Posts

Showing posts from January, 2026

वहिनीची आई

Image
              दि.4.1.26 रोजी वहिनीची आई (श्रीम. मंगला   आकलेकर) वय वर्षे 93, यांचे निधन झाल्याची बातमी ऐकली आणि मन सुन्न झाले. त्यांच्या अनेक आठवणींनी मन भरुन आले. साधारण 40-43 वर्षांपुर्वी “ वहिनीची आई”म्हणुन माझा त्यांच्याशी ओळख झाली ती आजतागायत तशीच मनात घर करुन राहिलेली आहे. त्यानंतर त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध गेल्या 20-22 वर्षांत आला. काही काही व्यक्तींचे अनन्य साधारण महत्व कधी कमी होऊच शकत नाही. उलट आदर, अभिमान, चिकाटी,जिद्द आणि शिस्त यामुळे ती व्यक्ती अधिकच अनुकरणीय ठरते. प्रेमळ, सगळ्यांना सांभाळुन घेण्याची वृत्ती, मदतीचा हात कायम पुढे तर ज्ञान, अभ्यास आणि कौशल्याचा अनोखा संगम एकाच व्यक्तीत कसा काय असु शकतो हा मला प्रश्न पडणा-या व्यक्तींमध्ये त्या सगळ्यात जेष्ठ आणि श्रेष्ठ होत्या याबद्दल सगळ्यांचेच एकमत असावे.            मी सगळ्यांत लहान म्हणुन आणि माझी आई गेल्यापासुन त्यांना मी आणि मला त्या जास्तच जवळ वाटायच्या. त्यांच्याजवळ बसुन गप्पा मारणे कदाचीत मीच करत असे. त्याही अगदी मनापासुन बोलाय...

आयुष्यावर बोलु काही

Image
                                                                         !! श्री!!                                                                                                                सौ. पुनम हेमंत भांगले,       ...