक मानसशास्त्रिय दृष्टिकोन.

Image
               हा विषय स्पर्धेसाठी दिल्यावर पहिल्यांदा काय लिहावे ते कळेचना. मी स्वत: अबोल,शिष्ठ( असे लोक समजतात) आणि स्वयंकेद्रित/घुमी (INTROVERT) अशी आहे. त्यामुळे काय बोलायचे हा मलाही व-याचवेळा प्रश्न पडतो. समोरचा बोलका असेल तर मला बरे वाटते कारण मी स्वत:हुन कधी कोणाशी बोलत नाही. काही अपवाद आहेत त्यामध्येपण. जन्माला आल्यापासुन्न प्रत्येक प्राणी,वनस्पती,पशूपक्ष्यांना व्यक्त तर व्हायचेच असते फक्त प्रेत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते. निसर्गाचा प्रेत्येक घटक व्यक्त होण्यासाठी आतुर असतो. माणुस मात्र शास्त्रशुद्ध भाषेत, व्यवस्थित समोरच्यला कळेल अशा रितीने व्यक्त हौऊ शकतो. एकप्रकारे देवाने अधिकची ही बोलण्याची कला दिलेली आहे असेच म्हणावे लागेल. बोलले की मनातल्या भावना स्पष्ट होतात. हेतु कळतो आणि त्याप्रमाणे समोरचाही प्रतिसाद देऊ शकतो.              काहिजणांचे बोलणे ऐकत राहावे असे वाटते तर काहीजण कधी गप्प बसतील म्हणुन वाट पाहावी लागते. काहिजण दुस-याना आवडेल,रुचेल असेच बोलतात तर काहीजण मौनं सर्वार्थ साधनम” म्हणुन कायम...

योग्य जाणीव

Image
                ब्रम्हविद्येच्या अभ्यासात “योग्य जाणीव” हा भाग जेव्हा शिकवण्यात आला तेव्हा त्याचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्व लक्षात आले. प्रत्यक्ष जीवनात स्वत:चे स्थान ओळखणे म्हणजे “योग्य जाणीव” होय. ज्या गोष्टी आपल्याला समजतात किंवा ज्याची आपल्याला पुर्ण जाणीव आहे अशाच गोष्टी आपल्याला मिळू शकतात. ही योग्य जाणीव प्राप्त करणे/करुन देणे हे प्रथम कर्तव्य आई-वडिल, शिक्षक आणि परिस्थीती वारंवार आपल्याला करून देत असते. योग्य जाणीव मनात दृढ झाल्यावरही ती आचरणांत आणणे कठिण असते. अशी योग्य जाणीव प्राप्त झाली नाही तर मनुष्य आपल्या जन्माचा स्वामी न होता परिस्थितींच्या हातातील एक बाहुले होऊन जातो. यात आपण कोण आहोत,कुठे आहोत आणि आपल्या आजुबाजुला काय घडत आहे याची आपल्याला असणारी समज असते.             ब-याच वेळा असे होते कि, आपल्यालाच कळत नाही आपण का व कशासाठी आणि कसे जगत असतो. परिस्थिती,कर्तव्य आणि सवयीमुळे आपण आपल्याही नकळत कामे करित असतो. हक्क आणि कर्तव्याच्या मर्यादा आपण आपल्याही नकळत पार पाडित असतो. दरवर्...

विद्यार्थी, आंदोलन आणि बरंच काही….

Image
           एकेकाळी मुलभूत हक्कांमध्ये”शिक्षण हक्का” चा समावेश होणे हे एक महत्वाचे पाऊल ठरले होते. शैक्षणिक,सामाजिक क्रांतीसाठी हे एक अत्यंत आवश्यक आहे हे वारंवार समाज सुधारकांनी आणि  शैक्षणिक क्रांतीकारकांनी पटवुन दिल्यावरच हे शक्य झाले होते. अज्ञान, गरिबी आणि परिस्थितीमुळे अनेकजण शिक्षणापासुन वंचित राहत होते त्यांना यामुळे दिलासा आणि प्रोत्साहन मिळाले. निदान काही प्रमाणात समस्या सुटण्यांसमदतच झाली मात्र दर्जा टिकविणे/सांभाळणे हे नाही जमले आपल्याला.             इंग्रजांनी 10+2+3 हा घालुन दिलेला पायंडा अजुनही आपण सांभाळत आहोत. त्यातुन निर्माण झालेले पांढरपेशा समाज पुढे जाऊन आपली स्वतंत्र शिक्षणव्यवस्था निर्माण करू शकली नाही. असलेली व्यवस्था सर्वसमावेशक कशी करता येईल याचाही विचार केला जात नाही याचे जास्त वाईट वाटते.आपले विद्यार्थी परदेशात जाऊन चमकतात पण इथे का नाही? याचाही कोणी विचार करत नाही. एकीकडे स्पर्धा,परिक्षा आणि वर्गासाठी चाललेले राजकारण,पैसा दिवसेंदिवस शैक्षणिक स्तर किती खालावत चाललाय हे आपण उघड्या डोळ्यांनी बघ...

मधुसखी आणि मधुमित्र-भाग-2

Image
                          (The one who holds a place in every heart)            भाग-1 ( मित्रांगण-2021)मध्ये आपण मित्रांची ओळख आणि महत्व वाचले असेलच. मैत्रीबद्दल कितीही लिहिले तरी कमीच असते असा हा जिव्हाळ्याचा विषय पुन्हा एकदा तुमच्या भेटिला. त्याचे झाले असे,मधमाशीपालनासाठी देण्यांत येणारा “मधु-मित्र,मधुसखी” देण्यांत येणारा मानाचा पुरस्कार. वृत्तपत्रात ही बातमी वाचुन आनंद,कौतुक तसेच नावाचेही कुतूहल वाटले. संपुर्ण बातमी वाचल्यावर कळले कि,मानवी जीवनासाठी आवश्यक असलेली हि एवढी मधमाशीचे अनन्यसाधारण महत्व. मधमाशी पालन (beekeeping) ह शेतीला जोडधंदा म्हणुन केला जाणारा आणि कमी खर्चाचा व्यवसाय आहे. यात मध व मेण असे मौल्यवान पदार्थ तर मिळतातच सोबत मधमाशी करित असल्यामुळे परागीकरण पिकांच्या उत्पादनात वाढ होते. तसेच मधुमाशी पालन यासाठी शासन व्यवसाय मार्गदर्शनही देते. याशिवाय मोठ्या बागांमध्ये ( महाबळेश्वर,बोरिवली येथे मी स्वत: बघितल्यात.) वनखाते याचे प्रदर्शन भरवुन पेट्या व उपकरणे व त्याचे प्रशिक्षण आणि ...