Posts

Showing posts from April, 2023

जेव्हा रायगडाला जाग येते...

Image
          “जय जय महाराष्टृ माझा ...“ या गीताला राज्यगीत म्हणून मान्यता मिळाल्यावर खुप अभिमान वाटला. आता सगळ्या शासकीय कार्यक्रमातून हे गीत वाजविले जाते. लहानपणी हे गाणे ऐकल्यावर जसे स्फुरण चढत असे तसे मात्र आता होताना दिसत नाही. एक औपचारिकता म्हणून केवळ हे गाणे वाजविणे आणि गाणे वाजविल्यामूळे महाराष्टाचा खराच अभिमान वाटतो का? ही एक विचार करण्याची गोष्ट आहे असे मला वाटते. मला कळायला लागल्यानंतर पहिले ऐतिहासिक नाटक पाहिले होते, ते होते “जेव्हा रायगडाला जाग येते.” खुले रंगमंच, प्रभाकर पणशीकर यांचा अभिनय, आवेश आणि एकूणच ऐतिहासिक संदर्भामुळे या नाटकाने मनावर कायमचा ठसा उमटविला होता. कित्येक दिवस मनामध्ये नाटकाचे संवाद रेंगाळत होते. नुकताच रायगडाचा व्हिडिओही बघण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज हे अनेकांचे आराध्य दैवत आहे. आता याची आठवण येण्याचे कारण आम्ही नुकतीच रायगड किल्याला दिलेली भेट.  मुंबई ते संदोशी एसटीने मुंबईवरून रात्रीचा प्रवास केला. भल्या सकाळी रायगड्याच्या पायथ्याशी पोचलो. तेथून बसने रायगड रोप वे ग़ाठला. महाड वरून सुध्दा रायग़डवर जाण्याची व्यवस्था होऊ श...

वसंतोत्सव

Image
              “ आनंदी आनंद आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे”... हे गाणे या वसंत ऋतुची महती सांग़तो. नुकत्याच एका वसंतोत्सवास जाणे झाले.  दरवर्षी गिरगांव येथील महिला मंडळात नित्यनेमाने “वसंतोत्सव” साजरा केला जातो. 100-125 वर्षांपुर्वी महिलांना एकत्र आणून या मंडळाची स्थापना अवंतिका गोखलेबाईंनी केली होती. समाजोपयोगी वस्तू बनविणे, महिलांचे आर्थिक स्वावलंबन आणि मुलांचा सर्वांगिण विकास या हेतुने एकत्र आलेल्या बायकांची आज तिसरी पिढी कार्यरत असुन तेवढीच आपल्या हेतुशी प्रामाणिक व विचारांचा वारसा पुढे नेत आहे हे बघुन खूप आनंद होतो. महिलांबाबतचे सामाजिक भान, आदर आणि दुरदृष्टी याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे . एक प्रकारे कै. गोखलेबाईंनीही त्या महिलांच्या जीवनात “वसंत” अप्रत्यक्षरित्या फुलवलाच होता.              मार्च-एप्रिलच्या महिन्यात येणारा “वसंतोत्सव” मी काही वर्षापुर्वी प्रत्यक्ष बघितला होता. आज जवळपास 10-15 वर्षानी पुन्हा योग जुळून आला. रांगोळी, सरस्वतीची पूजा, गीत-गायन, हळदी-कुंकू, सोनचाफ्याची फुले, शेवटी पन्हे आणि आंब...

नमन करु नटवरा...

Image
            चित्रपटापेक्षा नाटक पाहणारे प्रेक्षक कमी पण दर्दी रसिक मुद्दाम वेळ काढुन नाटकाला जाणारे असतात. मला पण चित्रपटापेक्षा नाटक अगदी लहानपणापासुन बघायला आवडते. लहानपणी संगीत नाटकातली गाणी अजुनही माझी आवडती आहेत. “सर्वात्मका सर्वेश्वरा..,  मर्मबंधातली ठेव ही..., काटा रूते कुणाला..., खरा तो प्रेमा..., कशी केलीस माझी दैंना.. ,  उगवला चंद्र पुनवेचा  आणि वद जावु कुणाला शरणागत” अशी अनेक गाणी आठवतात. रेडिओवर ऐकलेली नभोनाट्य रुपांतरीत “आम्रपाली” नाटक व इतर अनेक नाटके विशेष लक्षात आहेत. नारायण श्रीपाद  राजहंस ,  ऊर्फ  बालगंधर्व  या  नावाने    लोकप्रिय   असलेले     विसाव्या   शतकाच्या            सुरुवातीच्या  काळातील  ऊर्फ  बालगंधर्व  या  नावाने  लोकप्रिय  असलेले   विसाव्या  शतकाच्या    सुरुवातीच्या  काळातील  सुरुवातीच्या   काळातील  मराठी रंगभूमीवरील अभिनेता, ...

रामायणातील स्त्रिया

Image
         “ Raam is soul, Sita is heart, Rawan is in mind that steals your heart from your soul. Laxman is consciousness always with you & activein on your behalf. Hanuman is intitution & courage that help retrieve your heart to re-animate your soul.”        असा हा “राम” आपले आयुष्य व्यापून टाकतो. नुकतीच रामनवमी होऊन गेली, त्यानिमित्त आलेला हा संदेश नक्कीच अनुकरणीय आणि रामाचे आपल्या आयुष्यातील महत्व अधोरेखीत करतो. श्रीविष्णुचा सातवा अवतार आणि मर्यादा-पुरुषोत्तम म्हणून सगळ्या जगासमोर कोणत्याही काळात “आदर्श” मानला जातो. एकपत्नी, एकबाणी आणि एकवचनी असा हा आदर्श काही जणांच्या मनात नाराजगी निर्माण करतो ते केवळ “सीतेला घराबाहेर काढून अविश्वास दाखविला म्हणून.”  पितृप्रेम, मातृप्रेम, बंधूप्रेम, प्रजाहितदक्ष असा  असलेला श्रीराम त्यावेळी तो केवळ पती म्हणून नाही तर राजा म्हणून आदर्शच ठरतो. त्याग आणि इतर स्त्रियांना दिलेले महत्व लक्षात घेता हा एक दोष सोडूनच द्यावयास हवा.       माझा आजचा विषय आहे “रामायणातील स्त्रिया,” त...