परदा है .. परदा न उठाओ. .. (हिजाब)
“परदा है .. परदा न उठाओ. .. हे सन 1977 मधील अमर अकबर ॲन्थोनी हिंदी चित्रपटातील रफी साहेबांचे गाजलेले गाणे होते. ही ऋषिकपूरची कव्वाली आता आठवण्याचे कारण, जो “हिजाब” वरून कर्नाटक आणि इतर ठिकाणी चाललेला गोंधळ. लोक उलट सुलट समाज माध्यमवावर, दूरदर्शनवर चर्चा करून, चूकीचा अर्थ काढून समाजमन गढूळ करतात. धर्मासंबंधातील बातमी व्हायरल व्हायला आणि त्याचे पडसाद उमटायला हल्ली वेळ लागत नाही. (निवडणूकपुर्व काळात मुद्दाम केले जाते असे वाटते.) यामुळे निरपराध लोकांना त्रास आणि सरकारी खाजगी मालमत्तेची हानी होते. समाजात तेढ निर्माण होऊन मन कलूषित होतात. खरंच, ही गोष्ट एवढी वाद घालण्यायोग्य आहे का? भारताने जरी धर्म-निरपेक्षता स्विकारलेली असली तरी शैक्षणिक ठिकाणी शाळेचा “गणवेश” या एकाच नियमाला सगळेजण बांधिल असतात. याला विरोध करणे किंवा समर्थन करणे अपेक्षितच नाही. आपल्या जुन्या पध्दती कालबाह्य ठरवून उच्चाटन केले आहेत. जसे की, नमस्कार करणे, पोशाख, रीतीभाती, पाश्चात्यांचे अंधानुकरण, सुधा...