परतफेड
. कोणतीही वस्तू पैसे, उपकार कोणाकडून उसने घेतले की पुन्हा परत द्यायचे असतात. काही जण विसरतात किंवा विसरल्यासारखे दाखवतात. काही अपरिहार्य कारणामूळे परतफेड वेळेत करू शकत नाही. त्यामुळे दोघांच्या मनाला सारखी रुखरूख लागून रहाते. ही जाणीव आपण आपल्या स्वत:च्यामनाबद्दल ठेवत नाही. एवढे लाखमोलाचे शरीर, मन, बुध्दी विनासायस वर्षानुवर्षे कोणत्याही मोबदल्याशिवाय आपण वापरत असतो. उपकाराची जाणीवही ठेवत नाही आणि ज्यांनी दिले त्याचे साधे आभारही मानत नाही.
हिंदू तत्वज्ञानानुसार पुर्नजन्म आहे असे म्हणतात. आत्मा एकच असतो. फक्त शरीर बदलत असते अशी त्यामागची कल्पना आहे. कपडे बदल्यासारखे आपण शरीर
बदलत असतो. प्रत्येक नवीन जन्म आधीच्या जन्मातील कर्माची उधारी चुकविण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. तरी माणूस म्हणतो मी केले, मी केले. वास्तविक माणूस हा एक माध्यम असतो आणि त्याची कर्मानुसार विभागणी होते. अशा या परतफेडीच्या बोलीवर मिळालेल्या जीवनावर आपण स्वत:ला अमर समजत असतो. मी माझ्या ज्ञानाने, विज्ञानाने, बुध्दीने जग जिंकल्याच्या तो-यात वावरत असतो. स्वत:वर विजय मिळविणे कठीण असते.
असे म्हणतात की,
आपल्या पुरते मिळाले की उरलेले वाटून द्यावे. समाजाचे ऋण परत करावे. त्यासाठी मोठे
मन आणि दानी वृत्ती हवी, जे काही मिळाले ते जाताना परत नेता येणार नाही हे माहित
असून सुद्धा आपण एवढा पसारा मांडत असतो. जो आपल्या नंतर पुढच्या पिढीला कष्ट न
करता मिळते त्यामूळे त्यांना त्याची किंमत नसते.
बॅंकेकडून कर्ज घेतल्यावर हप्ते भरावयास लागतात तसे आपण देवाचे, निसर्गाचे, पृथ्वीचे कोणते व्याज भरतो? उलट आहे ते खराब करण्याची आपली वृत्ती. मला मिळाले बस झाले, उद्याचे कुणी बघितले? निसर्ग कधीच आपली मर्यादा सोडत नाही. देणा-याच्या जीवावर आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्यावर पश्चातापाची पाळी येते. तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे वेळीच सावध होऊन मिळालेल्या संपत्तीचा विनियोग योग्य प्रकारे करणे हीच खरी निती. आपल्याला काही निसर्गदत्त
देणग्या मिळतात तेव्हा त्याचा सदुपयोग इतरांसाठी केला ती ही एक प्रकारची परतफेड
ठरते. पैसा, बुध्दीमत्ता, ज्ञान आणि कौशल्य याचा उपयोग स्वत:साठी करून झाल्यावर जर
इतरांसाठी उपलब्ध करून दिला तर एक प्रकारचे
समाजऋणाची केलेली परतफेड ठरेल.
Comments
Post a Comment