ll चाहसे चाय पिलाओ ll
आमच्या ऑफिसमध्ये एक जण ऑफिसमध्ये प्रत्येकाकडे आला की, ll चाह से चाय पिलाओ ll असे म्हणायचा. या गोष्टीला आता 28 वर्ष झाली तरी त्याचे अजून तेच वाक्य ठरलेले आहे. ऐकायला मजा वाटते आणि मनात असूदे किंवा नसूदे दादही द्यावीच लागते (चहापण द्यावाच लागतो).असो. “पिनेवाले को पिनेका बहाना चाहिये” या उक्ती नुसार काही जण काहीही कारण नसले तरी, चहाची फरमाईश करणारी माणसे ही घरी, दारी, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी आढळतात. चहा पिऊन झोपणारी माणसेसुध्दा बघितलेली आहे. मी स्वत: तेवढी काही चहाभोक्ती नाही. सकाळी एकदाच चहा पिते, ऑफिसमध्ये कॉफी पिते,त्यामूळे मला चहा करण्याचा कंटाळा येतो. लहानपणापासून लग्न होईपर्यंत मी कधीही चहा पिलाच नव्हाता. माझ्या घरासमोरच्या एका मंदिरात गेल्यावर चहा पिण्यासाठी देतात. ऐकून आश्चर्य वाटेल पण यांना चहा भारी आवडतो. ( जोडप्यामध्ये आवडसुध्दा एक नसावी ही परमेश्वरी योजना असावी ) हे कधीही चहा प्यायला तयार असतात,चुकुनही कोफी पिणार नाहीत, वरुन म्हणणार की, मला कोणते...