रक्षाबंधन
नुकतेच रक्षाबंधन झाले. या सणाचे महत्व बहिण-भाऊ यांना तर असतेच. हल्ली मुद्दाम जवानांना व अंध-बांधवांना राखी बांधून (बंधूभाव) साजरा केला जातो. पुर्वी राजघराण्यात विशेषत: रजपुतांमध्ये रक्षाबंधन ही एक मोठी प्रथा-परंपरा मोठ्या आशेने पाळली जायची. त्यांमूळे बहिणींची रक्षा करण्याचा संकेत मिळायचा.
घरातले जवळचे सोडून खरं तर सगळ्या पुरूषांनाच राखी बांधायची वेळ आली आहे. सध्या नुसती राखी बांधुन हा बंधूभाव येत नाही तर मुळातच असावा लागतो. लहानपणी शाळेत सारे भारतीय माझे “बांधव” आहेत असे आपण दिमाखात म्हणतो. कालांतराने सर्व काही विसरून जातो. ही आठवण नेहमीच रहावी यासाठी कदाचित दरवर्षी हा सण साजरा करीत असावेत. वेळप्रसंगी भाऊ जसा अडीअडचणीला बहिणीच्या मागे ठामपणे उभा रहातो तसेच बहीणींनीही भावाच्या किंवा बहिणीच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे ही शिकवण दिली गेली पाहिजे. हल्ली एक किंवा नकोचच्या जमान्यात तसे हे कठीणच. तरीही मित्र-मैत्रिणीत किंवा मानलेल्या नात्यात ही जाणीव वाढीस लागावयास हवी त्यासाठी सर्वांनीच (पालक व समाज) प्रयत्न केले पाहिजेत.
जे आपले रक्षण करतात जसे सैंनिक, डॉक्टर, शिक्षक आणि पोलीस हे ही तेवढेच त्या राखीचे हकदार आहेत, सगळ्यांनाच राखी बांधणे शक्य नाही. तरी त्याची जाणीव ठेवणे हे महत्वाचे. त्यांना हवी ती मदत, सहकार्य जर आपण करू शकलो तरी हा बंधुभाव जपल्यासारखे होईल.
Comments
Post a Comment