स्वराज्य मिळाले, सुराज्य केव्हा ?
इंग्रज जावून 73 वर्ष झाली. त्याआधी 90 वर्ष लाखो ज्ञात व अज्ञात लोकांनी स्वातंत्र्यासाठी अविरत लढा दिला. स्वातंत्र्य हे एकच ध्येय घेऊन त्यांचे आयुष्य पणास लावले. त्यांना असे वाटत होते की. स्वातंत्र्य मिळाल्यावर सुराज्य येईल. त्यावेळीही स्वातंत्र्यवीरांत मतभेद होते की आधी स्वराज्य की आधी सुराज्य? स्वातंत्र्य मिळाल्यावर सुराज्य आलेच असे म्हणता येणार नाही.
“स्वातंत्र्य मिळविणे सोपे पण ते टिकवणे कठीण” हे काहीजण म्हणतात ते उगीच नाही. शिस्त, देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकी जो पर्यंत प्रत्येकजण अंगी बाणविणार नाही तो पर्यंत देशाचा सर्वांगिण विकास होणार नाही.
आज आपण 21व्या शतकात पाऊल ठेवले आहे. मंगळाची मोहिम पार पाडलेली आहे.
अजूनही सामाजिक न्याय
व विकास, बेरोजगारी, अज्ञान, गरीबी आणि शिक्षण सगळ्यांना मिळते का? 35% जनता दारिद्य रेषेखाली आहे. जो पर्यंत तळागाळातील लोकांचा विकास होणार नाही. तो पर्यंत आपण स्वराज्यात आहोत असे वाटेल का? महामारी, विषमत: राजकीय अनास्था अजूनही पहातच आहोत. हे जेव्हा कमी होईल तेव्हा ख-या अर्थाने स्वराज्याचे रुपांतर सुराज्यात होईल. नाहीतर “Beggers Have No Choice” या म्हणी प्रमाणे आधी इंग्रज (परके) होते. आता आपलेच लोक आपल्याला लुटतात.
नियोजन व दुरदृष्टी, स्वयंपूर्णता आणि उपलब्ध साधनांचा पुरेपुर उपयोग, पर्यावरणाशी सुसंगत धोरण ठेवले तर आपल्या देशाला काही कमी नाही.
शक्तिमान होणे आणि असणे यात फरक असतो. तो सध्या आपण बघत आहोत. लोकशाहीचे रुपांतर हळूहळू हुकूमशाहीकडे न झुकू देणे आणि मुल्यांचा -हास थांबविणे एवढे आपल्या हाती आहे.
आपण डोळे असून आंधळे असतो कान असून बहिरे असतो आणि बोलणे येत असून मुके आहोत. (गांधीजींची तीन माकडे) प्रतिकात्मक भावना केव्हातरी उफाळून येतात तेवढ्यापुरतेच नंतर सर्व शांत. हल्ली सामाजिक माध्यमे सक्रिय असतात ते काही वेळा अनिर्बंधपणे वागतात. वर्तमानपत्राचा आवाज दाबला जातो. त्यामुळे सर्वसामान्य माणूस बघणे व सहन करणे या पलीकडे काही करू शकत नाही. त्यामुळे पुढच्या पिढीला आपण काय देणार? हा प्रश्न उदभवतो. ना सकस अन्न, ना विचार, प्रदुषण, विषमता, अगतिकता या व्यतिरीक्त काही नाही. याचा विचार सर्वांनी गांभिर्याने केला तर सुराज्य प्रस्थापित होवू शकेल.
Comments
Post a Comment