Posts

Showing posts from May, 2025

मी का लिहीते? मला का लिहावेसे वाटते?

Image
  हा प्रश्न अनेकांना पडतो तसा मलाही कधीतरी पडतोच. का बरे मी लिहीत आहे, विशेषकरुन अशा काळात जेव्हा मराठी वाचनाची गोडीच लोकांना नाही. जे मोजकेच वाचतात त्यांना वेळ किंवा वाचायचा उत्साह राहिलेला नाही. त्यातुन मला काय मिळते? पुर्वीसारखे पानेच्या पाने वाया जात नाहीत पण वेळ आणि मेंदू कुठेतरी शिणतोच ना! गेल्या 10-12 वर्षापासुन सातत्याने काही ना काही मी सारखी लिहीत असते. कधी वर्तमानपत्रात ,मासिकात,पाक्षिकात किंवा नैमत्तिक/प्रासंगिक स्वरुपाचे. त्याला कोणी निबंध तर कोणी ललित लेखन असे म्हणतात. 2020 नंतर ख-या अर्थाने माझे सामाजिक माध्यमावर नियमित साप्ताहिक ब्लॉगवर लेखन सुरु झाले. त्यावर येणा-या प्रतिक्रिया, अभिप्राय आणि किती जणांनी वाचलंय याची संख्या बघुन हळूहळू लिहिण्यास प्रोत्साहन मिळत गेले. त्यातुनच लेखांचे पुस्तक काढावे असे सुचविल्यामुळे इ-बुक पहिले, दुसरे आणि आता तिसरेसुद्धा सलग छापुन झाले. एकच पुस्तक तेवढे प्रत्यक्ष हातात वाचण्यासाठीचे प्रसिद्ध/ प्रकाशित केले. हे लेखन आणि पुस्तके मला महत्वाची वाटतात कारण कदाचीत माझ्यानंतर ही स्मरणात राह्तील ! लेख- निर्मीतीचा आनंद हा काही ...