Posts

Showing posts from August, 2022

घर पाहावे बांधुन

Image
           मध्यंतरी एक कविता पक्षाची “कैफियत” म्हणून वाचनात आली होती, त्याचा मतिथार्थ असा होता, जंगल तोडल्यामुळे पक्षी बेघर झाले होते. पर्यावरण वाचवा हे माहित होते परंतु तेव्हा हा मुद्दा लक्षातच आला नव्हता.   सगळे पक्षी आडोसा शोधतात कुठे ना कुठे, ठराविक पक्षीच घर बांधतात त्यामुळे नटसम्राट मधल्या बेलवलाकरांसारखीच कोणी घर देता का घर? ही व्यथा मन हेलावुन गेली. जी गोष्ट पक्षांची तीच माणसांचीसुद्धा आहे हे आपण कधी कधी तरी याचा अनुभव घेतच असतो.             लहानपणी घराचे चित्र घराचे काढा म्हटले की, एक झोपडी, समोर रस्ता, त्याच्या मागे सुर्योदय, आणि बाजूला झाड असे ठराविक साचा असे. स्वत: जेव्हा घर खरेदी करायाला गेलो तेव्हा अनेक अनुभव, त्यातील अडचणी कळल्या. काहीजणांचा झोपडीपासून महालापर्यंतचा प्रवास अनाकलनीय ठरतो, तर काही जणांचे घराचे स्वप्न शेवटपर्यंत पुर्ण होतच नाही.   काहीजण अगदी म्हातारपणात यशस्वी होतात ज्यावेळी त्याचा आनंद उपभोगेपर्यंत वर परत जायची वेळ येते. काही जणांना मात्र 2-3 घरे कशी काय मिळतात आणि ती सुस्...

आक्रमण अनेकांचे

Image
           नुकतीच गिरिश जखोटीया लिखीत आणि श्री.जैंन अनुवादीत “आक्रमण” कादंबरी वाचनात आली. अर्थव्यवस्था आणि त्या अनुषंगाने चाललेले आक्रमण आणि त्यावर होऊ शकणारी मात अशी साधारण मध्यवर्ती कल्पना घेऊन लेखकाने आधुनिक महाभारत घडवून आणलेले आहे.   पौराणिक संदर्भांचा ऊपयोग करुन समांतर हल्ला करुन आधुनिक प्रकारे कसे हे आक्रमणावर मात करता येईल याचे सोदाहरणरित्या छान पटवून देण्यात आलेले आहे.   लेखकाचा आशावाद नक्कीच पूर्ण व्हावा ही इच्छा आणि तसेच घडावे ही प्रार्थना !             अनेकांचे आक्रमण अनेकांवर अनेक प्रकारे   होत असते. इतिहासात अनेक दाखले मिळतील.   भारत हा एक समुद्ध देश पाहूनच तर अनेक आक्रमणे झाली, होत आहेत आणि होत राहणार!   सत्ता, लोभ, असूया आणि आकर्षण अशी अनेक कारणे यामागे असतात.   प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या स्वरुपाच्या आक्रमणाला तोंड द्यावेच लागते. वैचारीक, आर्थिक,   जैविक आणि सामाजिक अशा अनेक स्तरावर हे आक्रमण चालूच असते. ज्याचा मुकाबला करणे हेच जीवनाचे ध्येय बनून जाते कित्येकवेळा. हेच ...

ये कहा आ गये आ गये हम..

Image
           “सिलसिला” हा चित्रपट आणि हे गाणे माझे अत्यंत आवडते आणि अंतर्मुख करणारे गाणे आहे. संदर्भ वेगळा असला तरी आज आठवण्याचे कारण थोडे वेगळे आहे.   सध्या सगळीकडे “तिरंगा-ज्वर” जोरात फोफावलाय, हे चांगले आहे. यामागे जाणीवपुर्वक “देशभक्त” राग आळवला जात आहे की, फक्त देखावाच आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 75 वर्षे हा कालावधी तसा मोठा आहे. कित्येक आहुत्या, बलिदाने, भळभळणा-या जखमा, काही युद्धे आणि काही अनिर्णित प्रश्न ऊराशी बाळगून आहोत. एका डोळयात हासू तर दुस-या डोळ्यात आसू असा हा संमीश्र योग आहे.   स्वातंत्र्य सगळ्यांनाच प्रिय असते परंतु ते टिकवणे हे मिळवण्यापेक्षा कठिण असते.             75 वर्षापुर्वींचा भारत आणि आताचा भारत यांची तुलना केल्यास नक्कीच आता सर्व काही सोपे झालेले आहे. काही गोष्टी त्याचबरोबर लुप्त किंवा कालबाह्य होण्याची भितीही तेवढीच वाढलेली आहे.   देशासाठी आन, मान, शान देणारे लोक कमी झालेत, ऊलट देशाला विकून खातील की काय अशी शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल असे वाटते. परदेशात जा...

जावई /सुन शोधणे आहे

Image
          पुर्वी वर्तमानपत्रात “गोरी वधु हवी/ वर हवा” अशी जाहिरात येत असे. मला नेहमीच प्रश्न पडत असे, खरंच त्यांना मिळत असेल का? एक विनोद कायम तेव्हा सांगितला जायचा,”श्रीमान किंवा श्रीमती” शोधण्याच्या नादात वय मात्रा हरवून बसलेत म्हणून!   आता तीच जागा वधू-वर सुचक मंडळांनी घेतलेली आहे.   त्यांच्या   टि.व्हि.वरच्या जाहिराती बघून तर मला अजुन एक आश्चर्य वाटते की ह्यांचे उत्पन्न एवढे खरेच असेल का?   या कथा आणि व्यथा आता नवीन राहिल्या नाहीत.   आमच्या पिढीने थोडे कमी अनुभवल्या असतील, आता मात्र हे प्रमाण खुप वाढत चालले आहे त्यामुळे थोडी चिंता आईवडिलांची वाढलेली आहे.           काही प्रमाणात काही जण हा प्रश्न आपापल्या पद्धतीने सोडविण्याचा प्रयत्न करतात. जे आई-वडिलांच्या मर्जीवर / आवडी-निवडीवर, दर्जा,   शिक्षण या गोष्टींसाठी अडून राहतात त्यांना मात्र बराच संघर्ष करावा लागतो.   काहीजण नाईलाजाने तयार होतात, तर काहीजणांना मुद्दाम फसवून, खोटे-नाटे  सांगून तयार केले जाते.   पुढे होईल सगळे ठिक हा उदार दृष...

वृक्षाबंधन

Image
                 नुकताच “रक्षाबंधन” सण साजरा झाला.   त्यानिमित्त्याने अनेक नवीन संकल्प, परंपरा सांभाळल्या गेल्या. कधी कधी लोकांची मजा वाटते. राखी-पोर्णिमेनिमित्त अनेक संदेश, विचारांची देवाण-घेवाण, फोटो, व्हिडिओ, गाणी शेअर करुन झाली. वैयक्तिक जीवनात खरेच एवढे   / असे खरेच वागत असतील का? आपुलकीने चौकशी, विचारपूस करीत असतील का? करत नसतील तर निदान त्यानिमित्ताने तरी करत असतील / असावेत अशी आशा करुया.             एका संदेशाने (Msg) मात्र माझे लक्ष वेधून घेतले, तो होता “वृक्षाबंधन.” कधी कधी कौतुक वाटते, नवीन नवीन विचारांचे.   त्यात त्यांनी असे म्हटले होते की, ज्यांना भाऊ नाही, त्यांनी किंवा आहे पण येऊ शकत नाही त्यांनी वृक्षालाच राखी बांधून सण साजरा करावा. किती छान ना कल्पना!   तसेही मी “चिपको” आंदोलनाबाबत लहानपणी ऐकले होतेच.   ज्यावेळी लोक झाडे तोडायला येत तेव्हा गावकरी असे करीत असत जेणेकरुन ते झाड तोडत नसत. तशीच ही वृक्षांबद्दलची संकल्पना, सुधारित स्वरुपात असावी, नक्कीच विचार करण...

जगण्यातला आनंद

Image
          जगणे आणि आनंदाने जगणे यात बराच फरक असतो. अशी अनेक माणसे आपल्या अवती-भोवती असतात. ज्यांना सर्व काही मिळते तरी त्यांना कशाची तरी कमी   जाणवत असते.   याऊलट काही माणसे अशी असतात त्यांच्याकडे काहीच नसते तरी ते आनंदी असतात हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. यामागे असलेला जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन कारणीभूत असावा.   आजारी, अपंग, अक्षम लोकांबाबतीत एकवेळ समजू शकतो मात्र धडधाकट, सर्व काही असुनसुद्धा ते कमालीचे उदास का असतात हा एक संशोधनाचा विषय ठरु शकेल. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद   मानणारी माणसे विरळाच असतात. शेवटी आनंद हा मानण्यावर असतो. एकाचा आनंद दुस-यालापण आनंद देऊ शकतोच असे नाही, कधी कधी उलटही होऊ शकते.   मुळात जगणे म्हणजे काय? हेच मुळात समजायला वेळ लागतो.”चलतीका नाम गाडी” असाही काहीजणांचा दृष्टीकोन असतो.            दुसरा कोणी आपल्याला आनंद, सुख देऊ शकेल या अपेक्षेने काहीजण स्वत: काही प्रयत्न न करता कायमच दु:खी असतात. अमुक एक गोष्ट मिळाली तर मी सुखी होईन असे काहीजण मानतात,तर काहीजण त्या गोष्टीन...

वेळ नाही हे सत्य की सबब

Image
                 बरेचजण “वेळ नाही “ या सबबीवर काही चांगली कामे”उद्यावर” टाकतात. “उद्या” कधी येत नाही आणि एक दिवस खुप उशीर झालेला असतो. ( अगदी पेपर वाचणे, whatsapp बघणेसुद्धा जमत नाही) रोज आपण आपला एक दिनक्रम कसा सुरु करतो यावर आपला अख्खा दिवस ठरतो.   विशेषत: स्त्रियांना स्वत:साठी अजिबात वेळ नसतो. दुस-यांसाठी कायम तत्पर असणा-या गृहिणी त्यांना स्वत:साठी कधीच वेळ नसतो. कधी लहान मुले, आजारी माणसे आणि नौकरी किवा इतर अनेक कारणे समजू शकतो परंतू ही तिन्ही कारणे नसतांनासुद्धा वेळ नसतो.   मध्यंतरी एक पोस्ट वाचनात आली होती. “वेळ नसतो असे नव्हे, प्राथमिकता भिन्न असतात” ( They are not busy, but they had some other priorities). पुन्हा एथे अर्थशास्त्र कामी येते, “प्राथमिकता.” “भाकरी कि फूल” मध्ये भाकरीलाच प्राथमिकता असणार पण पैसे उरलेच तर नक्की फूल घ्यावे असे मला वाटते.   भाकरी पोटाची भुक भागविते तर फूल मनाची भूक भागविते.              प्रत्येकजण आपला वेळ दुस-यांसाठीच व्यतीत करीत असतो.   व...

मुर्ख डब्बा (Idiot-box)

Image
               सन   1985 मध्ये नवीन टि.व्ही. घरात आला तेव्हा खुप आनंद झाला होता.   BPL कंपनीचा रंगीत टिव्ही   खुप प्रसिध्द होता म्हणून.   अनेक कार्यक्रम गजरा,   प्रतिभा आणि प्रतिमा, चित्रहार. रंगोळी, वागले कि दुनिया, हमलोग अशा अनेक मालिका आणि शनिवार-रविवार मराठी, हिंदी चित्रपट अशी भव्य मेजवानी वाटायची. याशिवाय प्रादेशिक चित्रपट, कधी सणानिमित्त गप्पांची मैफल असा अतिरिक्त बोनसपण मिळायचा. एकूण काय सुखाच्या मर्यादित व्याख्येत भर घालणारी होती.               सन 2000 नंतर मात्र या सुखाला दृष्ट लागली.   आता अनेक 1760 वाहिन्या, मालिकांचा दर्जा, शुद्ध भाषेची अनास्था,कार्यक्रमांची वानवा असे अनेक कारणांनी लोक चक्क “मुर्ख डब्बा”(idiot box)   म्हणून हिणवू लागले.   प्रचंड जाहिराती, सरकारी अनास्था, केबल-चालकांची मनमानीमुळे एका चांगल्या सरकारी दृकश्राव्य माध्यमाची वाट आपणच लावली याचे कधी कधी वाईट वाटते. घरबसल्या गृहिणींचे, वृद्धांचे किंवा आपत्ककालीन अवस्थेत (कोविड) ...