गणपती बाप्पा मोरया
दरवर्षी प्रमाणे यंदाही गणपती उत्सव होऊन गेला त्यामुळे आठवणी एकदम ताज्या आहेत. यावेळी करोनामूळे आपण सर्वांनी सजग राहून साध्या स्वरूपात उत्सव साजरा केला. जो बाप्पाला नक्कीच आवडला असेल अशी आशा करूया.
शांततेत, समाधानाने सगळ्यांनी परंपरागत उत्सव साजरा करून वेळ निभावून नेली. त्यामुळे ध्वनीप्रदुषण, जलप्रदूषण, वायुप्रदूषण आणि अनावश्यक खर्चात बचत इत्यादी बाबी शक्य झाल्या आहेत.
मराठी-अमराठी सगळेच जण बाप्पाला मानणारे असतात. खरेतर बुध्दीचा देव आणि घरी व सार्वजनिक ठिकाणी बसविता येतो. म्हणून हा देव जास्त लोकप्रिय असावा. लहानापासून थोरापर्यंत सगळेजण उत्साहाने या काळात वावरत असतात. कोकणात जास्त महत्व असते. इतर वेळी आद्य दैवत म्हणून प्रत्येक चांगल्या कामात
/ पुजेत त्याचा प्रथम मान असतो. प्रत्येक कार्यक्रमात गणपतीपुजन किंवा स्तवन म्हणूनच सुरुवात होते.
हा सण अशा वेळेत येतो, जेव्हा निसर्गपण खुष असतो. हिरवे हिरवे गालिचे सगळीकडे पसरलेले असतात. फुले, पाने, फळे, दुर्वा पत्री आणि हार यांचे ताजे स्वरूप बघायला मिळते. सगळे यथासांग पार पाडावे व संकटे टळावीत यासाठी लागणारी सांगणी मनाला खूप भावते. आपल्याकडे 1 ½ , 5, 7 आणि 11 दिवसाच्या सानिध्यात कुटूंबाला एकत्र आणणारा हा सण. सगळे काही आरास, सजावट, रोषणाई केली तरी विसर्जनानंतर काही शिल्लक रहात नाही. शेवटी हे इथेच सोडून जायचे आहे. निरोप घेताना घरचा एखादा माणूस चालला आहे असे वाटून हळवी होणारी माणसे बघितले की हे म्हणणे पटते. पुन्हा पुढच्या वर्षी लवकर या किंवा येणार आहेत या आशेवर आपण आपल्या जीवनात रमून जातो. वर्षानुवर्षे ही परंपरा चालू असते, कधी पिढीजात कधी हौसेने तर कधी नवसाने आपण त्याला आपल्याही नकळत जोडून घेतो.
अशा या बाप्पाकडे आपण कधीतरी शांतपणे बसून “त्याला काय हवे ?” याचा कधी विचार केला आहे का? तो फक्त भाव भक्तीचा भुकेला असतो. आपण त्याच्या नावावर आपली हौसमौज करून घेत असतो. मोठमोठ्या मुर्ती, कानठळ्या बसविणारे संगीत, गुदमरवणारी गर्दी आणि नवसाला पावतो म्हणून अनाठायी महत्व वाढविणारे आपण कधी सुधारणार ?. “संकटकाळी देवाचा धावा करणे” हे तर सगळेजण करतात पण संकट नसताना कितीजण आठवण ठेवतात हे महत्वाचे.
सुंदर लेख...
ReplyDeleteधन्यवाद।
Deleteगणपतीच्या दृष्टीकोनातून चांगला विचार मांडला आहे पूनमने. आवडले.
ReplyDeleteDhanyawad!
Deleteहिच वेळ आहे सर्व भक्तांनी आत्म परिक्षण करण्याची देवालाही भक्तांना का दूर ठेवायची इच्छा झाली
ReplyDeleteहो.🙏नक्की!
Deleteविचार करायला लावणारा लेख, सुंदर
ReplyDeleteविचार अमलातही आणला पाहिजे!🙏
DeleteDhanyawad!
ReplyDeleteसगळ्या गोष्टींचं बाजारीकरण पद्धतशीरपणे सुरू करण्यात आले आहे मीडियाला हाताशी धरून...याचा अतिरेक होईल तेव्हाच हे बाजारीकरण मातीत मिसळेल
ReplyDeletedhanyavad! name please
ReplyDelete