Posts

Showing posts from October, 2022

एक होती राणी...

Image
        एक होता राजा, एक होती राणी, एक आवडती, एक नावडती..ऽ अशी सुरुवात होउन अनेक गोष्टी लहानपणी ऐकल्या होत्या.  तशी कल्पना मनात आणुन आपण राजा व्हावे आणि राणीला आणावे किंवा आपला स्वप्नातला राजकुमार प्रत्यक्षात यावा आणि त्याने आपल्याला घेऊन जावे अशी बालसुलभ मनसुबेही रचले जात असत. काहीजण यशस्वी होतही असतील. काहीजणांना वास्तवाची जाणीव होऊन मिळाले त्यातच समाधान मानत असतील. काहीजण अजुनही आशा धरुन असतील. मला मात्र या गोष्टीतून एक नेहमी प्रश्न पडत असे, “नावडतीचे मीठ अळणी आणि आवडतीचे शेंबुड गोड” कसे लागत असेल?         मोनालीसाने तर आपल्या सगळ्यांना वेड लावलेले आहेच. खरंच संसार राजा-राणीचाच असतो कि, सोबत आणखीन कोणी असावे लागते? नोकरदार स्त्री राणी कि गृहिणी राणी असते?   राजकुमारपण दमून-भागून येऊन घरात मदत करत असेल की मी राजा म्हणून कायम राणीला दासीच समजत असेल?   आई-वडिलांकडे राजकुमार आणि राजकन्या असलेली मुले लग्नानंतर सत्व सांभाळू शकत असतील का?   मनावर राज्य करणे चांगले की, सत्ता, ताकद आणि मस्तीने राज्य करणे चांगले?   सौंदर्य, गुण, ...