Posts

Showing posts from September, 2021

विना सहकार नाही उध्दार

Image
             “ विना सहकार नाही उध्दार” हे आपले परवलीचे वाक्य इसवी सन 60च्या दशकातले होते.          ब-याच गोष्टी आपण सहकारी तत्वावर राबविण्याचा प्रयत्न केला, अजूनही करीत आहोत,याला म्हणावे तसे यश मिळत नाही. खरं तर मिश्र अर्थव्यवस्था आपण स्विकारली तेव्हाच अप्रत्यक्षपणे मान्य केलेले होते की, खाजगी आणि सरकारी तत्वे दोन्ही एकमेकास पुरक तर्हेने अंमलात आणली जातील. या दोघांचे काही तोटे लक्षात घेता तिस-या तत्वाची अमंलबजावणी करणे गरजेचे ठरले कारण आपली लोकसंख्या, कमी पैसा आणि बुध्दीमत्ता व कौशल्य यांची अमाप उपलब्धता. सहकार ही एक चळवळ असुन अगदी तळागाळातल्या लोकांपासून सुरू करणे शक्य असलेली योजना आकर्षक वाटते,कारण त्यात अनेकांचे अनेक स्तरांवर भले होणार असते. कोणत्याही चांगल्या योजनेचे भवितव्य ठरविणे, त्याच्या प्रामाणिक हेतूवर आणि अंमलबजावणीवर अवलंबून असते. या आघाडीवर आपण अनेकदा कमी पडतो. स्वार्थ बळावला की, अशा छोट्या पातळीवरच्या योजना हमखास बारगळतात.              जो इस्त्रायल...

जल- एक संजीवनी

Image
           पृथ्वीवरील पाण्याचे एकूण प्रमाण 1.386 अब्ज किमी³ (333 दशलक्ष घनमीटर) आहे , त्यात 97.5% मीठ पाणी आणि 2.5% ताजे पाणी आहे. या गोड्या पाण्यापैकी केवळ 0.3% पृष्ठभागावर द्रव स्वरूपात उपलब्ध आहे. आपल्या भारतीय परंपरेत पाण्याला अन्यनसाधारण महत्व आहे. जीव जगण्यासाठी हवा आणि पाणी लागते नाहीतर पाण्यावाचून तडफडणारे अनेक सजीव आपण बघतो.               “II अकाल मृत्यु हरणं सर्व व्याधि विनाशनम। विष्णो: पादोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते।।“         पाण्याचे रुपांतर तीर्थात आणि तिर्थाचे रुपांतर औषधांमध्ये करणे एवढे सामर्थ्य पाण्यात आहे. वरील मंत्र म्हणून पळीभर पाणी पिले तर अकाली येणारा मृत्यू टळतो, व्याधींचे निवारण होते.   अन्नपचन, शिजवणे, पिकविणे, नासविणे व धुवून स्वच्छ करणे, गाळ खाली बसणे इ. अनेक प्रक्रिया पाण्याद्वारे शक्य होतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किमान 2 ते 3 लिटर पाणी आपण आपल्याही नकळत वेगवेगळ्या स्वरुपात पीत असतो. आदी मानवापासून माणूस शक्यतो पाण्याजवळ रहाणे पसंत करतो. निस...

दहशतवाद - एक समस्या

            सध्याचा ज्वलंत विषय आणि सगळया जगाला ग्रासलेली समस्या म्हणजे “दहशतवाद” असे म्हणता येईल. दहशतवाद म्हणजे नक्की काय? एखाद्याने दुस-यावर कुरघोडी करून दबाव आणणे, स्वत:चे वर्चस्व सिध्द करणे किंवा भितीदायक परिस्थिती निर्माण करून नाईलाजाने किंवा भीतीने नको ते काम करण्यास भाग पाडणे अन्यथा त्यांना शरण जाणे एवढाच एक पर्याय उपलब्ध असतो. असा दहशतवाद जिथे दोन गटांमध्ये मतभेद असतात, तिथे शस्त्र आणि शास्त्र यांच्या मधील संघर्ष, जात, धर्म, वंश आणि सत्ता यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात.   दहशतवाद हा जन्मल्यापासून प्रत्येक प्राण्याच्या वाट्याला येतच असतो. काही जणांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो तर काही जणांना आहे ते टिकवण्यासाठी किंवा नवीन क्षेत्र काबीज करण्यासाठी करावा लागतो. “इथे बळी तो कान पिळी” चा न्याय लागू होतो. हा केवळ शारिरिक, मानसिक आणि आर्थिक आघाडीवर नसतो तर कधी कधी भावना, इर्षा, प्रेम आणि हिंसात्मक   स्वरुपाचादेखील असू शकतो. त्याला तोंड देण्यासाठी मानसिकरीत्या सक्षम होणे आणि आपल्या हक्कांची जाणीव करुन देणे हे महत्वाचे ठरते. आपल...

वाण देणे आणि घेणे

                 नुकतीच हरितालीका पुजा झाली. दरवर्षी आमच्या लोकांकडे हा एक सुवासिनीचा कुमारिकेचा आणि मोठ्या माणसांचा उत्सव असतो. ज्यांच्याकडे गणपती असतो त्यांच्याकडे तर जास्तच वास्तविक वायण म्हणजे वाण जे संक्रातीत दिले जाते. बहुधा सवाष्णीला संक्रांतीतपण वाण दिले जाते. हरतालिकेला मात्र आमच्याकडे नारळाची पुजा करून वर हळद कुंकू लावून निरांजन ठेऊन दिले जाते. सवाष्णीचा मान तर असतोच पण घरातले लहान मोठे हे वाण देण्याचे आणि घेण्याचे वाट पहात असतात. अगदी लहानपणापासून “मला वाण पाहिजे” अशी लहान मूलेपण हट्ट करतात. असे हे वाण म्हटले तर एक साधा गुळगूळीत केलेला छोटीशी शेंडी ठेऊन त्याच्या डोळ्यामध्ये हळद, काजळ, कूंकू लावून नारळ तयार केले जातात.  प्रत्येकीचे “पाच” असे एकत्र कुटूंब असेल तेवढे ते वाढत जातात. सासू सवाष्ण गेली असेल तर मोठ्या सुनेला एकूण 11 वाईणे लावावी लागतात. पहिल्या वर्षी आर्शिवाद म्हणून मोठी माणसे पैसे देतात. लग्नानंतर हा पहिल्या वर्षी मोठा समारंभ असतो,ब-याच जणांना याचे खुप कुतूहल वाटते.         ...

माणुस सवयीचा गुलाम

             असे म्हणतात की “माणुस सवयीचा गुलाम” असतो. लहानपणापासून लागलेल्या सवयी सहसा लवकर सुटत नाहीत मात्र त्या चांगल्या हव्यात, लवचिक हव्यात, काळानुसार बदल करण्याची मानसिकता हवी. काही जणांचे संबंध या सवयीवरून बिघडतात. आपल्या सवयीमुळे इतरांना त्रास होतो का? याचाही विचार झाला पाहिजे. जसे की, काही जणांना भल्या पहाटे उठायची सवय असते. चांगली सवय आहे पण तो किंवा ती एकटीच उठून बसली /बसला आणि इतरांना उठा,उठा करायला लागला तर कसे चालेल? लवकर उठणे ही सवय कधीही चांगली पण इतरांवर बंधनकारक ठरू नये. प्रत्येकाच्या शरीराचे घड्याळ वेगवेगळे असते. त्यात बदल करणे सहजासहजी शक्य होत नाही पण प्रयत्न करावयास हरकत नाही.              फार पुर्वी मी “अतिपरिणामकारक लोकांच्या 7 सवयी” हे पुस्तक मुलींना आणून दिले होते. मी पण स्वत: वाचत होते. आपल्या वागण्यातल्या ब-याचशा चुका त्यामूळे कळत गेल्या पण मुली कदाचित विसरुन गेल्या असतील. खरे म्हणजे अशी पुस्तके जीवनात अत्यंत आमुलाग्र बदल घडवून आणू शकतात. लेखकाने अगदी विस्तृतरीत्या समजून सांगून यशाची परिभ...

II ॐ सुर्याय नम: II

Image
              आपल्याकडे प्रत्येक वाराला महत्व आहे. श्रावण महिन्यात तर जास्तच, अगदी रविवारसुध्दा सोडलेला नाही. या दिवशी सुर्याची पुजा करून नैवेद्य दाखवितात आणि संध्याकाळी त्या पुजेचे सुर्यास्तापुर्वी विसर्जन करतात. तसेच रथसप्तमीला सुर्याची पुजा करून दुध उतू घालतात. असा हा सुर्यदेव आपल्या आयुष्याचा अन्यन्य साधारण असलेला तारा आहे.  काहीजण त्याची पुजा सकाळी अर्ध्य देऊनसुध्दा करतात. महाभारतात कर्णाचे महत्व त्यामूळे अधोरेखित झालेले आहे. सुर्यपुत्र कर्णाने रोज सकाळी अर्ध्य देणे आणि दान करणे हा नियम चुकवलेला नव्हता. नुकतेच मी गिरगाव,पांजरापोळ येथील सुर्यमंदीरात जाऊन आले होते. पवित्र, सुंदर आणि पुराणकालीन रचना, सुर्याचे 7 घोडे आणि मध्ये सुर्याची मुर्ती, खुप देखणी आणि कमालीची शांतता.  सुर्य देवळात काही नियम लिहीलेले आहेत. पुजेच्या वेळी काळे कपडे घालायचे नाहीत. सकाळी 12 वाजेपर्यंत देऊळ उघडे असते. नंतर 4.30 ला देऊळ पुन्हा उघडते. सुर्यास्तानंतर देऊळ बंद होते. भजन, किर्तन, महाप्रसाद असे बरेच कार्यक्रम असतात. इथे एका बोर्डावर मंत्र लिहीलेला होता.  ...

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)

          कंपनीचे “मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)” हे संपूर्णपणे व्यवस्थापन, प्रशासन, लेखापरिक्षण, संचालक मंडळ आणि संस्थेचे दैनंदिन कामकाजाला जबाबदार असतात. हे महत्वाचे जबाबदारीचे पद खाजगी क्षेत्रात मानाचे समजले जाते. जेवढे जास्त अधिकार, तेवढी जास्त जबाबदारी हे ठरलेले आहे, त्यामूळे त्यांना कंपनीचे सर्वेसर्वा समजले जाते.           मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदासारखे महत्व गृहपुरूष किंवा कुटूंबप्रमूख या व्यक्तीला असते. मग तो “नवरा” किंवा “वडील” असो,कधी ते “आजोबा” असतात.   जशी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मूळे कंपनी भरभराटीला येते तसेच घराचा मुख्य नेता योग्य असला की, घराची व त्यातील माणसांची आपोआप भरभराट होते. ब-याच वेळा स्त्रियांची गृहिणी, घरमालकीण, घर बनविणारी आणि सगळ्यांना बांधून ठेवणारी, अशी चढत्या भाजणीने प्रशंसा होते. या सगळ्यामागे तीचा वडील किंवा नवरा भक्कमपणे पाठीशी उभे राहिले तर शक्य होत असते. जरी काही वेळा पुरूष आक्रस्ताळी, आक्रमक किंवा हेकेखोर आढळत असला तरी त्याची त्यामागची भुमिका ही समजून ...