Posts

Showing posts from May, 2023

स्तोत्र आणि मंत्र महिमा

Image
               अध्यात्म्यात स्तोत्राचा महिमा पुराणात / ग्रंथात/ पोथी / पुस्तकात सांगण्यात आलेला आहे. मंत्र आणि स्तोत्र यात फरक आहे. स्तोत्र गातात तर मंत्र एक पुर्व निश्चित लयीत एका विशिष्ट कृतीपुर्वक जपतात. मध्यंतरी सुधा मुर्तीनेसुद्धा स्तोत्राचा महिमाबाबत एक ओडिओ क्लिप यावर केलेली आहे. पंचाक्षरी, अष्टाक्षरी असे अनेक प्रकारचे मंत्राबाबत त्यांचे विचार आवडले म्हणून त्याबाबत लिहावेसे वाटले. लहानपणापासून आपण देवास नमन करताना, पुजेत विविध स्तोत्र ऐकत असतो. मोठी माणसे आपल्याला काही ना काही याबद्दल सांगत असतात पण त्यावेळी आपण ते हसण्यावरी नेत असतो. नंतर जसे फळ हळूहळू परिपक्व होत जाते तसतसे स्तोत्राबाबतचा आपला दृष्टिकोन आणि त्याचे महत्व जाणवायला लागते. गणपती स्तोत्र, शिवकवच स्तोत्र, महाकाली स्तोत्र, नवग्रह स्तोत्र,मारुती स्तोत्र आणि व्यंकटेश स्तोत्र आपण नेहमीच म्हटलेली असतात. त्याचा अर्थ, व्याप्ती आणि उपयोग याकडे मात्र आपण दुर्लक्ष करित असतो. मुळात “जुने ते सोने” म्हणण्याऐवजी कालबाह्य   किंवा वेळ कुठे आहे या सबबीखाली चांगले संस्का...

अतुल्य भारत (incredible india)

Image
               “अतिथी देवो भव” ही आपली संस्कृती आणि भारताचे तसेच सगळ्याच देशांचे पर्यटन विषयक विशिष्ट धोरण असते. साधारण 10-12 वर्षांपुर्वी “अतिथी देवो भव” अशी जोरदार जाहिरात करण्यांत आलेली होती. सगळीकडे जाहिराती, फलके आणि व्हिडिओज फिरत होते. नंतर या योजनेचा किती आढावा घेतला गेला / पुढे काय झाले हे माहित नाही. परदेशस्थ मंडळींना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखल्या जातात. पर्यटन विकासासाठी विविध सवलती आणि सुविधाही मिळत असतात. यातून  देशास अमूल्य परकीय चलन मिळते. तथापि या क्षेत्रातील काही अप्रिय घटनांमूळे / काही ठिकाणी अद्यापि होणा-या अनास्थांमूळे, होणा-या असुविधेमूळे विशेषत: प्रवासातील असुविधा आपल्या देशाची बदनामी तर होत नाही ना हेही तपासले गेले पाहिजे असे मला वाटते.         जे आंतरराष्ट्रीय पर्यटन तेच देशांतर्गत होणा-या पर्यटनांबाबत व्हावयास हवे असे. भारताचा प्राचीन इतिहास महाराष्ट्रातील गडकिल्ले किंवा अतिश्रीमंत सरंजाम स्थळेच (राजस्थान-हैदराबाद) अधिक प्राचीन मशिदी, मंदिरे, ब्रिटिश-पोर्तुगीज-डचांनी उभारलेल्या वास्त...

आई कधी सुखी होते का?

Image
                “ठाण्यात महिलेची हत्या” शरीर र्सौष्ठव “श्री” प्राप्त झालेल्या व्यायामपटूने  “घरगुती वादातून आई-वडिलांवर केलेल्या सुरी हल्ल्यात आई ठार, वडील जखमी” अशी बातमी नेमकी माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत असावी आणि तेही नेमक्या मातृदिनाच्या पुर्वसंध्येला! हा कोणता योगायोग म्हणावा? माझी मैत्रिण म्हणून नाहीतर आई, बाई आणि माणूस म्हणून एवढाही (वय-66) तिला जगण्याचा अधिकार असू नये? प्रत्यक्ष मुलगाच काळ ठरावा हे कोणाला योग्य वाटेल? अनेक प्रश्न त्यानिमित्त मनात उभे राहिले.                30 वर्षात असे कोणते बदल समाजात झाले की ज्यामुळे हल्ली अशा बातम्या वारंवार येत असतात. संस्कार, जाणीव, पैसा, नातीगोतीपेक्षा राग मोठा असतो का?  संयम राखणे एवढे कमीपणाचे का वाटते? उत्तेजित होउन तरी प्रश्न सुटतात की नवीन गहन प्रश्न  तयार होतात?  बलोपासना ही शरीर व मन कमविण्यासाठी असते की सुड घेण्यासाठी असते? शरीर कमविताना अनुचित मार्गाने (उत्तेजके/sterioids) जाऊ...

एक होती आजी

Image
              नुकतीच श्री ना. ना पेंडसे यांचे “एक होती आजी” ही कादंबरी वाचनात आली.  19 व्या शतकातील टिपीकल  आजीचे यात रेखाटन करण्यात आलेले आहे. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी ( गरिबीमुळे) विधुर असलेल्या 35 वर्षे इसमाशी लग्न करून आलेली आजी सगळया घराला म्हणजे घरातील सर्वांना आपलेसे करुन घेते.  मोठी मंडळी, लहान मुले, दीर, जावा यांच्याशी सलोख्याचे संबंध तर जोडतेच शिवाय वेळप्रसंगी त्यांच्या पाठिशी उभी राहते.  त्यांच्या आयुष्यातील कितीतरी बिकट प्रसंगात तिचा करारीपणा, धाडसीपणा आणि काळाच्या पुढे बघण्याची वृत्ती दिसून येते. एकूणच पुस्तक वाचनीय आहे शिवाय त्या काळातल्या प्रसंगानुरुप स्त्रीशक्तीचे दर्शन घडते. आजीने आपले वैवाहिक आयुष्य ज्या तर्हने भोगले ते योग्य होते काय? आणि सरतेशेवटी आजीने स्वतःहून कबुलीजबाब दिलेले `ते’ अमानुष कृत्य सद्भावनेपोटी केलेले का होईना, कितपत क्षम्य आहे? याचा शोधाबोध वाचकाने घ्यावा. त्या आजीचे कौतुक करावे तेवढे थोडेच वाटते. हळुहळू आजीची भुमिका कमी होत जाणा-या आताच्या काळात म्हणूनच अनुकरणीय ठरते.  ...

सध्या तु/तो/ती काय करते?

Image
                   ब-याच वर्षांनी भेटल्यानंतर हमखास विचारला जाणारा हा एक   प्रश्न “काय करतो किंवा काय करते”   कधी निवृत्तीनंतर किंवा कधी कधी   विनाकारण उगीच सहज म्हणून विचारला जातो तेव्हा मला खूप मज्जा वाटते. एकदा मला खूप कंटाळा आला तेव्हा मी मैत्रिणीला फोन केला होता तेव्हा तिने मला असे सांगितले, ”कामात एवढे गुंतवून ठेव की, विचार करायलापण वेळ मिळणार नाही.” असेही आपण नोकरी, व्यवसाय,   धंदा किंवा ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे काहीना काहीतरी करीतच असतो. काय करतो?/करते? या प्रश्नाचे उत्तर हे व्यक्तिपरत्वे, परिस्थीतीनुरुप कायम बदलत असते. गृहिणिला विचारले तर घर सांभाळतेय, मुले खेळतात, पुरुष कमावतात आणि वयस्कर आराम करतात असे सर्वसाधारण समज असतात. एखाद्याचे मात्र या प्रश्नाने आयुष्य बदलायची ताकद असते. हा प्रश्न कधी तरी आपण स्वत:लासुद्धा विचारु शकतो. आयुष्याचे पुनर्विलोकन करताना हा प्रश्नावर पुढील निर्णय घेणे कधी कधी सोपे जाते. बघा विचार करुन!          ...