Posts

Showing posts from October, 2024

उत्तरायण

Image
         सप्टेंबर, 2024 महिना तसाही माझ्यासाठी महत्वाचा आहेच.  एकतर या महिन्यात माझा (आता जावयाचा सुद्धा) वाढदिवस (गणपतीपण) येतो आणि यावर्षी तर सेवापुर्तीचा/समाप्तीचा आनंद देणारा होता. वयाच्या 20 व्या वर्षी  (दि. 1-1-87) सुरु झालेला नोकरीचा हा यज्ञ  दि.30-9-24 रोजी शासनाने थांबविला/थांबला.  6.1/2 वर्षे खाजगी आणि  31 .1/4 वर्षे सरकारी अशी एकूण 37 2/3 वर्षांची सांगता दि. 30-9-24 रोजी झाली.  या यज्ञात कशा कशाच्या आहूत्या पडल्या आणि त्यातून कोणता लाभ झाला हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय ठरू शकेल.          हा प्रवास (90% आयुष्य व्यापणारा) कधी लक्षवेधी ठरला तर कधी आव्हानात्मक होता.   अगणित व्यक्ती, स्वभाव, वृत्तींचे वेगवेगळे अनुभव माझे आयुष्य समृद्ध करुन गेल्या. त्याचे प्रतिबींब माझ्या अनेक लेखातून तुम्हाला वाचायला मिळाले असेलच.                            ...

निकाल आणि परिणाम

Image
               मे, जुन महिन्यात सर्वसाधारणपणे सर्व शैक्षणिक निकाल जाहिर होतात. स्पर्धा-परिक्षेबाबतही बहुधा हाच कालावधी असतो. नाहीतरी वर्षभर कोणत्या ना कोणत्या परिक्षा, निवडणूका चालूच असतात. कुणी यशस्वी होतो आणि कुणी नाही. परत प्रयत्न करणारे, क्षेत्र बदलणारे आणि आता काहीच मार्ग दिसत नाही असे समजून जीवाचे बरे-वाईट करुन घेणारेही असतात. ही गोष्ट केवळ पालक-पाल्य आणि शैक्षणिक क्षेत्रापुरता मर्यादित न राहता याचे अनेक परिणाम आजु-बाजूला आपण बघत असतो. एवढ्या टोकाचा विचार करणे हे कितपत योग्य आहे किंवा त्यामागची अनेक कारणे असू शकतात. याव्यतिरिक्त राजकीय क्षेत्राचाही यावेळी निकाल लागले होते मग त्यांनी कोणी असा अघोरी विचार केलेला दिसतो का हो? तुम्ही म्हणाल, ते मोठे / प्रगल्भ असतात त्यांना या निकालामुळे काहीच फरक पडत नाही. जर एक करियर म्हणून राजकारणाचा विचार केल्यास आव्हाने अनेक असतात. राजकीय नेते या सगळ्याला पुरून उरतात. मग सामान्य मुलेच/ माणसेच का हरतात/ शरणागती पत्करतात याचाही विचार झाला पाहीजे असे मला वाटते.     ...