Posts

Showing posts from November, 2024

अज्ञेयवादी (नास्तिक)

Image
            हा शद्ब मी पहिल्यांदा ऐकला तेव्हा मला मोठी गंमत वाटली. त्याचा अर्थ कळल्यावर साधारणपणे लक्षात आले की, नास्तिक कि आस्तिक हा जुनाच वाद नव्याने होऊ घातला. हे कुणी सहसा कबूल करत नाही की, मी नास्तिक आहे, मात्र त्यांचा विरोध / आक्षेप केवळ देवधर्म, कुळाचार किंवा पैसे खर्च करण्यावर असतो. सरळ-सरळ   ते दुस-यांना आवाहन करीत असतात की, दाखवा मला कुठे आहे तुमचा देव? किंवा अमुक एक वृत केले म्हणून हे काम झाले असे कसे असू शकेल? किंवा देवळात / भटजीला पैसे दिले की तुम्हाला काय देवाकडून (ओटीपी) /पावती येते का? कलियुगात हे असेच प्रश्न येणार पण दुसरीकडे देवळासमोरच्या रांगा काय दर्शवितात? देवळात/ साईबाबांना/ लालबागच्या राजाला सोने-नाणे अर्पाण करणारे भाविक समजायचे की व्यावाहरीक दृष्टिकोन समजायचा?              हिंदू समाजातच मुर्तीपुजा किंवा मुर्त स्वरुपात देवाला मानावे असे सांगण्यात आलेले आहे त्याचे कारणही हेच असावे. त्याशिवाय सर्वसाधारण माणूस निसर्गावर, दैवावर किंवा आपलया कर्मावर विश्वास ठेवणार नाही किंवा पाप लागेल ही भीती असल्याश...