कुटूंब वृक्षाच्या छायेत
वटवृक्षाची छाया घनदाट असते. त्याच्या छायेत अनेकजण सुखनैव नांदत असतात. तो अनेकांचे प्रेरणास्थान बनतो. हेच मला आमच्या कुटूंब वृक्षाबद्दल तुम्हाला सांगायचे आहे. जे पुढील पिढीला दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल.
(1) डॉक्टर शांताराम महाजन - मोठे काका (सन 1912 ते 1988)
मोठी आत्या “यशोदा डुबे” यांचा पाठचा भाऊ व माझे बाबाचे (दादा) श्रीपाद महाजनचा मोठा भाऊ, मोठी आत्या “यशोदा डुबे” यांची छोट्या बहीण व भावासोबत शांताराम महाजन हे पुण्याला शिकले. पुढे जिद्दीने व अथक प्रयत्नाने डॉक्टर बनले. समाजातील पहिले डॉक्टर म्हणून खूप मान सन्मान मिळाला. पुढे खेड्यातच सेवा करायची म्हणून मलकापूर येथे दवाखाना चालू केला. नंतर मुलांच्या शिक्षणासाठी बेळगावला आले. “डॉक्टरकी” ही मानवजातीची सेवा या वृत्तीनेच ते आयुष्यभर बांधील राहीले. त्यांना मोठ्या काकूनेपण (मंदाकिनी) शेवटपर्यंत उत्तम साथ दिली. डॉक्टर काकांचा हा वसा
मुलगा, सुन व आता नातवांनी पुढे चालू ठेवला आहे.
डॉक्टर काकांचा सहवास माझ्या वयाच्या 21 वर्षापर्यंत लाभला. वर्षातून एकदा आम्ही बेळगावला जायचो त्यावेळी लाभायचा तेवढा सहवाससुद्धा प्रेरणादायक व आयुष्यासाठी मार्गदर्शक ठरला.
2. मीरा महाजन (छोटी आत्या) (सन 1920 ते सन 1994)
मोठी आत्या “यशोदा डुबे” यांची छोटी बहीण म्हणजे मीरा महाजन ज्यांना मोठया बहीणीने पुण्याला शिकवले होते.
शिकून मोठी झाल्यावर नौकरीसाठी मुंबईत स्थाईक झाली. ज्यामूळे आम्हा सर्वांना गावाला जाण्यासाठी काही कालावधीत मुंबईत थांबण्यासाठी हक्काचे घर मिळाले.
तिने संगीत शिक्षक म्हणून शाळेत नौकरी केली आणि शेवट पर्यंत दोन्ही भावा।ना व भाच्यांना सांभाळून राहिली. स्वत: सुगरण होती व तिला गाण्याची आवड होती. तिच्या गाण्याचा वारसा एका बहिणीने व भाचीने जपलेला आहे.
3. श्रीपाद महाजन - माझे वडील (सन 1922 ते
सन
2013)
माझे वडील सर्वात लहान, त्यामुळे सर्वांचे लाडके.
लहान वयात सर्वांचे मृत्यू जवळून बघितल्यांने कदाचित अकाली प्रौढ झाले असावेत. मोठी आत्या व मोठे भाऊ हे त्यांचे दैवत होते. कायम दोघे भाऊ व बहिण एकत्रच असायचे. कालांतराने नौकरी निम्मित्त लांब जावे लागले. रेल्वेत प्रामाणिकपणे नौकरी करून गाण्याची आवड जोपासत होते. विविध कारणाने भाऊ-बहीण एकत्र बेळगावला भेटायचे.
त्यामुळे आम्हा सर्वांना एकत्र कुटूंबाचा लाभ मिळत होता. शेवटपर्यंत सगळेजण एकमेंकांना धरून होते.
श्री. शांताराम महाजन आणि श्री. श्रीपाद महाजन या दोन्ही भावांना त्यांच्या सहचारीणी अनुक्रमे सौ.
मंदाकिनी व सौ. नंदिनी यांनी त्यांच्या प्रत्येक ब-या वाईट प्रसंगात योग्य साथ
दिली. अनेकवेळा आम्ही बेळगावला जायचो. तेव्हा त्यांचे एकमेकांना सांभाळून घेणे व
एकमेकांवरचे प्रेम अनेक प्रसंगातून आढळून येत असे. आम्ही चौघे आणि काकांचे पाचजण
अशी एकूण 9 मूले. एवढ्या मोठ्या कुटूंबाचा सहवास वर्षातून एकदा का होईना लाभणे
आमच्या दृष्टीने महत्वाचा होता. त्याची फळे आजही आम्ही सगळेजण चाखत आहोत. आता
तिस-या आणि चौथ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरीत होत आहे.
एवढ्या सगळ्यांचा वारसा आम्हाला मिळाल्यामूळे आमचे जीवन समृध्द व सुखी झाले. त्या सर्वांनी केलेल्या अपरिमीत कष्टाचे आज चांगली फळे दिसत आहेत. आज कालची मुले थोडे काही चांगले झाले की “तुस्सी ग्रेट हो”. “You are simply great” असे म्हणून आई-वडीलांच्या गळ्यात पडतात. आम्हाला ते जमले नाही. लिखाणात त्यांना मन:पूर्वक प्रणाम करून “You are so great that’s why, We all are here” असे म्हणावसे वाटते. अशा या वटवृक्षांना माझा मनापासून प्रणाम.
दि. 29 नोव्हेंबर, 1972- सुरेखामाईचे लग्न समारंभ
1) नंदिनी महाजन (आई), 2) मोठी काकी, 3) चंदा आत्या, 4) पुनम (माधवी महाजन) (लेखिका), 5) मीरा
महाजन (आत्या), 6) मंदाकिनी महाजन (मोठी आई),
7) स्वाती एरंडेकर (माधूरी महाजन),
8) मिलींद महाजन, 9)श्रीपाद महाजन (दादा), 10) लीना भांगले (वंदना महाजन),
11) चंद्रशेखर
महाजन (अण्णा), 12) शशांक महाजन, 13) सुभाष शेटिया (शिवेश्वरकर) (मोठे भावोजी), 14) किरण
कुर्डेकर (लग्नातले नवरदेव), 15)मेधा कुर्डेकर (सुरेखा महाजन) (नवरी),16) अनुराधा
शिवेश्वरकर (कालींदी महाजन), 17) डॉ. शांताराम महाजन (मोठे दादा)

Geetatai ___छान लिहिलय. आवडलं
ReplyDeleteधन्यवाद।
Deleteछान
ReplyDeleteधन्यवाद।🙏
Deleteएक आदर्श कुटुंब म्हणता येईल 👍👍
ReplyDeleteधन्यवाद।🙏
Deleteधन्यवाद।🙏
Deleteकाकांविषयी आदर छान व्यक्त केला आहे
ReplyDeleteधन्यवाद।🙏
DeleteLovely article written on Family (Kutumb Vrukshacya Chayet). I know most them except Mothi Kaki and Chanda Atya.
ReplyDeleteThis article reminds me of my beautiful childhood days spent in Belgav. We used to visit Doctor Mama's (Dr. Shantaram Mahajan) house in Gondhali Galli. He became Mothe Dada after I got married). Mama and Sow. Mami treated us like their own children. It was really a noble family. Such people made our childhood days beautiful along with my own maternal grandfather (Dada), Grandmother (Maa), Tai, and my 3 uncles and an aunt.
Later, Mira Atya came to stay in our colony in Goregaon. so there used to be frequent visits.
Thanks Madhavi for writing this Blog.
Khoop chan comment Bhavojee!
DeleteNav nahi ale pan.
Dhanyawad
रक्ताच्या नात्याच्या पलीकडे कौटुंबिक जिव्हाळा असतो आणि तो कुटुंबातील सर्व सदस्यांना एकजीव करून ठेवतो. यात नक्कीच सर्वांचे योगदान असते.तसेच काही विशिष्ट लोक आपल्या प्रेमळ स्वभावाने पूर्ण कुटुंबाचा जिव्हाळ्याचा वारसा पुढील पिढीला सुपूर्द करतात. आता मात्र हे दुर्मिळ होत चालले आहे.
DeleteKhoop chan comment, dhanyawad name please
Delete