मर्यादित आवृत्तीचे अमर्यादित दु:ख

          नुकताच आमच्या कार्यालयात वर्ग 4 मधील कर्मचा-याचा निवृत्तीचा निरोप समारंभ झाला. दिवसेंदिवस कमी होत जाणारा हा वर्ग हळू हळू अस्तंगत होणार की काय असे वाटते. कारण एका समितीने या वर्गाची संगणक युगात गरज काय? अशी शिफारस केली होती.  त्यामुळे नवीन भरती होत नाही. आहेत ते अनेक कारणाने उपलब्ध होत नाहीत. शिक्षणामूळेही  या पदावर कुणी येण्यास इच्छुक नसतात.  एकूण कार्यालयात काय किंवा सामाजिक आयुष्यात त्यांना ब-याच आर्थिक व सामाजिक अडचणींना तोंड द्यावे लागते. अपुरा पैसा, शिक्षण आणि अमर्यादित जबाबदा-यांचे ओझ्यांमूळे ते कायम विवंचनेत असतात.

             मध्यमवर्गाचे दु:ख आणखी वेगळे. “वडील भिक मागू देत नाही, आई जेवू घालत नाहीअशी अवस्था असते. संस्कारामूळे मर्यादा तोडवत नाही आणि मर्यादा तोडल्याशिवाय यश मिळत नाही.  मग मन मारुन किंवा मिळाले त्यात समाधान मानणे याशिवाय पर्याय नसतो. उच्च वर्गाला पैशाच्या जोरावर अनेक संधी उपलब्ध होतात व ते पुढे जातात. तळागाळातल्या लोकांना शासनाकडून विविध सवलती प्राप्त होत असतात व ते काहीही करून पुढे जाण्यासाठी  प्रयत्न करतात कारण त्यांना काहीही गमवयाची भिती नसते.  मध्यमवर्गीयांचे तसे होत नाही.  शिक्षण, लग्न, घर यासाठी लागणारे पैसे तो कर्जाऊ घेतो आणि आयुष्यभर फेडत बसतो. सामाजिक आणि नैतिक चौकट तोडू शकत नाही. शासनाचे विविध कर प्रामाणिकपणे भरतो. उत्पनाशी टक्केवारी जर जमेस धरली तर सर्वात जास्त कर दिल्यामूळे त्याच्याकडे बचत जास्त उरत नाही. “जग एक बाजारपेठयोजनेमूळे थोडे फार लोकांनी स्वत:ची प्रगती करुन घेतली अशी उदाहरणे कमी.

              मध्यमवर्गाबाबतचे निरीक्षण असे नोंदविते की, सगळ्यात मोठा वर्ग त्रिशंकू अवस्थेत अडकला असून देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि राजनैतिक संबध टिकविणे, बिघडणे यांच्या हातात हळूहळू येऊ शकेल अशा या मध्यमवर्गीय मर्यादित आवृत्तीचे प्रत्येकाचे दु:ख वेगळे.  त्यातल्या त्यात आमची पुढी सुखी म्हणावी लागेल कारण नव्या-जुन्याचा  सुवर्णमध्य गाठून कसेही आताच्या जगात स्वत:ला सावरून घेतले. पुढे येणारी पिढी काय करणार ते बघायचे.

Comments

Popular posts from this blog

अध्यात्मिक वारि भाग-4 (अधिक महिन्यातील देवदर्शन)

फ्रीजला (वाचा फुटली तर) बोलता आले असते तर ….

वसंतोत्सव